मुंबई : अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात दाखल मानहानीच्या खटल्यावर 22 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्ञानदेव वानखेडे (Dnyandeo Wankhede) यांनी मलिक यांच्याविरोधात 1.25 कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. कोर्टाने दोन्ही बाजूंनी सादर केलेली अतिरिक्त कागदपत्रे रेकॉर्डवर घेतली आहेत.
काय आहे मागणी?
नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन एकामागून एक गौप्यस्फोट करण्याचा धडाका सुरुच ठेवला आहे. समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांच्या जात प्रमाणपत्रावर त्यांनी संशय व्यक्त केला होता. या प्रकरणी ज्ञानदेव वानखेडे यांनी बॉम्बे हायकोर्टात धाव घेत अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. प्रसारमाध्यम, सोशल मीडियामध्ये आपल्या कुटुंबियांबद्दल प्रसारित होणाऱ्या वृत्तांवर बंदी यावी, यासाठी ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. नवाब मलिक यांच्याविरोधात त्यांनी सव्वा कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
[Defamation]
Breaking – #BombayHighCourt to pronounce verdict on November 22 on interim plea to restrain #NawabMalik from making ‘defamatory remarks’ in suit by #SameerWankhede‘s father.
Court takes additional documents produced by both parties on record. pic.twitter.com/4TkQRetI2y
— Live Law (@LiveLawIndia) November 18, 2021
समीर वानखेडेंची आयोगाकडे धाव
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांच्या जातीच्या प्रमाणपत्रावर संशय व्यक्त केल्यानंतर समीर वानखेडे दिल्लीत गेले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्षांची भेट घेतली होती. आयोगाच्या अध्यक्षांना सर्व कागदपत्रे सादरही केली होती. आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. मात्र वानखेडेंवर आरोपांवर आरोप होत आहेत.
नवाब मलिक यांचा आरोपांचा धडाका
नवाब मलिक यांनी आज (गुरुवारी) समीर वानखेडे यांच्यावर तीन गंभीर आरोप केले होते. समीर वानखेडे यांनी एका आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकले. आधीच्या पत्नीच्या नातेवाईकालाही खोट्या गुन्ह्यात अडकवले आणि शाळा सोडल्याचे बनावट दाखले सादर केल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला.
जाती-धर्मावरुन वाद
नवाब मलिक यांनी वानखेडे यांची जात आणि कथित धर्मांतरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मीडियाशी संवाद साधला होता. मी अनुसूचित जमाती वर्गातील आहे आणि माझा मुलगाही अनुसूचित जमाती वर्गातील आहे. मी मुस्लिम महिलेशी लग्न केलं. पण मुस्लिम धर्माशी आमचा काहीच संबंध नाही, असं ज्ञानदेव वानखेडे यांनी स्पष्ट केलं होतं. दुसरीकडे, समीर वानखेडे मुस्लिम असल्यानेच त्यांच्याशी माझ्या मुलीने लग्न केल्याचा दावा समीर वानखेडे यांच्या पहिल्या बायकोच्या वडिलांनी केला आहे.
संबंधित बातम्या :
VIDEO: समीर वानखेडेंवर नवाब मलिकांचे तीन गंभीर आरोप; नव्या आरोपांनी खळबळ
25 कोटीच्या डीलवर वानखेडेंची 4 तास चौकशी, पण आरोप करणारेच ‘बेपत्ता’, एनसीबीचं मीडियाद्वारे समन्स
बनावट प्रमाणपत्रे दावून वानखेडेंनी नोकरी बळकावली, भीम आर्मीची जात पडताळणी समितीकडे तक्रार