विद्या चव्हाण यांच्या धाकट्या मुलाने वहिणीवर हात टाकला, विनयभंग केला; चित्रा वाघ यांचा खळबळजनक आरोप

| Updated on: Jul 30, 2024 | 4:29 PM

विद्या चव्हाण यांनी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर आरोप करत काही ऑडियो क्लिप ऐकवल्या. चित्रा वाघ यांनी मला त्रास देण्यासाठी माझ्या घरातल्या लोकांना भडकवलं असा आरोप चव्हाण यांनी केल्यानंतर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या आरोपांवर जोरदार प्रतिहल्ला केलाय.

विद्या चव्हाण यांच्या धाकट्या मुलाने वहिणीवर हात टाकला, विनयभंग केला; चित्रा वाघ यांचा खळबळजनक आरोप
Follow us on

विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांच्या कथित ऑडिओ क्लिप ऐकवल्या. त्यानंतर लगेचच चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत विद्या चव्हाण यांना उत्तर दिलं. मी पीडित महिलाला मदत केली. याचा मला अभिमान आहे असं त्यांनी म्हटलं. चित्रा वाघ म्हणाल्या की, खोटे प्रकरणात लोकांना त्रास दिला जात आहे. चित्रा वाघ या माझ्या सुनेला शिकवत होत्या. माझी सून गौरीला भडकवले जात होते. त्यावर आता चित्रा वाघ यांनी उत्तर दिले आहेत. सनसनाटी पसरवण्याचा प्रयत्न केला. माझ्याबद्दल चांगलं बोलतील अशी काही अपेक्षाच नाही. माझ्या विरोधात याच्याआधीही मी कशी वाईट आहे असा प्रयत्न केला आहे. विद्या ताई या हाऊसमध्ये नसल्याने त्यांना माहित नाही. सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचं ते बोलणं होतं. जे बोललेला संवाद आहे तो पटलावर आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडला होता.’

पायाचे कातडे काढून पक्षाला दिले – चित्रा वाघ

‘चित्रा वाघ यांना आम्ही मोठं केलं असं त्या म्हणाल्या. पण मी काम केलं त्यामुळे मला पक्षाने संधी दिली. २० वर्षात पायाचे कातडे काढून पक्षाला दिले. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे केली. माझ्यात काही क्वालिटी होती म्हणून पक्षाने मला ही जबाबदारी दिली. कुठलीही अपेक्षा न ठेवता पक्षासाठी मी काम केलं. माझ्यासोबत तुम्ही काय काय केलं हे मला सांगायला लावू नका. मूठ झाकलेली आहे. उघडायला लावू नका. आम्हाला शहाणपणा शिकवायला लावू नका. जे तुम्ही पेराल ते उगवेल हे मला सांगायचं आहे.’

अनिल देशमुख यांच्या पेनड्राईव्हची प्रतिक्षा – वाघ

‘पेन ड्राईव्हचा जो आवाज ऐकवला खरतर महाराष्ट्राच्या जनतेला आम्हाला सांगायचं आहे. पेन ड्राईव्हची वाट तर आम्ही अनिल देशमुख यांची बघत होता. ज्यांनी मोठ्या आवाजात पेन ड्राईव्ह दाखवला. मी चॅलेंज केलं होतं आज ही करते. पुरावे द्या. तीन तासात तुमच्या सर्व क्लिप व्हायरल करु. मार्च २०२० मध्ये एक डॉक्टर माझ्याकडे आले होते. त्यांनी सांगितलं एका महिलेला त्रास होत होता. तिथे यांची सून आली होती. तिचे बाबा पण आले होते. त्यांनी सांगितलं त्यांच्या मुलीसोबत काय काय केलं. तिच्यावर गलिच्छ आरोप केला.

मुलगी झाल्याने सुनेचा छळ केला – वाघ

त्यांना पहिला मुलगा हवा होता. पण मुलगी झाली. नंतर दुसरीपण मुलगी होती. तिची डेथ झाली. डॉक्टरांनी सांगितलं आता तिला मुल होऊ शकत नाही. असं गौरीने सांगितलं. त्याच्यानंतर तिचा छळ सुरु झाला. असं त्या मुलीने आणि तिच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं. कशा पद्धतीने शिवगाळ होते. मारहाण होते. या बाईच्या धाकट्या मुलाने वहिणीवर हात टाकला तिचा विनयभंग केला. तिने जेव्हा हे घरी सांगितलं. तेव्हा तिने म्हटलं घरात या गोष्टी होतात. या गोष्टी बाहेर काढायच्या नाही. पोलिसात तक्रार करायला गेले तर पोलिसांनी हाकलून दिलं.’