मुंबई: नवीन आर्थिक वर्षात मुंबईकरांवर मालमत्ता कर (property tax) वाढीचा बोजा वाढणार आहे. कोरोनामुळे मुंबईकरांकडून (mumbai) कर वसुली करण्यात आली नव्हती. मात्र, आता मार्च 2020 मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला त्यावेळपासूनचा मालमत्ता कर वसुलीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात म्हणजे 1 एप्रिलपासून नवीन मालमत्ता कर वसुली करण्यात येणार आहे. तसेच महापालिकेने यावर्षी 6 हजार कोटी रुपये वसुलीचे टार्गेट ठेवण्यात आलं आहे. आतापर्यंत 4,600 कोटी रुपये वसूल केले आहेत. महापालिकेचे आर्थिक गणित बिघडल्यानेच महापालिकेने (bmc) मालमत्ता कर वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. तर महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधक प्रशासनाच्या या निर्णयावर काय भूमिका घेतात याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत जकात बंद झाल्यानंतर मालमत्ता कर वसुलीवर भर देण्यात येत आहे. परंतु मार्च 2020 मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि प्रत्येक व्यक्तीचे आर्थिक गणित बिघडले. त्यामुळे 2020-21 वर्षांत मालमत्ता कर वसुलीला माजी नगरसेवकांनी विरोध केला होता. त्यामुळे दोन वर्षांपासून मालमत्ता कर वसुली रखडली होती. परंतु कोरोनामुळे मुंबई महापालिकेचे ही आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे 2022-23 या आर्थिक वर्षात नवीन मालमत्ता कर वसुली करण्यात येणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.
दरम्यान, 500 चौरस फुटाखालील घरांचा मालमत्ता कर माफ करण्यात आला आहे. त्यामुळे 500 चौरस फुटांखालील 16 लाख घर मालकांना दिलासा मिळाला आहे. या 16 लाख घरांमध्ये ज्यामध्ये 28 लाख कुटुंब राहतात. परंतु, या करमाफीमुळे मुंबई महापालिकेला 364 कोटींवर पाणी सोडावे लागणार आहे.
दरम्यान, जानेवारीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मालमत्ता कर माफीची घोषणा केली होती. मुंबईकर म्हटले की मुंबईकरांनी फक्त करच भरायचे का? मुंबईकर आधीच कर एवढा कर देत आहेत, त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुखांनी मुंबईवर जे प्रेम केले तेच प्रेम आम्ही पुढे नेत आहोत, आता माझ्या ताण आदित्य ठाकरेंनी कमी केला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. शिवसैनिकांनी दिलेली वचने पाळायला शिवकले आहे, त्यामुळे आम्ही वचन देतो आणि ते पाळतो, लोकांना निवडणुकीत दिलेली बरीच वचने पूर्ण केली आहेत, असेही मुख्यमंत्री उद्धव ठकरे यांनी सांगितले होते.
संबंधित बातम्या:
VIDEO: ठाकरे सरकारच्या आणखी 6 मंत्र्यांचे घोटाळे उघड करणार, किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर नेमकं कोण?