Chandrashekhar Bawankule | ‘शेतकऱ्यांवर आलेली आत्महत्येची नामुष्की ही राज्य सरकारमुळे’

| Updated on: Mar 07, 2022 | 5:49 PM

शेतकऱ्यांवर (Farmers) आलेली आत्महत्येची नामुष्की ही राज्य सरकारमुळे असल्याचा आरोप भाजपा (BJP) नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला आहे.

शेतकऱ्यांवर (Farmers) आलेली आत्महत्येची नामुष्की ही राज्य सरकारमुळे असल्याचा आरोप भाजपा (BJP) नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला आहे. आमच्या काळात आम्ही 28 हजार कोटींची वीज दिली, मात्र कधीही कनेक्शन कापलं नाही. आमच्या चुकीमुळे झाले अे जे बोलतात त्यांना आजही माझा दावा आमच्यासोबत बसा शेतकऱ्यांचे भले करूनही कंपन्या फायद्यात राहतील, असे ते म्हणाले. तर ओबीसी विधेयक एकमताने मंजुर झाले खरे पण सरकारच्या हेतूवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. आजवर जे केले ते तरी इथून पुढे करू नका. ओबीसीला न्याय मिळावा, यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत हे बिल टिकवा. मुख्यमंत्री येत नाहीत, भेटत नाहीत, हे तर चालतच होते, पण आता मंत्रीही कॅबिनेटला येत नाहीत हे राज्याचे दुर्भाग्यच असल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

राज्यपालांच्या वक्तव्याचे औरंगाबादेत तीव्र पडसाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात निषेध ठराव मंजूर
उन्हाळ्यात दुभत्या जनावरांची ‘अशी’ घ्या काळजी अन्यथा होईल नुकसान, काय आहे तज्ञांचा सल्ला?