Ganpati Visarjan : गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण…

| Updated on: Sep 18, 2024 | 11:37 AM

Ganpati Visarjan : जळगाव जामोदमध्ये एक अप्रिय घटना घडली. विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागलं. त्यामुळे जळगाव जामोद शहरात तणाव निर्माण झाला आहे.

Ganpati Visarjan : गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण...
Jalgaon Jamod
Follow us on

अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन मिरवणुका पार पडल्या. पुण्यासह काही ठिकाणी अजूनही विसर्जन मिरवणुका सुरु आहेत. ढोल-ताशाच्या गजरात भक्तीभावाने गणपती बाप्पाला निरोप देत असताना बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये एक अप्रिय घटना घडली. विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागलं. त्यामुळे जळगाव जामोद शहरात तणाव निर्माण झाला आहे.

गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरु असताना मोठा राडा झाला. दगडफेकीची घटना घडली. जळगाव जामोदमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परिस्थिती आता नियंत्रणात आहे. पण जामोदमधील विसर्जन मिरवणूक अजूनही पूर्ण झालेली नाही.

पोलिसांना लाठीमार करावा लागला

आरोपींना अटक होईपर्यंत विसर्जन करणार नाही, अशी 18 गणेश मंडळांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे 12 तास उलटून गेल्यानंतर गणेश मुर्तीच विसर्जन झालेलं नाही. बुलढाण्यात जळगाव जामोद येथे विसर्जन मिरवणूक सुरु असताना दगडफेकीची घटना घडली. काही समाज कंटकांनी हे कृत्य केलं. तणाव इतका वाढला की, पोलिसांना लाठीमार करावा लागला. यात काही महिला जखमी झाल्या आहेत. गाड्यांची तोडफोड करण्यात आली.