धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यामागे फडणवीसांचा कट, चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप

“धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यामागे फडणवीसांचा कट”, चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप

| Updated on: Oct 09, 2022 | 8:59 AM

शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आलं. त्यानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दत्ता कानवटे, औरंगाबाद : शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आलं. त्यानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. चिन्ह गोठवण्याचं हे सगळं कारस्थान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलंय. त्यांनी कट रचला आणि चिन्ह गोठवलं, असा गंभीर आरोप खैरे यांनी केलाय. तसंच आनंद दिघेसाहेब असते तर एकनाथ शिंदेंना उलटं टांगलं असतं, असंही ते म्हणालेत. तसंच येणाऱ्या काळात महाराष्ट्रातून भाजप संपून जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Oct 09, 2022 08:51 AM