चिपळूण शहरामध्ये सध्या पुन्हा पावसाला सुरुवात झालीय. चिपळूण शहरातील पाणी अद्यापही ओसरलेलं नाही. चिपळूण शहरातील भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूणमध्ये अनेक लोक पुरात अडकेलेले आहेत.
तर बस स्थानक पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं दिसत आहे. बससुद्धा पाण्यात आहेत.
चिपळूण शहरात 202 मिमी पडलेला पाऊस, धरणातून सोडण्यात आलेले पाणी भरतीची स्थिती त्यामुळे चिपळूणमध्ये 2005 पेभा भयानक स्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुराच्या स्थितीचा आढावा घेतला आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या दोन हेलिकॉप्टर चिपळूणकडे रवाना झाली असून मदतकार्य करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण शहरामध्ये पूर परिस्थिती आवाक्याच्या बाहेर गेली आहे. राज्य सरकारने तातडीने जातीनिशी लक्ष घालून लोकांचे जीव वाचवण्याची गरज आहे, असं मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केलंय.
रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळुणात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरात पाणी शिरले असून 2005 ची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती नागरिकांना लागून राहिली आहे.
रात्रीपासून शहरातील बाजारपेठ ,खेर्डी मध्ये मध्ये पाच फुटापेक्षा जास्त पाणी शिरले असून अख्खी बाजारपेठ पाण्याखाली आहे. याशिवाय शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असून मुंबई-गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे . तर शहरातील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले आहेत.