मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सशर्त परवानगी दिल्यानंतर आता राज्यात बैलगाडा शर्यतीचं (Bullock cart race) आयोजन करण्यात येत आहे. त्यासाठी आयोजक आणि बैलगाडा मालकही सरसावले आहेत. महाराष्ट्रातील (Maharashtra) पहिल्या बैलगाडा शर्यतीला सांगली जिल्ह्यात अधिकृतरित्या परवानगी मिळाली आहे. सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व नियम पाळून शर्यत भरवण्यासाठी परवानगीचे पत्र दिले आहे. त्यासाठी एकूण 26 नियम आणि अटी देण्यात आल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील नांगोळे गावी 4 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्ली येशील शेतकरी आंदोलनातील संदीप गिड्डे यांच्या पुढाकारातून ही बैलगाडा शर्यत होणार आहे.
दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील मावळ आणि आंबेगाव तालुक्यातील बैलगाडा शर्यतीसाठी बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. बक्षीस खालील स्वरुपात…
प्रथम क्रमांक : एक मोटारसायकल
द्वितीय क्रमांक : 1 लाख 51 हजार रुपये रोख आणि अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी
तृतीय क्रमांक : 1 लाख रुपये रोख आणि अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी
चौथा क्रमांक : 75 हजार रुपये रोख आणि अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी
या बैलगाडा शर्यतीमध्ये 500 बैलगाड्या सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
प्रथम क्रमांक : 1 लाख रुपये रोख आणि त्यात पहिला आणि दुसरा यांना LED टीव्ही संच
द्वितीय क्रमांक : 75 हजार रुपये रोख आणि त्यात पहिला आणि दुसरा यांना दोन फ्रिज
तृतीय क्रमांक : 55 हजार रुपये रोख आणि त्यात पहिला आणि दुसरा यांना दोन जुंपतेगाडे
चौथा क्रमांक : 41 हजार रुपये रोख आणि दुसऱ्याला 7 हजार रुपये
पाचवा क्रमांक : 31 हजार रोख आणि दुसऱ्याला 5 हजार रूपये रोख
घाटाचा राजा : सोन्याची अंगठी
विशेष आकर्षण फायनल : मोटरसायकल
द्वितीय क्रमांक : सोन्याची अंगठी
तृतीय क्रमांक : सोन्याची अंगठी
चौथा क्रमांक : सोन्याची अंगठी
या बैलगाडा शर्यतीमध्ये 701 बैलगाड्या स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे देखील बंधनकारक असणार आहे. बैलगाडा शर्यतीत बैलांना इलेक्ट्रीक शॉक देणे, त्यांना बेदम मारहाण करणे असे प्रकार सर्सास होत असल्यानेच कोर्टाने शर्यतीवर बंदी घातली होती, असा कुठलाही प्रकार पुन्हा घडू नये असे आदेश न्यायलयाकडून देण्यात आले आहेत, मोठ्या प्रयत्नानंतर सुप्रीम कोर्टाने ही बंदी उठवली आहे, त्यामुळे हेही नियम शर्यतीत पाळावे लागणार आहेत. बैलगाडा शर्यतीसाठी येणाऱ्या प्रेक्षकांनी लसीचे दोन डोस घेतलेले असणे बंधनकारक आहे, कारण राज्यात सध्या ओमिक्रॉनचा फैलाव वाढल्याने पुन्हा निर्बंध लावले जात आहेत. अशातच या शर्यती पार पडत असल्याने कोरोना नियमांचे भान राखावे लागणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
इतर बातम्या :