mahayuti press conference: पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात महाराष्ट्र सरकारने मोठी कामे केली आहेत. महाविकास आघाडीच्या काळात गुंतवणुकीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर होते. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणली आहे. ते करार पूर्ण होत आहे. गडचिरोलीसारख्या नक्षलवादी भाग आणि आदिवासी भागात गुंतवणूक पोहचली आहे. उद्योजकांसाठी आम्ही रेड कार्पेट आखले आहे. महाराष्ट्रात सेमी कंडक्टरचा प्रकल्प आला आहे. उद्योजकांना हव्या त्या सुविधा देत आहोत. परंतु ती लोक गुजरातची प्रसिद्धी करत आहेत. कर्नाटकची प्रसिद्ध करत आहेत. आम्ही सर्व आकडेवारी समोर ठेवली आहे. महाराष्ट्रच गुंतवणुकीबाबत पहिल्या क्रमांकावर आहे. ही लोक राज्याची बदनामी करत आहेत. त्यांनी विरोध करावा, पण विरोधाला विरोध नको, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
महायुतीकडून बुधवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी मविआवर जोरदार हल्ला केला. ते म्हणाले, लाडकी बहीण योजनेसाठी आमचे टार्गेट २ कोटी ५० लाख होते. आता २ कोटी ३० लाख महिलांच्या खात्यात पैसे गेले. नोव्हेंबर महिन्यात आचरसंहिता लागणार आहे, हे माहीत होते. त्यामुळे ते पैसे ऑक्टोंबर महिन्यात देऊन टाकले, असे एकनाथ शिंदे यांनी केला.
शासन आपल्या दारी योजनेतून पाच कोटी लोकांना लाभ मिळाले. महायुती सरकारने दोन अडीच वर्षांत जे कामे केली आहे, ते समोर ठेवले आहे. दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहचवण्याच्या योजना आम्ही आणल्या आहे. १४५ सिंचन योजना आम्ही आणल्या आहेत. दोन अडीच वर्षांत आम्ही ९०० निर्णय घेतले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, विरोधी पक्ष लाडकी बहिणीवर टीका करतो. मुलींना मोफत शिक्षण देणार कुठलं सांगत आहे. सरकारकडे पैसे नाही. पण त्यांचे नेते म्हणतात, आमचं सरकार आलं की आम्ही २ हजार रुपये देऊ. मग विरोधकांनी ठरवलं पाहिजे सरकारकडे आहे की नाही. आम्ही काही योजना सांगितल्या आहेत. आणखी योजना जाहीरनाम्यात देणार आहोत. विरोधक कन्फ्यूज आहेत. सरकारकडे पैसे नाही म्हणतात आणि नवनवीन योजना विरोधक सुरू करत आहेत.