शेगावातील गजानन महाराज यांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, उद्यापासून राहणार रेलचेल कारण…

| Updated on: May 03, 2023 | 10:43 PM

आनंदसागर आध्यात्मिक केंद्राचा काही भाग आहे त्या स्थितीत सुरू करण्यात येत आहे, असे व्यवस्थापकीय विश्वस्थांनी कळवले आहे.

शेगावातील गजानन महाराज यांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, उद्यापासून राहणार रेलचेल कारण...
Follow us on

बुलढाणा : कोविड काळात काही अपवाद वगळता गेली दोन वर्षे श्रींचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद होते. या बंदकाळात निधीअभावी श्री संस्थेचे सर्व सेवाभावी उपक्रम तसेच नियोजित विकासकामे थांबवण्यात आली होती. श्री संस्थेच्या विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व सेवाकार्यांचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आला आहे. परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर आवश्यक सेवाधाऱ्यांची सेवा घेण्यात येईल. पण, सध्या आनंदसागर आध्यात्मिक केंद्राचा काही भाग आहे त्या स्थितीत सुरू करण्यात येत आहे, असे व्यवस्थापकीय विश्वस्थांनी कळवले आहे. त्यामुळे शेगाव येथे येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढणार आहे.

या वेळेत सुरू राहील आध्यात्मिक केंद्र

शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानचे आनंद सागरमधील आध्यात्मिक केंद्र उद्यापासून भक्तांसाठी खुले होणार आहे. संत गजानन भक्तांना अनेक वर्षांपासून आनंद सागर अध्यात्मिक केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा होती. आनंद सागरमधील अध्यात्मिक केंद्र दररोज सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत सुरू राहील. या अध्यात्मिक केंद्रात गणेश, विष्णू, ब्रम्हा यांची मंदिर आहेत. ही मंदिर भक्तांसाठी खुले होणार असल्याने भक्तांची रेलचेल वाढणार आहे.

हे सुद्धा वाचा

काही भाग सुरू करण्यात येणार

आनंद सागर हा परिसर सुमारे २०० एकर परिसरात आहे. त्यापैकी काही आध्यात्मिक भाग आहे त्या स्थितीत सुरू करण्यात येत आहे. आनंद सागर बंद असल्यामुळे शेगावात येणाऱ्या भाविकांची संख्या रोडावली होती. आता काही भाग सुरू होत असल्याने उद्यापासून भाविकांची गर्दी वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भाविकांचा ओढा वाढणार

आर्थिक स्थिती पूर्वपदावर आल्यानंतर आनंद सागरही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. पण, त्याची तारीख अद्याप सांगण्यात आलेली नाही. आनंद सागर हे शेगाव येथील उद्यान आणि ध्यान केंद्र आहे. येथे मुलांना खेळण्यासाठी विविध सुविधा होत्या. सध्या त्या बंद आहेत. त्यामुळे भाविकांचा ओढा शेगावला जाण्यासाठी कमी झाला होता. आता हळूहळू सर्व पूर्वपदावर येत असल्याने भाविकांची संख्या वाढणार आहे.