मेहकरमध्ये दोन गटांत तणाव, गाड्यांची जाळपोळ, दगडफेकीनंतर पोलीस आक्रमक, 23 आरोपींना अटक, संचारबंदी लागू

| Updated on: Nov 25, 2024 | 1:20 PM

Crime News: मेहकरमधील तणावामुळे बाजारपेठ बंद आहे. उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांनी संचारबंदीचे आदेश काढले आहेत. कलम 144 लागू केले आहे. त्यामुळे रविवारी रात्रीपासून संपूर्ण शहरात संचारबंदी लागू झाली आहे. शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

मेहकरमध्ये दोन गटांत तणाव, गाड्यांची जाळपोळ, दगडफेकीनंतर पोलीस आक्रमक, 23 आरोपींना अटक, संचारबंदी लागू
Follow us on

Mehkar crime news: बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात तणावर निर्माण झाला आहे. राज्यातील विधानसभा निकालाची मतमोजणी २३ नोव्हेंबरला झाली. त्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ खरात विजयी झाले. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी रात्री दोन समुदायात दंगल झाली. सहा गाड्या पेटवण्यात आल्या. दगडफेकही झाली. यामुळे पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. या प्रकारानंतर पोलीस आक्रमक झाले आहे.

23 आरोपींना अटक

मेहकरमधील माळीपेठ भागासह इतर काही भागांमध्ये रविवारी रात्री वाहने पेटवून दिली होती. तसेच मारहाणीच्या घटनाही घडलेल्या होत्या. दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या भागांत बंदोबस्त वाढवला. संचारबंदी लागू केली. मेहकर शहराच्या सर्व सीमा बंद केल्या. या दंगली प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 23 आरोपींना अटक केली आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. तसेच इतर दंगलखोरांचा शोध घेतला जात आहे. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

मेहकरमध्ये बाजारपेठ बंद

कलम 144 लागू

मेहकरमधील तणावामुळे बाजारपेठ बंद आहे. उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांनी संचारबंदीचे आदेश काढले आहेत. कलम 144 लागू केले आहे. त्यामुळे रविवारी रात्रीपासून संपूर्ण शहरात संचारबंदी लागू झाली आहे. शहरात तणावपूर्ण शांतता आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा

मेहकरमध्ये जाळपोळ झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामुळे शहरात तणाव अजून वाढला आहे. पोलिसांनी आता सोशल मीडियावर लक्ष ठेवले आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.