नंदुरबारमध्ये दोन गटात तणाव, दगडफेक आणि मोठा राडा, नेमकं काय घडलं?

| Updated on: Sep 19, 2024 | 5:46 PM

नंदुरबारमध्ये दोन गटात तणाव झाल्याची माहिती समोर येत आहे. या तणावानंतर दोन गटात वाद आणि नंतर दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित घटनेनंतर परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. सध्या परिसरात आता तणावपूर्ण शांतता आहे.

नंदुरबारमध्ये दोन गटात तणाव, दगडफेक आणि मोठा राडा, नेमकं काय घडलं?
नंदुरबारमध्ये दोन गटात तणाव, दगडफेक आणि मोठा राडा
Follow us on

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर असताना आता एक मोठी बातमी समोर आली आहे. नंदुरबार शहरात दोन गटात तणाव निर्माण झाला. त्यामुळे जोरदार वाद झाला. हा वाद इतका टोकाला पोहोचला की, दोन्ही बाजूने जोरदार दगडफेक आणि शिवीगाळ करण्यात आली. संबंधित घटनेमुळे परिसरातील नागरीक प्रचंड भयभयीत झाले. नेमकं काय सुरु आहे? ते समजणं नागरिकांना कठीण होऊन बसलं. यावेळी दगडफेकीमुळे काही नागरीक जखमी देखील झाले. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून कुणीतरी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा तातडीने घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांकडून दोन्ही बाजूच्या गटांना समजवण्याचा आणि शांत करण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही बाजूचे गट ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यामुळे पोलिसांना गर्दी पांगवण्यासाठी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. संबंधित घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत कशाप्रकारे दगडफेक केली जात आहे, ते स्पष्ट दिसत आहे.

परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता

नंदुरबारमध्ये दोन गटात तणाव निर्माण झाला. या तणावानंतर दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे. या दगडफेकीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. नंदुरबारमधील माळीवाडी परिसरात हा दगडफेकीचा प्रकार घडला आहे. दगडफेक झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. माळीवाडी परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. तसेच तशीच परिस्थितीत पुन्हा उद्भवू नये यासाठी पोलिसांकडून सर्वाोतोपरी काळजी घेतली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला वाद आणि नंतर त्याचं रुपांतर दगडफेकीत झाल्याची माहिती मिळत आहे. दगडफेकीनंतर गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ झाल्याचीदेखील माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. त्यानंतर गर्दी काहीशी कमी झाली. तसेच परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात आली.

काही नागरिक जखमी झाल्याची माहिती

या दगडफेकीत काही नागरीक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेतील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा आता परिसरात दाखल आहे. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता बघायला मिळत आहे. पण संबंधित घटना नेमकी का झाली? दगडफेक करणारे कोण होते? याचा तपास पोलिसांकडून केला जाण्याची शक्यता आहे. पोलीस या प्रकरणी सखोल तपास करत आहेत. तसेच परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्व काळजी घेत आहेत.