चंद्रकांत पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य, शाईफेक, पोलिसांचं निलंबन, आणि माफीनामा, तीन दिवसांत काय-काय घडलं?

| Updated on: Dec 12, 2022 | 10:56 PM

चंद्रकांत पाटलांवरच्या शाईफेकीच्या निषेधार्ह भाजपनं काल मोर्चा काढला. दुसरीकडे शाईफेकणाऱ्यावर हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केल्याच्या विरोधात मोर्चा निघाला.

चंद्रकांत पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य, शाईफेक, पोलिसांचं निलंबन, आणि माफीनामा, तीन दिवसांत काय-काय घडलं?
Follow us on

मुंबई : वादग्रस्त विधान आणि शाईफेक वादावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी माफी मागितलीय. या वादावर माझ्याकडून पडटा टाकतोय. आणि इतरांनीही हा वाद थांबवावा, असं आवाहन चंद्रकांत पाटलांनी केलंय. वादग्रस्त विधान शाईफेकीच्या घटनेनंतर मंत्री चंद्रकांत पाटलांनी लिखीत स्वरुपात माफी मागितलीय. आणि त्याबरोबरच पोलिसांचं निलंबन आणि पत्रकारावरची कारवाई मागे घेण्याचं आवाहनही केलंय. मात्र मागच्या 3 दिवसांत या प्रकरणाला अनेक फाटेही फुटले.

चंद्रकांत पाटलांवरच्या शाईफेकीच्या निषेधार्ह भाजपनं काल मोर्चा काढला. दुसरीकडे शाईफेकणाऱ्यावर हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केल्याच्या विरोधात मोर्चा निघाला.

शाईफेकीचा प्रकार, त्या घटनेचं चित्रीकरण आणि त्याचं समर्थन केल्याच्या आरोपात चंद्रकांत पाटलांनी चौफेर टीका केली.

हे सुद्धा वाचा

शाईफेकीवरुन कलम 307 दाखल झाल्यामुळे सोशल मीडियात अनेक प्रश्नही विचारले गेले. जर शाईनं हत्येचा प्रयत्न होत असेल, तर पेनाला शस्र म्हणावं का? पेन वापरणारे आणि शाई बनवणाऱ्यांना सहआरोपी करावं का, यासंदर्भातले प्रश्न उपस्थित करत राजू शेट्टींनी शाईफेकीचा निषेध करताना दाखल कलमांवर टीका केली.

ज्या तरुणानं मंत्री चंद्रकांत पाटलांवर शाईफेक केलीय, त्या व्यक्तीवर एकूण 12 कलमं दाखल केली गेली. आयपीसी म्हणजे भारतीय दंड संहितेनुसार 8 फौजदारी कायद्यातंर्गत 1 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत 3 गुन्ह्यांचा समावेश आहे.

शाईफेक करणाऱ्यावर कोणकोणती कलमं?

कलम 307 म्हणजे हत्येचा प्रयत्न
कलम 355- व्यक्तीस जाणीवपूर्वक दुखापत करणं
कलम 353- लोकप्रतिनिधीला कामापासून धाकानं परावृत्त करणं
कलम 394- सार्वजनिक ठिकाणी अश्लील शिवीगाळ
कलम 500- मंत्री किंवा लोकसेवकाची मानहानी
कलम 501- अब्रुस नुकसान करणं
कलम 120 ब- फौजदारीपात्र कट रचणं
फौजदारी कलम 7- कामाच्या ठिकाणी अवमान करणं
महाराष्ट्र पोलिस अधिनियम 135- सार्वजनिक शांततेचा भंग करणं

दरम्यान शाईफेकीचं चित्रीकरण करणाऱ्या पत्रकाराच्याही चौकशीची मागणी पाटलांनी केली होती. काल पोलिसांनी पत्रकार गोविंद वाकडे यांना चौकशीनंतर सोडून दिलंय.

सुरक्षेत ढिसाळपणाच्या आरोपात पिंपरी-चिंचवडच्या 11 पोलिसांचं निलंबन तर इतर दोन अधिकाऱ्यांची बदली झालीय.

‘या’ पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन

गुन्हे शाखा, युनिट 2चे पोलीस निरीक्षक सतीश नांदूरकर
पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे
ASI भाऊसाहेब सरोदे
ASI दीपक खरात
पोलीस हवालदार प्रमोद वेताळ
पोलीस नाईक देवा राऊत
पोलीस नाईक सागर अवसरे
गणेश माने
महिला पोलीस कांचन घवले
प्रियांका गुजर यांचं निलंबन करण्यात आलंय.

दुसरीकडे पिंपरीचे पोलीस निरीक्षक शंकर अवताडे विशेष शाखेला तर चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडेंची पिंपरी वाहतूक विभागाला बदली केली गेलीय.

दरम्यान याआधी विरोधकांनीच या प्रकरणात माफी मागावी, अशी मागणी राम कदमांनी केली होती. पण आता चंद्रकांत पाटलांनी एक पत्रक काढून पोलिसांवरचं निलंबन आणि पत्रकारावरची कारवाई मागे घेण्याचं आवाहन केलंय.