आरटीईतील पहिलीचे प्रवेश रखडले; १२ एप्रिलला जाहीर होणार होती यादी पण,…

| Updated on: Apr 14, 2023 | 4:20 PM

प्रक्रिया राबवत असताना काही तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.

आरटीईतील पहिलीचे प्रवेश रखडले; १२ एप्रिलला जाहीर होणार होती यादी पण,...
Follow us on

बुलढाणा : आरटीई अंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत असल्याने बऱ्याच पालकांचा याकडे कल असतो. यासाठी प्रक्रिया राबवत असताना काही तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. संबंधित तारखेला काही काम न झाल्यास पुढील तारखांचं काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. या घोळामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असताना आरटीई अंतर्गत खाजगी शाळांमध्ये पहिल्या वर्गात तब्बल 25% प्रवेश मोफत दिल्या जात असतात. राज्य सरकारच्या शिक्षण विभागामार्फत RTE ची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 12 एप्रिलला या प्रवेश प्रक्रियेतील पहिली निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर होणार होती.


निवड यादी जाहीर झालीच नाही

मात्र RTE प्रवेश प्रक्रियेची वेबसाईट बंद पडली असल्याने ही निवड यादी जाहीर होऊ शकली नाही. त्यामुळे पालक मोठ्या प्रमाणात चिंतेत सापडले आहेत. आरटीईच्या पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेत 12 तारखेपासून 25 तारखेच्या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. अशा विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश निश्चित करणे गरजेचे आहे. मात्र वेबसाईट चालत नसल्याने ही प्रतीक्षा यादी आणि निवड यादी जाहीर झाली नाही.

पालक वर्गामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या वेबसाईटचे मेंटनन्सचे काम सुरू असल्याची माहिती बुलढाणा जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

मेंटनन्स सुरू आहे

राज्यातील खाजगी शाळेत RTE अंतर्गत पहिल्या वर्गातील प्रवेश रखडले. RTE प्रवेशप्रक्रिया वेबसाईट हँग झाली आहे. 12 एप्रिलला निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर होणार होती. पण, अद्याप असे काही झाले नाही. यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. मेंटनन्स सुरू असल्याची माहिती बुलढाण्याचे शिक्षण अधिकारी बाळासाहेब खरात यांनी दिली.

तांत्रिक कारण समोर येत आहे. पण, यामुळे पालकांच्या जीवात जीव नाही. वेळेवर सर्व झालं नाही तर आपल्या मुलांना मोफत प्रवेश मिळेल की नाही, अशी भीती त्यांना वाटत आहे.