विजय वडेट्टीवारांच्या विरोधात सोमवारी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचा ‘शंखनाद’!

| Updated on: Feb 14, 2021 | 5:28 PM

मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी साधूंबद्दल वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ भाजपची आध्यात्मिक आघाडी उद्या सोमवारी नाशिकच्या रामकुंडावर शंखनाद आंदोलन करणार आहे. (bjp organise protest against vijay wadettiwar in nashik)

विजय वडेट्टीवारांच्या विरोधात सोमवारी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचा शंखनाद!
vijay wadettiwar
Follow us on

नाशिक: मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी साधूंबद्दल वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ भाजपची आध्यात्मिक आघाडी उद्या सोमवारी नाशिकच्या रामकुंडावर शंखनाद आंदोलन करणार आहे. यावेळी आध्यात्मिक आघाडीने वडेट्टीवार हे मनोरुग्ण असल्याची टीका केली आहे. (bjp organise protest against vijay wadettiwar in nashik)

भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी नाशिक येथे पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनाची माहिती दिली. उद्या १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता रामकुंड, पंचवटी नाशिक येथे साधू-संतांच्या नेतृत्वात शंखनाद आंदोलनाची घोषणा केली. यावेळी व्यासपीठावर भाजपचे नाशिक महानगर अध्यक्ष गिरीश पालवे उपस्थित होते.

काँग्रेस हिंदू विरोधी

साधूंचा अपमान करण्याचा कोणाला अधिकार नाही. विजय वडेट्टीवार हे मनोरुग्ण मंत्री आहेत. साधूंच्या वेशातल्या २-४ भोंदूंनी गैरवर्तन केले म्हणून हिंदू समाजाच्या पवित्र आणि सर्वस्व त्याग करुन साधना करत असलेल्या साधू परंपरेला अशा शिव्या घालणे मंत्र्यांना शोभत नाही. जैन साधू परंपरेचा देखील हा अपमान आहे. हिंदू विरोधी अजेंडा हा काँग्रेस पक्षाचा आहेच. त्यामुळे त्यांच्या पोटातले आज ओठावर आले आहे, अशी टीका तुषार भोसले यांनी केली आहे.

हेच दिवस दाखवायचे होते का?

हिंदु समाजाला हे दिवस दाखवण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री झालात का?, असा आमचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल आहे. १५ डिसेंबर २०२० रोजी विधानसभेत मुख्यमंत्री म्हणाले होते की, “हा महाराष्ट्र साधू-संतांचा आहे आणि आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही”. मग तुमचेच मंत्री आज साधूंना नालायक म्हणतात हे तुमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत बसते का?, असा सवालही त्यांनी केला.

रावणाला लाजवेल असं मंत्रिमंडळ

तुमचे मंत्री महिलांवर अत्याचार करतात, शरजील सारखे हिंदुंना शिव्या घालून जातात, आता तर तुमचे मंत्रीच साधूंना शिव्या देत आहेत. तुमचे असे मंत्रिमंडळ पाहून तर हे रावणाच्या मंत्रिमंडळाला लाजवेल, असे स्वैराचारी मंत्रिमंडळ आहे असेच म्हणावे लागेल, अशी टीकाही त्यांनी केली. (bjp organise protest against vijay wadettiwar in nashik)

 

संबंधित बातम्या:

रोहिणीताई, राष्ट्रवादीने तुमचं केलेलं नुकसान पुढील विधानसभेला व्याजासकट भरुन काढू : जयंत पाटील

“योग्य वेळी दांडक्याला हात घातला” पुणे पालिका अधिकाऱ्यांची गाडी फोडणाऱ्या मनसे नगरसेवकाचा नवा किस्सा

गायीचं शेण 5 रुपये किलोनं विकलं जाणार, गडकरींची मोठी घोषणा, वाचा सविस्तर रिपोर्ट

(bjp organise protest against vijay wadettiwar in nashik)