मुंबई : 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 11 वी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षा होणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. त्यानुसार आता 11 वी प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान ही सीईटी परीक्षा होणार आहे. राज्यभरात एकाच वेळी ही परीक्षा घेतली जाईल, असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे 10वी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांनी आता सीईटीसाठी तयारीला लागण्याची गरज आहे. (Date of CET examination for 11th admission announced)
राज्य शासनाच्या निर्णयानुसार आता अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार आहे. त्यासाठी येत्या 19 जुलैपासून ऑनलाईन नोंदणीस सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली. अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. 19 जुलैपासून सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. दरवर्षी दहावीतील गुणांच्या आधारे अकरावीची प्रवेश प्रक्रिया होते. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी वेगळे शुल्क आकारले जाणार नाही.
>> अकरावीची प्रवेशासाठी CET परीक्षा
>> इयत्ता 11 वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET परीक्षा
>> प्रवेश परीक्षेत राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न
>> गुण – 100
>> बहुपर्यायी प्रश्न
>> परीक्षा OMR पद्धतीने
>> परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी
>> कॉलेजमध्ये प्रवेशाचे निकष काय?
>> CET परीक्षेच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेश
>> CET परीक्षा देणाऱ्यांना 11 वी प्रवेशप्रक्रियेत प्राधान्य
>> त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश
>> CET परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन इयत्ता 10 वीच्या पद्धतीनुसार
यंदा इयत्ता दहावीचा निकाल 99.95 टक्के लागला आहे. तर यामध्ये तब्बल 957 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 टक्के गुण मिळाले आहेत. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी 5 टक्के जास्त विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. तर 83 हजार 962 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. यंदाही कोकण विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. कोकणात 31 हजार 168 विद्यार्थ्यांपैकी सर्वच विद्यार्थी परीक्षेत पास झाले आहेत. त्यामुळे विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर सर्वाधिक कमी निकाल नागपूर विभागाचा म्हणजे 99.84 टक्के लागला आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल 99.96% असून विद्यार्थ्यांचा निकाल 99.94% आहे. म्हणजेच विद्यार्थीनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा 0.02% ने जास्त आहे.दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 97.84% लागला आहे.
100 टक्के घेणारे 957 विद्यार्थी
राज्यात 100 टक्के घेणारे 957 विद्यार्थी आहेत
90 टक्के पेक्षा जास्त गुण घेणारे 1,04,633 विद्यार्थी आहेत
85 ते 90 टक्के दरम्यान गुण घेणारे 1,28,174 विद्यार्थी आहेत
80 ते 95 टक्के दरम्यान गुण घेणारे 1,85,542 विद्यार्थी आहेत
शालेय फी च्या मुद्यावरुन मनसे विद्यार्थी सेनेची उच्च न्यायालयात धाव, राज्य सरकारसह शिक्षणसंस्थांविरोधात याचिका दाखलhttps://t.co/aWJbWEwyRN#MNS | #MNVS | #Education | #MumbaiHighCourt
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 19, 2021
संबंधित बातम्या :
Maharashtra SSC Result 2021 Declared : दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 99. 95 टक्के
Date of CET examination for 11th admission announced