‘सरपंच हत्या प्रकरणात टॉप सिक्रेट्स’, सुरेश धस यांचे नवे गौप्यस्फोट, मोठा ट्विस्ट

| Updated on: Jan 03, 2025 | 4:23 PM

भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महत्त्वाचे गौप्यस्फोट केले आहेत. सुरेश धस यांनी एपसी नवनीत कॉवत यांची भेट घेतली. यावेळी एसपींनी त्यांना काय सांगितलं, याबाबत महत्त्वाची माहिती दिली.

सरपंच हत्या प्रकरणात टॉप सिक्रेट्स, सुरेश धस यांचे नवे गौप्यस्फोट, मोठा ट्विस्ट
Suresh Dhas
Follow us on

भाजप आमदार सुरेश धस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर महत्त्वाची माहिती दिली. “या प्रकरणात एका कंपनीकडे खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यापैकी 50 लाख रुपये दिले गेले आहेत. दीड कोटी रुपये राहिले आहेत. दीड कोटी रुपये राहिले तर माणसं कोणी पाठवले. ते माणसं डायरेक्ट आकांनीच पाठवले. आकांनीच सांगितलं होतं. आकांनीच सांगिल्यावर हे लोक शुक्रवारी तिथे गेले होते. आता काय आहे, सीडीआर काढून कोण कुणाला काय बोललं हे सर्व बाहेर येतंय. त्यामुळे मला नाही वाटत की, आका यातून बाहेर राहतील”, असं सुरेश धस म्हणाले.

“बकरी की माँ कब तक दुआ मांगेगी. सगळा फोकस हा आता आका पकडण्याकडे गेल्यामुळे इतर आरोपी राहिले असावेत. इतर लोक देखील लवकरात लवकर पकडले जातील. ते सुद्धा आतमध्ये होतील. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की, यात मी कुणाला सोडणार नाही. त्यावर लोकांचा विश्वास आहे”, असं सुरेश धस म्हणाले.

‘या प्रकरणात टॉप सिक्रेट्स’

“हे बघा मी एसपींना याबाबत बोललो. एसपी साहेब बोलले की साहेब, काही टॉप सिक्रेट्स आहेत. साहेब आम्ही तुम्हाला सांगू शकत नाहीत. ते खरं आहे आणि योग्य आहे ना. माहिती लिकेज झाली तर ती माहिती आरोपींपर्यंत जावून पोहोचू शकते. कारण त्यांना अनेक लोक प्रश्न विचारत असतील. विरोधी लोक, सत्ताधारी लोक विचारत असतील. एसपी सर्वांना सांगत गेले की, आम्ही असा तपास करतोय, तर त्या गोष्टी बाहेर पडू शकतात. त्यांनी सांगितलं की, या प्रकरणात टॉप सिक्रेट्स आहेत. आम्ही तुम्हाला सांगू शकणार नाही. मी म्हटलं की, ओके. त्यांच्या टीम वेगवेगळ्या ठिकाणी गेलेल्या आहेत हे मला कळतंय”, अशी माहिती सुरेश धस यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

बीडचा पालकमंत्री कोण व्हावा?

“मी उद्या परभणीच्या आणि परवा पुणेच्या मोर्चालाही जाणार आहे. 6 तारखेला राज्यपालांकडे चला असं सांगत आहेत. मी देखील तिथे जाणार आहे. इथे पक्षाचा विषय नाही. घटना भीषण आहे”, असं सुरेश धस यांनी सांगितलं. “बीडच्या पालकमंत्रीपदासाठी आमची पहिली पसंती ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. मुख्यमंत्री नाही झाले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार झाले तरी चालतील. आम्हाला काही अडचण नाही. अजित पवार हे सुद्धा आमचा जिल्हा सुता सारखा सरळ करतील. अजित दादांसोबत मी काम केलं आहे. त्यांना वेड्या वाकड्या गोष्टी जमत नाहीत”, असं स्पष्ट मत सुरेश धस यांनी मांडलं.