‘हिट अँड रन’ प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य, म्हणाले “काही धनदांडगे, राजकारणी लोक…”

| Updated on: Jul 08, 2024 | 1:17 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील वाढत्या हिट अँड रन प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच त्यांनी यात महत्त्वाचे निर्देशही दिले आहेत.

हिट अँड रन प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य, म्हणाले काही धनदांडगे, राजकारणी लोक...
एकनाथ शिंदेंचे ट्वीट
Follow us on

CM Eknath Shinde on Hit And Run case :  गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुण्यासह ठिकठिकाणी हिट अँड रनच्या प्रकरणात वाढ होत आहे. नुकतंच मुंबईतील वरळी भागात एका भरधाव गाडीने दुचाकीला धडक दिली. यात एका महिलेचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह हा ही गाडी चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. आता याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील वाढत्या हिट अँड रन प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच त्यांनी यात महत्त्वाचे निर्देशही दिले आहेत. या प्रकरणांमध्ये दोषी कुणीही असो, मग तो कितीही श्रीमंत, प्रभावशाली, किंवा नोकरशहा, लोकप्रतिनिधींची मुलं तसेच कोणत्याही पक्षाचा असो, त्यांना पाठिशी घातले जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“महाराष्ट्रामध्ये ‘हिट अँड रन’ च्या घटनांमध्ये कुणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाईचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. काही धनदांडगे, राजकारणी लोक त्यांच्या पदाचा गैरवापर करून व्यवस्था वाकविण्याचा प्रयत्न करत असतील, तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

सर्वसामान्य नागरिक हे आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ‘हिट अँड रन’ सारखी प्रकरणे अत्यंत गांभीर्याने हाताळावीत आणि पीडितांना न्याय देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणांमध्ये दोषी कुणीही असो, मग तो कितीही श्रीमंत, प्रभावशाली, किंवा नोकरशहा, लोकप्रतिनिधींची मुलं तसेच कोणत्याही पक्षाचा असो, त्यांना पाठिशी घातले जाणार नाही, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी व आमचे शासन पीडित आणि त्यांच्या कुटुंबिंयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. सर्व जनतेसाठी, सुरक्षित महाराष्ट्रासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.”, असे ट्वीट एकनाथ शिंदेंनी केले आहे.

 

दरम्यान मुंबईतील वरळी भागात हिट अँड रनची घटना घडली. या प्रकरणी शिवसेना पक्षाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह हा ही गाडी चालवत असल्याचे समोर आले. त्यानंतर आता पुण्यातही हिट अँड रनचा प्रकार समोर आला होता. पुण्यात काल मध्यरात्री एका चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एका पोलिस अधिकाऱ्याचा मृ्त्यू झाला आहे. तर एक पोलीस अधिकारी जखमी झाला आहे.