नाशिकः भाजपचे (BJP) अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी (Mahavikas Alliance ) सरकारवर जहरी शब्दांमध्ये टीका केली आहे. दोन वर्षे राक्षसी सत्तेची असल्याचा आरोप त्यांनी आपल्या टीकेतून केला आहे. भोसले यांनी महाविकास आघाडी सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त ट्वीट करत ही टीका केली आहे.
पांडुरंगाकडे विनवणी
तुषार भोसले आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत की, महाविकास आघाडी सरकारची दोन वर्षे ही राक्षसी सत्तेची आहेत. महाराष्ट्रासाठी कोणतीही कामगिरी न करता वसुली, भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार करत व्यसनाधीनांसाठी पायघड्या टाकून हे सरकार सत्तेवर आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शिवाय साधू-संत-वारकरी यांच्यावर सातत्याने अन्याय करणाऱ्या ‘राक्षसी’ सत्तेला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या सत्तेतून पांडुरंगा,महाराष्ट्राला लवकर मुक्त कर, अशी विनवणी ही भोसले यांनी आपल्या ट्वीटमधून केलेली आहे.
पवारांवरही वादग्रस्त टीका
भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत वादग्रस्त टीका केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्याविरोधात आक्रमक झाली होती. याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा नाशिक शहरात फिरू देणार नाही, असा इशाराही देण्यात आला होता. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक होत जोरदार आघाडी उघडली होती.
पोलीस ठाण्यात तक्रार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याविरोधात तुषार भोसले यांनी आपली पातळी सोडत अतिशय हीन दर्जाची टीका सोशल मीडियावर केली. या टीकेमुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये, याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली होती. त्यानंतर काही काळ भोसले गप्प होते. त्यांनी आता पुन्हा एकदा टीका केली आहे.
मलिकांचा भाजपवर निशाणा
राज्यातील ठाकरे सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ठाकरे सरकारचा लेखाजोखा मांडला आहे. यावेळी बाते कम, काम ज्यादा, हेच आमच्या सरकारचे धोरण आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारचा लेखाजोखा मांडला.
पेट्रोल पंपावरील तैनात फौजफाटा वापस बोलावला; नाशिकमधील हेल्मेटसक्तीवर 8 दिवसांत होणार सुनावणी