वर्ध्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. वर्ध्यात एसटी महामंडळाची बस उलटली आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपघातानंतर बघ्यांची मोठी गर्दी परिसरात जमली आहे. तर काही स्थानिकांनी तातडीने बसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून स्थानिकांनी पोलिसांना याबाबत फोनवर माहिती दिली. त्यानंतर लगेच स्थानिक नागरिकांनी मदतकार्याला सुरुवात केली.
यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने सर्व प्रवाशांना बसमधून काढण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु केले. तसेच तातडीने रुग्णावाहिका घटनास्थळाच्या दिशेला रवाना करण्यात आल्या. जखमींवर तातडीने उपचार व्हावेत या हेतूने तातडीने रुग्ण रुग्णालयाच्या दिशेला रवाना करण्यात आले. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
वर्धा जिल्ह्यातील धाडी शिवारात एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झालाय. बस पलटी झाल्याने 31 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी 5 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बस वरुडहून तळेगावकडे बस जात होती. बसमध्ये जवळपास 45 प्रवासी प्रवास करत होते. पण धाडी शिवारात एसटी बस रस्त्यावर पलटी झाल्याची घटना घडली.
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. अपघाताच्या स्थानिकांकडून तातडीने मदतीसाठी प्रयत्न सुरु झाले. घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलीस आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. घटनेनंतर जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने अमरावतीच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. स्थानिक नागरीक आणि पोलिसांकडून घटनास्थळी मदतकार्य सुरु आहे.