बुलडाणा : राज्यमंत्री बच्चू कडू यांचा काल बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर (Sangrampur) तालुक्यातील जळगाव जामोद येथे धावता दौरा होता. मात्र या दौऱ्यात जायला उशीर झाल्याने त्यांना भूक लागली. मग काय कडू यांची नजर पडली ती संग्रामपूरचे ठाणेदार (Thanedar) यांच्या गाडीतील डब्यावर. कोणताही विलंब न करता कडू यांनी तो डब्बा स्वतः गाडीतून काढला. जवळील तहसीलदार यांच्या शासकीय निवासस्थानी (Government Residence) जाऊन त्यावर ताव मारला. यामुळे राज्यमंत्री बच्चू कडू यांचा पुन्हा एकदा साधेपणा समोर आलाय. मंत्री म्हटलं की, ताम-धाम आलाय. पण, बच्चू कडू यांचं कामचं न्यार. त्यांना काही मान-पान, प्रतिष्ठा याच्याशी फारस काही देणं-घेणं नसते. जसं असेल, तस स्वीकारून ते सामान्यांची कामं करतात. त्यामुळंच सामान्य जनतेचा हा जननायक आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू हे नेहमीच कार्यकर्त्यामधील सर्वसामान्य मधील नेतृत्व. त्यांना कधीही मंत्री किंवा नेता असल्याचा गर्व नाही. त्यामुळेच ते लोकप्रिय आहेत. कडू नेहमीच आपल्या कार्यकर्त्याच्या घरी जाऊन साधं जेवण करतात. ते कधी शेतात जाऊन जेवण करताना पाहिले असेल. मात्र काल ही राज्यमंत्री कडू यांनी दौऱ्यावर असताना ठाणेदार यांच्या गाडीतीतल डब्बा घेऊन खाल्ला. ठाणेदार यांना हॉटेलात जाऊन जेवायला सांगितले. मात्र साहेब त्यात अगदी साधं जेवण आहे. त्यात फक्त भाजी, भाकर आणि ठेचा आहे. म्हटल्यावर कडू यांनी चालेल म्हटलं. जवळच्या तहसीलदार यांच्या निवासस्थानात जाऊन त्या डब्ब्यावर ताव मारला.
बच्चू कडू यांचं व्यक्तिमत्त जरा वेगळंच. ते नेहमी जमिनीवर राहून काम करतात. साधेपणानं राहतात. कामही एकदम थेट. सामान्य माणसांची काम व्हावीत, यासाठी ते कसोशीनं प्रयत्न करतात. जिथं जातील तिथं त्यांच्यात मिसळण्याचा प्रयत्न करतात. मग, जे मिळेल, जस मिळेल, तसं खाऊन मोकळे होतात. मला, असंचं हवं, तसंच हवं, असा काही त्यांचा आग्रह नसतो. सामान्य माणसांची कामं कशी होतील, यासाठी त्यांचा प्रयत्न असतो.