मुंबईः मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आक्रमक होत रविवारी भाजप नेत्यांवर सडकून टीका केली. एकीकडे कोरोना रुग्ण चार आणि पाच पटींनी वाढत आहे. लहान मुलं बाधित होत आहेत. दुसरीकडे भाजप नेते बार आणि शाळांची तुलना करत आहेत. हे त्यांच्या मुर्खपणाचं लक्षण आहे. भाजप नेत्यांना राजकीय बाळकडूची गोळी कमी पडलीय. त्यात सोमय्या भरसटलेले आहेत. ते कुठली गोळी घेतात, असा सवाल करत त्यांनी सदाभाऊ खोतांची किव येते, अशी टोलेबाजी केली.
का झाल्यात आक्रमक?
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी येत्या 10 दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार असा इशारा दिला आहे. तसंच सोमय्या त्यांनी काल मुंबईतील दहिसर, बीकेसी आणि नेस्को कोविड सेंटरला भेट दिली. त्यावेळी सोमय्या यांनी येत्या दहा दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार असल्याचा दावा केला आहे. मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढला असला तरी कोविड सेंटर्स रिकामे आहेत. याचा अर्थ 98 टक्के रुग्ण आपल्या घरी किंवा नर्सिंग होममध्ये बरे होतात. तसंच ज्यांचे लसीकरण झाले आहे त्यातील 99.99 टक्के लोक सुरक्षित असल्याचा दावाही सोमय्यांनी केलाय. या आरोपाला महापौर किशोर पेडणेकर यांनी जोरदार उत्तर दिले आहे.
पंतप्रधानांना कळते, पण यांना नाही…
महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, इतके मोठे नेते मात्र, अद्वातद्वा बोलतात. बोलताना त्यांचा कॉन्फिडन्स नव्हता. आता समोर मीडियाचा बूम आहे, तर बोला अशा पद्धतीने भाजपचे वरिष्ठ नेते बोलत आहेत. कोरोना आणि ओमिक्रॉनचे रुग्ण हे घरात पकडून आणून दाखवले नाहीत. त्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवड्यातून दोनदा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलतात. याचा अर्थ देशाच्या पंतप्रधानांना कळलं तिसरी लाट आलेली आहे. पंतप्रधानांना कळतंय, पण भाजपच्या राज्यातल्या नेत्यांना कळत नाही, असा टोला त्यांनी हाणला.
फस्ट्रेशनची गोळी खाता का?
महापौर पेडणेकर म्हणाल्या, सदाभाऊ खोत आणि माझी फारशी ओळख नाही. बार आणि शाळा याचं साम्य दाखवणं मूर्खपणाचे लक्षण आहे. शाळेतील लहान मुलं बाधित होत आहेत. ती मुलं मतदार नाही म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं असं नाही आहे. इतर राज्यात जी नियमावली आहे. तीच महाराष्ट्रात आहे. Whoच्या गाईडलाईननुसार एसोपी ठरतो. परत जुन्या कढीला उत आला आहे. किरीट सोमय्या या विचाराने भरसटले आहेत. हळूच कुठलीतरी गोळी खातात. ती फस्ट्रेशनची आहे का? मी शपथेवर सांगीन मला त्या कंत्राटाची माहिती नाही. माझ्या कामात मी व्यस्त असते. सेल्फ टेस्टिंग किटवर महापालिकेची कारवाई सुरू झाली. पोलिसही त्या पद्धतीने कारवाई करत आहेत अशा किटमुळे रुग्ण संख्येचा धोका वाढू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
Nashik Corona| ओमिक्रॉनने झपाटले; नाशिकमध्ये एका दिवसात 1 हजाराने वाढले रुग्ण
Medical Exam| कोरोनामुळे मेडिकलच्या परीक्षा पुढे ढकलल्या; कधीपासून होणार पेपर?