बुलडाणा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी (District President Nazer Qazi) यांच्याकडून सतत अपमान होत होता. या अपमानजनक वागणुकीला कंटाळून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अॅड. मीरा बावस्कर (Adv. Meera Bawaskar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. त्यांनी आपला राजीनामा जिल्ह्याचे नेते आणि पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे सोपविला आहे. त्यामुळं राजकीय क्षेत्रात एकाच खळबळ उडालीय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विविध आघाड्या स्थापन करण्यात आल्या. या आघाड्यांच्या विविध पदांवर पक्षाच्या वतीने नियुक्त्या देण्यात आलेल्या आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस युवती शाखेच्या (Nationalist Congress Youth Branch) जिल्हाध्यक्षपदी खामगाव येथील अॅड. मीरा बावस्कर-माहुलीकर यांची नियुक्ती अनेक वर्षापासून केली आहे.
अॅड. बावस्कर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपविला आहे. राजीनामा देण्याचे कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांच्याकडून वेळोवेळी अपमानास्पद वागणूक दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडालीय.
अॅड. बावस्कर म्हणाल्या, गेली दहा वर्षे पद रिक्त होते. शुन्यातून तयारी करावी लगाली. महिलांच्या कार्यशाळा घेतल्या. जिल्ह्यातील तेरा तालुके पिंजून काढले. महिलांना मार्गदर्शन केलं. तरीही जिल्हाध्यक्ष हे सतत अपमानीत करत होते. त्यांच्या वागण्याला कंटाळून पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडं पदाचा राजीनामा दिला आहे. ते अंतीम निर्णय घेतील. राष्ट्रवादीचे नेते आमचे दैवत आहेत, असंही त्या म्हणाल्या. युवती संघटना सोपी वाटत होती तर गेली दहा वर्षे हे पद रिक्त का होतं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
नाझेर काझी यांच्या घराण्याला मोठा राजकीय वारसा आहे. नाझेर यांचे आजोबा एन. झी. काझी यांना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाठराखण केली होती. सिंदखेडराज परगण्याचेही ऐतिहासिक संदर्भही काझी कुटुंबीयांशी जुळलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून नाझेर काजी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत.