बुलडाणा : बुलडाण्यात काल, परवा दोन दिवस एचपीच्या पेट्रोल (HP’s pumps) पंपांवर पेट्रोल, डिझेल मिळत नव्हते. त्यामुळं इतर पेट्रोल पंपांवर नागरिकांनी गर्दी (Crowd) केली. यासंदर्भात पेट्रोल पंपचालकांना विचारलं असता पुरवठा झाला नसल्यानं साठा संपल्याचं त्यांनी सांगितलं. गायगाव (Gaigaon) येथील डेपोतून पेट्रोल, डिझेलचा पुरवठा केला जातो. परंतु, व्हॅगन दोन दिवस आली नसल्यानं पंपचालकांनी पेट्रोल संपल्याचं सांगितलं असेल. पेट्रोलची कमतरता नाही. हा कृत्रीम टंचाईचा प्रकार दिसतो, असं गायगाव येथील पेट्रोल सप्लाय करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. काल व्हॅगन आली नव्हती याचा अर्थ पेट्रोल संपला असा होत नाही. एखाद दिवस व्हॅगन उशिरा होत असते. पण, पेट्रोल पंपचालक पुढं आपल्याकडं राखीव साठा राहावा, यासाठी अशाप्रकारे पेट्रोल, डिझेल संपल्याचं सांगत असतात. कृत्रीम टंचाई निर्माण करत असतात, असं गायगाव येथील अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाली.
यासंदर्भात अकोल्याचे प्रतिनिधी गणेश सोनोने यांनी दिलेल्या माहितीनुसार, गायगाव येथील डेपो येथे पेट्रोलची व्हॅगन ट्रेन आली नव्हती. म्हणून दोन दिवस कुत्रीम तुटवडा होता. काल व्हॅगन आली. आज संध्याकाळी व्हॅगन येणार आहे. त्यामुळं कुठेही पेट्रोल टंचाई नाही. व्हॅगन येण्यास विलंब झाल्यास पेट्रोल सप्लाय थोडा कमी करतात, अशी माहिती आहे.
बुलडाण्यात गेल्या दोन दिवसांपासून एचपीच्या पंपांवर पेट्रोल नाही. त्यामुळं गर्दी वाढली होती. गायगाव येथे अकोला जिल्ह्यातील डेपो आहे. येथून पेट्रोल वितरित होतं. तिथून दोन दिवस पेट्रोल, डिझेल आलं नव्हतं. एखाद्या दिवशी व्हॅगन येत नाही. दोन ऐवजी एक व्हॅगन देतो. चार ऐवजी दोन व्हॅगन देतो. त्यामुळं काही पेट्रोल पंपमालकही पेट्रोल राखून ठेवण्यासाठी पेट्रोल संपल्याचं सांगतात.
लग्नसराईचा सीजन सुरू आहे. दुचाकी-कारसाठी पेट्रोल लागतो. शेतकऱ्यांना टॅक्टरसाठी डिझेल लागतं. पेट्रोल, डिझेल हे पुरेशा प्रमाणात मिळणं गरजेचं आहे. दोन दिवस पेट्रोल पंपांवर लाईन लागल्यामुळं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. बुलडाणा जिल्ह्यातील अनेक पंप बंद होते. तर इंडियन ऑईल पंपावर वाहनांची गर्दी होती.