महाराष्ट्रासाठी भाजपचा खास ‘माधव’ प्लान, जाणून घ्या तो आहे तरी काय?

| Updated on: Oct 07, 2024 | 8:14 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही दिवशी होऊ शकते. त्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागलेत, लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला होता. पण विधानसभा निवडणुकीत तसे होऊ नये म्हणून भाजपने माधव प्लान आखला आहे. काय आहे हा प्लान जाणून घ्या.

महाराष्ट्रासाठी भाजपचा खास माधव प्लान, जाणून घ्या तो आहे तरी काय?
Follow us on

हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या दोन राज्यात विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल लागणार आहे. एक्झिट पोलमध्ये हरियाणामध्ये काँग्रेसचं सरकार तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-एनसीचे सरकार येण्याची शक्यता वर्तवली आहे. या दोन्ही राज्यानंतर आता संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. कारण येथे दोन मोठ्या पक्षात फूट पडल्याने त्यानंतर पहिल्यांदाच निवडणुका होणार आहेत. भाजपला महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार आणायचे आहे. त्यासाठी भाजप नेत्यांकडून खास रणनीती आखण्यात आली आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील हे भाजपसाठी डोकेदुखी ठरत असताना याला पर्याय म्हणून भाजप इतर जातीच्या लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्लान आखू शकते. भाजपचे केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्राच्या नियोजनात सध्या व्यस्त आहे. कारण महाराष्ट्रात मराठा आंदोलनाचा फटका बसू नये म्हणून विशेष काळजी घेतली जाणार आहे.

माधव फॉर्म्युला काय आहे

लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठा आंदोलनामुळे मोठा फटका बसला. देशात जातीय समीकरण फार महत्त्वाचे असते. ते जर व्यवस्थित कोणत्याही पक्षाने साधले तर त्याच्यासाठी निवडणूक जिंकणे सोपे होऊन जाते. त्यामुळे भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी खास माधव प्लान आखल्याचं समोर येत आहे. भाजपने ओबीसींवप लक्ष केंद्रित केलं. ज्यामध्ये माळी(मा), धनगर (ध) आणि वंजारी (व) समाजाच्या लोकांना जवळ करण्याचा भाजपचा प्लान असेल. माधव फॉर्म्युला मजबूत करण्यासाठी सरकारने कांदा निर्यात शुल्क कमी केले. पंतप्रधान मोदींनी नुकतेच बंजारा हेरिटेज म्युझियमचेही उद्घाटन केलंय. याशिवाय मराठा समाजाला आपल्याकडे कसे आकर्षित करता येईल यासाठी मराठा नेत्यांना मैदानात उतरवले जाण्याची शक्यता आहे.

मराठा आंदोलनामुळे मोठा फटका

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला फक्त 9 जागा मिळाल्या होत्या. तब्बल 14 जागांचा फटका बसला होता. याची वेगवेगळी कारणे होती. अजित पवार यांच्या पक्षाशी युती करूनही भाजपला फायदा झाला नसल्याचं भाजपच्याच नेत्यांनी म्हटलं होतं. मराठा आंदोलनामुळे मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य केल्याने त्याचा ही फटका भाजपला बसला होता. भाजपला मराठवाड्यात एकही जागा मिळाली नाही. पश्चिम महाराष्ट्रात फक्त दोन जागा मिळाल्या. आता जर माळी, धनगर, वंजारी या पारंपारिक मतदारांनी जर भाजपला साथ दिली तर भाजपचा त्याग केला. राजकारणात ‘माधव’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या या जातीतील शेतकरी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक आहेत. कांद्याच्या भावामुळे त्यांचा मूड बदलतो. आता या जातींना खतपाणी घालण्यासाठी भाजपने नवी रणनीती आखली आहे.

अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर

भाजपचा हा माधव फॉर्म्युला भाजपला विधानसभा निवडणुकीत फायदा करुन देऊ शकतो. जर हे तीन समाजाचे मतदार भाजपकडे गेले तर भाजपला मराठवाड्यात 46 आणि पश्चिम महाराष्ट्रात 70 जागा मिळू शकतात. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मराठवाड्यात 39 जागा लढवून 16 जागा जिंकल्या होत्या. तर पश्चिम महाराष्ट्रातील 26 जागांवर निवडणूक लढवून 16 जागा जिंकल्या होत्या. महायुती सरकारने अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर केले. अहिल्यादेवी होळकर हे धनगर समाजाचे अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व होते. आजही धनगर समाज त्यांची देवीप्रमाणे पूजा करतात. महायुती सरकारने ब्राह्मण आणि राजपूत समाजाच्या आर्थिक विकासासाठी दोन महामंडळे स्थापन करण्याची घोषणा केली.

लोकसभा निवडणुकीत भाजपला विदर्भात देखील मोठा फटका बसला. पण विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला होता. तेथेही पराभव स्वीकारावाल लागला. विदर्भात विधानसभेच्या 62 जागा आहेत. जो विदर्भ जिंकतो तो मुख्यमंत्रीपदापर्यंत जातो असं म्हटलं जातं. नागपूर हा विदर्भाचा भाग आहे, जिथून देवेंद्र फडणवीस विधानसभेची जागा लढवतात.

विदर्भात दलित मतदारांची संख्या ही जास्त आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार संविधान बदलणार असा प्रचार केल्याने काँग्रेसला मोठा फायदा झाला. पण आता दलित मतदारांना भाजप कसे आकर्षित करते हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. मराठा कुणबींना ओबीसी जातीचे प्रमाणपत्र देऊन खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.