एकनाथ शिंदेंसोबत सावलीसारखे राहणारे शिलेदार बंडाच्या तयारीत, महायुतीला देणार आव्हान

| Updated on: Oct 21, 2024 | 5:39 PM

nanded mukhed assembly constituency: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव राहिलेले बालाजी खतगावकर यांनी बंडाचे निशाण फडकवले. त्यांनी कार्यकर्त्याचा मेळावा घेऊन अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून बालाजी खतगावकर मुखेड मतदार संघात प्रचार करत होते.

एकनाथ शिंदेंसोबत सावलीसारखे राहणारे शिलेदार बंडाच्या तयारीत, महायुतीला देणार आव्हान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us on

nanded mukhed assembly constituency: विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली आहे. भाजपने आपल्या ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपची यादी जाहीर होताच बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कधीकाळी सावलीसारखे राहणारे शिलेदार बंडाच्या तयारीत आहेत. नांदेडमधील मुखेडमध्ये ते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला आव्हान देणार आहे. यामुळे महायुतीत हा मिठाचा खडा पडणार आहे.

कोणी दिले आव्हान

नांदेड जिल्हयातील मुखेड विधानसभा मतदार संघासाठी भाजपाने विद्यमान आमदार तुषार राठोड यांच्या उमेदवारीची घोषणा रविवारी केली. मात्र त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव राहिलेले बालाजी खतगावकर यांनी बंडाचे निशाण फडकवले. त्यांनी कार्यकर्त्याचा मेळावा घेऊन अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून बालाजी खतगावकर मुखेड मतदार संघात प्रचार करत होते. शिवसेनेची उमेदवारी मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र मुखेडची जागा भाजपाची असल्याने तिथे भाजपाने उमेदवार जाहीर केला. त्यामुळे बालाजी खतगावकर यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली. आता माघार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले बालाजी खतगावकर

मुखेडमध्ये भाजप उमेदवाराविरोधात सामना रंगणार आहे. त्यासंदर्भात बोलताना बालाजी खतगावकर म्हणाले, या लढतीशी मुख्यमंत्र्यांचा संबंध नाही. निवडणूक लढने हा माझा मूलभूत अधिकार आहे. त्यानुसार अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. आता माघार घेणार नाही.

हे सुद्धा वाचा

कोण आहे बालाजी खतगावकर

गेली 37 वर्षे प्रशासकीय सेवेत काम करणारे बालाजी पाटील खतगावकर निवडणूक रिंगणात उतरत आहेत. गेल्या पंचवीस वर्षांपासून ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अधिकारी म्हणून खतगावकर यांची ओळख होती. शासकीय सेवेतील निवृत्तीनंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी नांदेडच्या मुखेड – कंधारमधून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. परंतु या मतदार संघावर आता भाजपचा उमेदवार जाहीर झाला आहे.