नवी दिल्ली : कोरोनाच्या भीषण संकटानंतर आज चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. यावरून आता राज्यात राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिक आणि नागपूरसाठी देण्यात आलेल्या मेट्रोच्या निधीवरू शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतं. नाशिक आणि नागपुरात भाजपची सत्ता असल्यानं मेट्रोसाठी निधी दिला. हे पटणारं नाही. यापुढं त्या शहरात त्यांची सत्ता राहणार नाही अशी थेट टीक शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तर यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारची बाजू घेतली आहे. (Budget 2021 sanjay Raut and chandrakant Patil fight on Nagpur Nashik Metro Fund)
यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, नाशिक आणि नागपुरात भाजपची सत्ता असल्यानं मेट्रोसाठी निधी दिला. हे अजिबात पटणारं नाही. यापुढं त्या शहरात त्यांची सत्ता राहणार नाही. ‘मुंबईची मेट्रो का अडकून ठेवली आहे ? जमीन केंद्राची आहे म्हणतात. कुठून मंगळावरून जमीन आणलीय का?’ असा खोचक सवाल यावेळी संजय राऊतांनी विचारला.
तर यावर ग्रामीण पायाभूत सुविधांसाठी 40 हजार कोटींची तरतूद केली आहे. नागपूर आणि नाशिक मेट्रोसाठी तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी मोठी तरतूद केली आहे. यंदाचं बजेट हे मध्यमवर्गीय लोकांना आणि शेतकऱ्यांना आनंद देणारं बजेट असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे मेट्रोच्या मुद्द्यावर राऊत आणि चंद्रकांत पाटील आमने-सामने पाहायला मिळत आहे.
दरम्यान, मोदी सरकारकडून मांडल्या जाणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात (Budget 2021) गरीब आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारी घोषणा झाली पाहिजे. गरीब आणखी गरीब होता कामा नये, अशी अपेक्षा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
ते सोमवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी वस्तू व सेवा कर कायद्याच्या (GST) परताव्याच्या पैशांवरून केंद्र सरकारला टोला लगावला. केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या वाट्याचे जीएसटीचे पैसे लवकरात लवकर द्यावेत. म्हणजे आम्हाला कोरोनाच्या संकटातून अर्थव्यवस्था बाहेर काढता येईल. तसेच कोरोनाची लस मोफत देण्यासंदर्भातही विचार झाला पाहिजे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
‘उद्योग आणि व्यापाऱ्यांवरील केंद्रीय यंत्रणांचा फास सैल करा’
देशातील उद्योगांना मुक्तपणे काम करु देण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा फास ढिला झाला पाहिजे. जेणेकरून अर्थकारणाला उभारी येईल, असेही संजय राऊत यांनी सांगितले. (Budget 2021 sanjay Raut and chandrakant Patil fight on Nagpur Nashik Metro Fund)
संबंधित बातम्या –
(Budget 2021 sanjay Raut and chandrakant Patil fight on Nagpur Nashik Metro Fund)