मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या 30 नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे 100 टक्के लसीकरण व्हावे, असे उद्दिष्ट जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. विक्रमी संख्येने दर दिवशी कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची राज्याची तयारी आहे आणि यापूर्वी तसे डोसेस दिले देखील आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज होणाऱ्या कोविड लसीकरण आढावा बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. (complete 100 percent covid vaccination in maharashtra orders cm uddhav thackarey)
पंतप्रधान मोदीं आज 50 टक्क्यांपेक्षा कमी कव्हरेज असलेले आणि लसीच्या दुसऱ्या डोसचे कमी कव्हरेज असलेल्या जिल्ह्यांसाठी बैठक घेणार आहेत, यात महाराष्ट्राचा जिल्ह्यांचा देखील समावेश आहे. भारताने नुक्ताच कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाचा 100 कोटीचा टप्पा पार कोला. मात्र सगळ्याच राज्य त्यांचा लसीकरणाचा अपेक्षीत टप्पा गाठण्यात यश आले नाही. याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांशी आढावा बैठक घेणार आहेत.
या बौठकीत एकूण 40 हून अधिक जिल्हाअधिकारी उपस्थित असतील. हे जिल्हे ज्या राज्यांमध्ये आहेत, त्या राज्यांचे मुख्यमंत्रीही यावेळी उपस्थित राहणार आहेत. ज्या राज्यांमध्ये लसीकरण कमी आहे त्यात महाराष्ट्र, मेघालय, झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, आणि इतर राज्यांचा समावेश आहे. या बौठकीत महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित असतील.
कोविडचे संसर्ग कमी झाला असला तरी अद्याप कोविड गेलेला नाही, याची जाणीव नागरिकांना सतत करुन द्यायला हवी. लस घेण्याबरोबरच कोविड सुसंगत वर्त़न ठेवण्यासाठी सतत जनजागृती मोहिम राबवावी. चित्रपटगृह सुरू केली जात आहेत. प्रत्येक चित्रपटगृहात लसीकरणाबाबत संदेश दाखविण्यात यावेत, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लसीकरण मोहिमेत स्थानिक पदाधिकारी यांचा सहभाग घ्यावा. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर यांना लसीचे दोन्ही डोस अनिवार्य करण्यात यावेत. डोंगरी भागात मोबाईल युनिटच्या माध्यमातून लसीकरण करण्यात यावे, असे सांगितले. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी लसीकरणाच्या सांख्यिकीचे जिल्हाधिकारी यांनी विश्लेषण करावे आणि त्याअनुषंगाने लसीकरणाबाबत धोरण ठरवावे. दीपावलीनंतर विशेष उपाययोजना आखून लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे सांगितले.
Other News
complete 100 percent covid vaccination in maharashtra orders cm uddhav thackarey