नाशिकः नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात आज रविवारी पावसाची शक्यता शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 20 ऑक्टोबरपर्यंत उत्तर महाराष्ट्रात पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज, हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, शहरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे.
सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. त्यात आज 17 ऑक्टोबर रोजी नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड जालना, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली, भंडारा गोंदिया, औरंगाबाद, बीड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. खरे तर 14 ऑक्टोबर रोजी राज्यभरातून मान्सूनने एक्झिट घेतली आहे. मात्र, मध्य व दक्षिण भारतात तो आणखी काही दिवस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पुन्हा मंगळवार आणि बुधवारी रोजी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जवळपास 25 ऑक्टोबरनंतर पावसाळी वातावरण हटण्याचा अंदाज आहे.
मनमाड, नांदगाव परिसरात दोन दोनदा ढगफुटी सदृश अतिवृष्टी झाली. यंदा नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर चार वेळेस पूर आला.नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण भरले आहे. गंगापूर धरण समूहात गंगापूर (मोठे), काश्यपी (मध्यम), गौतमी गौदावरी (मध्यम) आणि आळंदी (मध्यम) ही चार धरणे आहेत. यातील सारीच धरणे भरली आहेत. त्यामुळे यंदा नाशिककरांची पाणी चिंता मिटली आहे. दुसरीकडे मुंबईला पाणीपुरवठा करणारे इगतपुरी तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे अप्पर वैतरणा धरण भरले आहे. त्यामुळे तूर्तास मुंबईकरांचाही पाणीप्रश्न मिटला आहे. वैतरणा धरण गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये भरले होते. यावर्षी त्याला भरण्यासाठी एक महिन्याचा उशीर लागला.
मराठवाड्यात जास्त पाऊस
विशेष म्हणजे यंदा मराठवाड्याने सरासरीच्या बाबतीत कोकणालाही मागे टाकले. राज्यात यंदा जालना जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस झाला. राज्यात चार जिल्ह्यांत सरासरीपेक्षा सर्वात जास्त पावसाची नोंद झाली. नंदुरबार, सांगली, अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. आयएमडीच्या अहवालानुसार, 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत पुढीलप्रमाणे पाऊस पडला.
इतर बातम्याः
तीन वर्षांपासून 61 कोटींचे अनुदान थकले; नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मदतीसाठी सरकारकडे डोळे!
अमळनेरात परिवर्तनाची नांदी; नागरिकांनी वेश्या व्यवसायाला विरोध करणारे घराबाहेर लावले फलक!
तीन वर्षांपासून 61 कोटींचे अनुदान थकले; नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मदतीसाठी सरकारकडे डोळे!https://t.co/HVLVGuevvy#Nashik|#heavyrains|#farmersincrisis|#nohelp|#Nogrants
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 17, 2021