विधानसभेपूर्वी महायुतीत सुंदोपसुंदी, अजित पवार यांच्या दाव्याला चंद्रशेखर बावनकुळे यांचे उत्तर

| Updated on: Jul 16, 2024 | 12:15 PM

मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. यासाठी सर्व विधिमंडळ मराठा समाजासोबत आहे. पण ओबीसीतून आरक्षण देऊ नये, यासाठी पवारसाहेब आणि विरोधकांची भुमिका स्पष्टपणे समोर येत नाही. त्यामुळे छगन भुजबळ यांनी घेतलेला पुढाकार योग्य आहे. शरद पवार साहेब यांना भेटून सर्वच पक्षांनी या सामाजिक प्रश्नावर मदत करावी.

विधानसभेपूर्वी महायुतीत सुंदोपसुंदी, अजित पवार यांच्या दाव्याला चंद्रशेखर बावनकुळे यांचे उत्तर
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

विधानसभा निवडणुकीस अजून काही महिने आहेत. त्यापूर्वी विधासभेच्या जागांवर दावे प्रतिदावे केले जात आहेत. तसेच लोकसभेतील पराभवासंदर्भातही आरोप-प्रत्यारोप होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी अहमदनगर मतदार संघातून निलेश लंके आपल्या पक्षाकडून लढण्यास तयार होते. त्यासंदर्भात मी भाजप नेत्यांशी चर्चा केली होती. परंतु ही जागा भाजपची होती. त्यांनी देण्यास नकार दिली. त्यामुळे ते शरद पवार यांच्याकडे गेले. तसेच नवाब मलिक यांना विधानसभेचे तिकीट अजित पवार देणार आहे. या सर्व विषयांवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मौन सोडले. त्यांनी अजित पवार यांच्या दाव्याला उत्तर दिले.

निलेश लंकेची जागा भाजपची होती

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महायुतीचा फॅार्म्युला ठरला आहे. जिंकण्याचे निकष आणि सिटिंग जागेत जास्त जास्त ताकद लावण्यात येणार आहे. कोणती जागा कुणाला यापेक्षा जागा जिंकणे महत्त्वाचे आहे. अजित पवार सुजित विखे यांच्यासंदर्भात बोलले. परंतु सुजय विखे लोकसभा निवडणुकीपूर्वी खासदार होते. त्यामुळे जिथे सिटिंग खासदार आहे. त्या ठिकाणी चर्चेला अर्थ नसतो. त्या ठिकाणची जागा भाजपकडे असल्याने अदला बदलीचा प्रश्नच नव्हता. सुजय विखे यांनी उत्कृष्ट काम केले आहे.

अजित पवार यांनी २८८ जागांवर सर्वेक्षण करावे

नवाब मलीक यांना अजीत दादा तिकीट देणार हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण ती चर्चा करणे आवश्यक आहे. काही विषय राज्यासाठी महत्त्वाचे आहेत. या विषयावर अजितदादांसोबत आमचे नेते बसून चर्चा करतील. पण आज कपोलकल्पित बातम्या करणे योग्य नाही. सध्या ओबीसी आणि मराठा या दोन समाजात तेढ निर्माण झाला आहे. अजित दादा यांचा पक्ष आहे. त्यांना सर्वेक्षण करण्याचा अधिकार आहे. २८८ जागांवर त्यांनी सर्वेक्षण केले पाहिजे. याबाबत दुमत नाही, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

आरक्षणावर शरद पवार यांची भूमिका समोर यावी

मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. यासाठी सर्व विधिमंडळ मराठा समाजासोबत आहे. पण ओबीसीतून आरक्षण देऊ नये, यासाठी पवारसाहेब आणि विरोधकांची भुमिका स्पष्टपणे समोर येत नाही. त्यामुळे छगन भुजबळ यांनी घेतलेला पुढाकार योग्य आहे. शरद पवार साहेब यांना भेटून सर्वच पक्षांनी या सामाजिक प्रश्नावर मदत करावी. राज्याचा सलोखा कायम रहावा, यासाठी भुजबळ यांचा पुढाकार आहे. भुजबळ यांची विनंती शरद पवार मान्य करतील, असे मला वाटते.

काही लोक आम्ही योजना आणली असा आवेश करत आहेत. पण मुलं कुणाचे ? बारसं कोण करतंय? लाडू कोण खात आहे? त्यामुळे आम्ही ठरवले जनसंवाद यात्रा करायची, सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवायच्या, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.