शिंदे गटात उपमुख्यमंत्रिपदावरून ट्विस्ट? एकनाथ शिंदे यांच्याऐवजी ‘या’ नेत्याचे लागले पोस्टर, नेमकं काय घडतंय?

| Updated on: Dec 01, 2024 | 10:15 AM

Chhatrapati Sambhajinagar Poster : शिंदे गटात उपमुख्यमंत्रिपदावरून ट्विस्ट आला आहे का? अशी चर्चा होऊ लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्याऐवजी शिवसेनेच्या बड्या नेत्या नेत्याचे पोस्टर लागले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदी कोण असणार याची चर्चा होत आहे, नेमकं काय घडतंय? वाचा सविस्तर...

शिंदे गटात उपमुख्यमंत्रिपदावरून ट्विस्ट? एकनाथ शिंदे यांच्याऐवजी या नेत्याचे लागले पोस्टर, नेमकं काय घडतंय?
एकनाथ शिंदे, नेते शिवसेना
Image Credit source: ANI
Follow us on

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठ दिवस झाले आहे. मात्र अद्यापर्यंत सरकार स्थापन झालेलं नाही. अशात एकनाथ शिंदे यांनी आधी मुख्यमंत्रिपदावर दावा केला. मात्र नंतर पत्रकार परिषद घेत नरेंद्र मोदी आणि अमित शाह ज्याचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी ठरवतील त्याला आमचा पाठिंबा असेल, असं एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेतून जाहीर केलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपदाचा आग्रह धरला आहे. तर शिवसेनेने उपमुख्यमंत्रिपद घेतलं तर उपमुख्यमंत्री कोण असेल? यावर चर्चा होत आहे. अशातच एकनाथ शिंदेंच्या गटातील नेत्याच्या नावाचे उपमुख्यमंत्रिपदासाठी पोस्टर लागलेत.

शिरसाट यांच्या नावाचे बॅनर्स

छत्रपती संभाजीनगरमध्ये ठिकठिकाणी उपमुख्यमंत्रिपदाबाबत बॅनर लागलेत. संजय शिरसाट यांचे भावी उपमुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. राज्यात सत्ता स्थापनेचा कायम असतानाच संजय शिरसाट यांच्या समर्थकांकडून भावी उपमुख्यमंत्री म्हणून बॅनरबाजी करण्यात आली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर संजय शिरसाट यांच्यासाठी बॅनरबाजी करण्यात येत आहे. दोन दिवसा अगोदर एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेतील असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलेले होतं. त्यानंतर संजय शिरसाटांच्या नावाचे पोस्टर्स लागले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोण?

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोण असणार? गृहखातं कुणाकडे असणार? एकनाथ शिंदे हे उपमंत्रिपद स्वीकारणार का? हे प्रश्न मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रभरात चर्चेत आहेत. अशातच एकनाथ शिंदे हे स्वत: उपमुख्यमंत्रि होण्यास तयार नसल्याचं बोललं जात आहे. पण असं असताना जर शिंदे गटाला उपमुख्यमंत्रिपदी कोण असणार? याची चर्चा होतेय. अशातच शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्या हे उपमुख्यमंत्रि असतील, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत.

एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष

एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरेगावात आहेत. ते काहीच वेळात मुंबईत येणार असल्याची माहिती आहे. तर महत्वाच्या नेत्यांसोबत एकनाथ शिंदे बैठक करणार आहेत. तर महायुतीची देखील आज संध्याकाळी बैठक होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आज काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.