मुंबई – पंढरपुरातील आषाढी एकादशीची Ashadhi Ekadashi)तयारी पूर्ण झाली असून, त्याचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी घेतला आहे. आषाढीच्या दिवशी पंढरपुरात आरोग्य आणि स्वच्छतेबाबत हयगय नको, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री आणि महत्त्वाच्या व्यक्तींपेक्षा वारकरी, दिंड्या यांच्याकडे जास्त लक्ष द्या, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आषाढी एकदशी निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत पुण्याचे विभागीय आयुक्त, सोपलापूरचे जिल्हाधिकारी, सोलापूर, पंढरपुरातील पोलीस अधिकारी, मुख्य सचिव आणि इतर अधिकारीवर्ग उपस्थित होते. गणपती प्रमाणेच आषाढी एकादशीला जाणाऱ्यांना टोलमाफीची (Toll exemption)घाषणा यावेळी करण्यात आली.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे वारी झाली नव्हती. त्यामुळे यंदा वारकरी मोठ्या उत्साहात आहेत. आषाढीला पंढरपुरात मोठी गर्दी होणार असल्याचे संकेत आहेत. अशा स्थितीत योग्य नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. स्वच्छता, आरोग्य, वाहतूक व्यवस्था, औषधे, साफसफाई, टॉयलेट, रस्ते सफाई, ही व्यवस्था चांगली झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तसेच यात अधिक भर घालावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. मोबाईल टॉयलेट , चेंजिंग रुम्स, रुग्णवाहिका यासाठी गरज असल्यास बाहेरुन मदत घ्या. असे आदेशही देण्यात आले आहेत. स्वच्छता, आरोग यात हयगय नको. पोलीस मनुष्यबळाचा वापर योग्य करा. अशा सूचना देण्यात आल्यात.
वाहतूक व्यवस्था चांगली असावी, खड्डे नकोत. असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. निधी तुम्हाला कमी पडणार नाही. असे आश्वनही शिंदेंनी दिलंय. गणपतीला जशी कोकणात जाणाऱ्यांना टोलमाफी देण्यात येते, तशीच टोलमाफी आषाढीला पंढरपुरला जाण्यासाठीही करण्याची सूचना देण्यात आली आहे. प्रधान सचिव परिवहन यांना याबाबत कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. ४७०० एसटी बस जादा सोडण्यात येणार आहेत. त्यात अधिक बसची आवश्यकता असेल तर त्याही सो़डणण्यात येतील असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. वारकरी संप्रदायाची गैरसोय होणार नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले.
पहिल्यांदाच आपल्यासारख्या कार्यकर्त्याला विठ्ठलाच्या महापूजेची संधी मिळालेली आहे, महापूजेचा मान मिळणार आहे. याबाबत आपण स्वताला भाग्यवान समजतो. असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. कुटुंबीयांसोबत महापूजेला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आरोग्य सुविधा औषधे, फवारणी तसेच तापाची, साथीच्या आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा यांची आतापासूनच व्यवस्था करा.
चिखल, पाऊस, पाणी यामुळे गैरसोय होऊ नये अशी व्यवस्था करा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक अशा गोष्टी मास्क, सनिटायझर्सची आदी बाबींची व्यवस्था करा. पिण्याच्या पाण्याची चांगली व्यवस्था करा. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मदतीने आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. आवश्यक तेथे वैद्यकीय क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांची मदत घ्या. असेही सांगण्यात आले आहे.