बुलढाणा : सरकी घेवून जात असलेल्या टाटा आयशर (Tata Eicher) वाहन आणि स्कूल बस (School Bus)मध्ये मलकापूर रोडवरील एआरडी मॉल समोरील वळणार अपघात झाला. यामध्ये सुदैवाने मोठी घटना टळली असून, एक विद्यार्थी किरकोळ जखमी झाला आहे. अपघातात आयशर वाहनाचे नुकसान झाले असून साखरखेर्डा येथील आयशर वाहन चालकाच्या पायाला मार लागला आहे. सिराज खान असे जखमी आयशर चालकाचे नाव आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यावेळी या महामार्गावर प्रवास करणाऱ्यांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे दोन्ही कडील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. यानंतर पोलिसांनी ही गर्दी कमी करत वाहतूक सुरळीत केली. (Eicher vehicle and school bus crash in Buldhana, One student sustained minor injuries)
साखरखेर्डा येथून मलकापूरकडे सरकी घेवून जात असलेले आयशर वाहन बुलडाणा शहरातील एआरडी मॉल समोरील वळण रस्त्यावरुन चालले होते. या दरम्यान रेसिडेन्सी क्लबकडून येणाऱ्या सहकार विद्या मंदिर या शाळेची बस अचानक समोर आल्याने आयशर चालकाने प्रसंगावधान राखत आपल्या वाहनाचा वेग कमी करुन वाहन रस्त्याच्या खाली घातले. यावेळी स्कूल बस चालकानेही आपली तत्परता दाखवत आपलेही वाहन रस्त्याच्या खाली उतरवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सहकार विद्या मंदिरच्या या बसमध्ये 15 विद्यार्थी होते. यापैकी एक विद्यार्थी किरकोळ जखमी झाला आहे. अपघातात आयशर वाहनाचे नुकसान झाले असून साखरखेर्डा येथील आयशर वाहन चालक सिराज खान यांच्या पायाला मार लागला आहे. याच दरम्यान अपघातस्थळावरुन शिकाऊ चालक वाहन घेऊन जात असताना चालकाचे लक्ष विचलित झाल्याने वाहकाने आपले वाहन दुभाजकावर नेले. सुदैवाने याही वाहनातील कोणीही जखमी झाले नाही.
मित्राला सोडण्यासाठी जात असताना ऊसाच्या ट्रेलरला पाठीमागून कार धडकल्याने भीषण अपघात झाल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा अहमदनगरमधील श्रीगोंदा येथील काष्टी येथे घडली. या भीषण अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला. या अपघातात राहुल आळेकर, केशव सायकर, आकाश खेतमाळीस या तिघांचा जागीच मृत्यू झाला. राहुल आणि आकाश हे आपला मित्र केशव सायकरला घरी सोडण्यासाठी काष्टीला जात असताना हा अपघात झाला. तिन्ही मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताचे नेमके कारण समजले नाही. मात्र, श्रीगोंदा ते दौंड हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा आणि मोठा असल्याने वाहनांची गती अधिक असते. तालुक्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला मागील बाजूस रिफ्लेक्टर नसल्याने अपघात झाल्याचे बोलले जातेय. (Eicher vehicle and school bus crash in Buldhana, One student sustained minor injuries)
इतर बातम्या
Sangli Online Fraud : सांगलीत चक्क रेल्वे पोलिसाला ऑनलाईन गंडा, लाखो रुपयांची केली फसवणूक