ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

| Updated on: Oct 11, 2024 | 9:55 PM

ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर झाला आहे. दिवाळीचा बोनस जाहीर झाल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बोनस जाहीर केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आभार मानले आहेत.

ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा
Follow us on

ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर झाला आहे. कर्मचाऱ्यांना 24000 रुपये एवढा सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केली. याप्रसंगी खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले, मीनल संख्ये, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपूरे आणि उमेश बिरारी उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेने सन 2022-23 साठी 21 हजार 500 रुपये रुपये इतके सानुग्रह अनुदान दिले होते. त्यात 2500 हजार रूपयांची वाढ करून 24000 देण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

दिवाळीच्या निमित्ताने शासकीय तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला जातो. ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना २०२१-२२ मध्ये 18 हजार रुपये बोनस मिळाला होता. गेल्या वर्षी यामध्ये 20 टक्के वाढ करण्यात आली होती. तर आशा सेविकांना 6000 रुपये जाहीर झाले होते. भाऊबीज आणि सानुग्रह अनुदानात यंदाही वाढ करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंद दिसत आहे.

ठाणे महानगरपालिकेने 2021-22 साठी 18 हजार बोनस म्हणून दिले होते. त्यानंतर त्यात 3500 रुपयांची वाढ करुन 2022-23 या वर्षासाठी 21500 रुपये देण्यात आले. त्यानंतर यंदा 2500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. बोनस जाहीर झाल्याने ठाणे मनपाच्या कर्मचारी यांनी आणि मजदूर युनियनचे सरकारचे आभार मानले आहेत.