भाजपकडून चित्रा वाघ यांना मोठी जबाबदारी, चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

| Updated on: Nov 03, 2022 | 8:11 PM

लोकांपर्यंत पोहचविण्याचं काम करू, असा आशावाद चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं.

भाजपकडून चित्रा वाघ यांना मोठी जबाबदारी, चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी चित्रा वाघ यांची निवड
Image Credit source: tv 9
Follow us on

पुणे : भाजपकडून चित्रा वाघ यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी चित्रा वाघ यांची निवड करण्यात आली. पत्रकार परिषदेमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे. सरकार स्थापनेनंतर चित्रा वाघा यांना नेमकं कोणत पदं दिले जाणार, याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. त्यात आता भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी चित्रा वाघ यांना देण्यात आलीय.

संपूर्ण राज्याला चित्रा वाघ यांनी संबंध विकसित केले. संघटन वाढीकरिता प्रयत्न करतील. महिला भाजपत प्रवेश करतील. महाविकास आघाडीतील चांगलं काम करणाऱ्या महिला भाजपात येतील, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

राजकारणातून सत्ता निर्मिती होते. महिलांची मतं महत्वाची असतात. सरकार सर्वसामान्य व्यक्तीला न्याय देते. लोकशाहीची पद्धत महिलांपर्यंत पोहचली पाहिजे. मतदान करून प्रभाविपणे राज्यात पक्षाची प्रतिमा पोहचविण्याचं काम या माध्यमातून केले जाईल.

यासाठी चित्रा वाघ या काम करतील. राज्यातील महिला अत्याचाराबद्दल त्यांनी आवाज उचलला. राज्यात महिलाशक्ती निर्माण करण्यासाठी चित्रा वाघ यांची निवड करण्यात आली. महिला मोर्चाला प्रचंड ताकद मिळेल. राज्यातील महिला मोर्चा देशातील चांगला असेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चांगल्या परिस्थितीत महिला मोर्चा आहे. उमाताई खापरे यांची जागा ते आता घेतली. जबाबदारी एकत्रितपणे सांभाळू. सत्तेमध्ये आहोत. त्यामुळं मोठी जबाबदारी आहे. महिलांचं पोषणासाठी महिला मोर्चा काम करेल. राज्याचे 50 ते 60 अडीच महिन्यातील निर्णय महिला व बालकांसाठी आहे. ते लोकांपर्यंत पोहचविण्याचं काम करू, असा आशावाद चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं.