AAP MVA : आप आमदार की आघाडी सरकार? एकीकडे आमदारांना मुंबईत 300 घरं, दुसरीकडे 1 रुपया

| Updated on: Mar 25, 2022 | 12:16 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी मुंबईत (mumbai) आमदारांसाठी 300 घरे बांधणार असल्याची विधानसभेत घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचं काही आमदारांनी स्वागत केलं आहे.

AAP MVA : आप आमदार की आघाडी सरकार? एकीकडे आमदारांना मुंबईत 300 घरं, दुसरीकडे 1 रुपया
आप आमदार की आघाडी सरकार? एकीकडे आमदारांना मुंबईत 300 घरं, दुसरीकडे 1 रुपया
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी मुंबईत (mumbai) आमदारांसाठी 300 घरे बांधणार असल्याची विधानसभेत घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचं काही आमदारांनी स्वागत केलं आहे. तर काही आमदारांनी त्याला विरोध केला आहे. महाराष्ट्रातील (maharashtra) आमदारांच्या या घरावरून चर्चा सुरू असतानाच आपच्या आमदारांच्या निर्णयाची महाराष्ट्रातील आमदारांशीही तुलना होऊ लागली आहे. पंजाबचे आम आदमी पार्टीचे आमदार जसवंत सिंग (jaswant singh) यांनी केवळ एक रुपया मानधन घेणार असल्याचं आणि आमदारांना मिळणारी पेन्शन सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे. यापूर्वी आमदार गुरुदेवसिंग मान यांनीही एक रुपया मानधन घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे सरकारकडून घरे घेणारे आमदार कुठे आणि आमदार म्हणून मिळणारं वेतन आणि पेन्शनवरही पाणी सोडणारे आपचे आमदार कुठे असा सवाल केला जात आहे.

मुख्यमंत्र्यांची घोषणा काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विधानसभेत मोठी घोषणा केली. महाविकास आघाडीचं सरकार फक्त बोलणारं नाही तर करून दाखवणारं सरकार आहे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मुंबईत 300 घरे देणार असल्याचं जाहीर केलं. आमदारांना मुंबईत कायमस्वरुपी घरे देण्याची मागणी शिवसेनेच्या आमदारांकडून करण्यात आली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

आपच्या आमदारांचा काय निर्णय

जसवंत सिंग हे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत. आपल्या विभागातील आरोग्य, स्वच्छता आणि शैक्षणिक सुविधा देण्याबाबत ते ओळखले जातात. निवडणुकीत त्यांनी मतदारांना केवळ एक रुपये मानधन घेणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार त्यांनी आमदार होताच ही घोषणा केली आहे. जेव्हा मला तिकीट मिळालं, तेव्हाच मी केवळ एक रुपया वेतन घेणार असल्याची घोषणा केली होती. पेन्शन घेणार नाही असंही जाहीर केलं होतं. आपलं राज्य आधीच आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे याबाबत आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे, असं जसवंत सिंग म्हणाले. जसवंत सिंग यांना या निवडणुकीत 44 हजार 523 मते मिळाली होती. तर शिरोमणी अकाली दलाचे (ए) उमेदवार सिमरनजीत सिंग मान यांना 38 हजार 480 मते मिळाली होती.

संबंधित बातम्या:

मुंबईत आमदारांसाठी 300 घरं बांधणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा, सेना आमदाराच्या मागणीवर निर्णय

VIDEO: यांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का?, आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारू; sanjay raut यांचा विरोधकांवर हल्लाबोल

कोमो स्टॉक कंपनीत ठाकरे परिवार पार्टनर, कंपनीतून 7 कोटींची मनी लॉन्ड्रिंग; Kirit Somaiya यांचा मोठा आरोप