काँग्रेस अन् शरद पवार उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ देणार नाही…आता ठाकरेंना…

| Updated on: Sep 20, 2024 | 3:45 PM

uddhav thackeray: काँग्रेसला उद्धव ठाकरे यांचा जेवढे वापर करायचा होता त्यांनी तो केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे म्हणणे आता खरे ठरत आहे. उद्धव ठाकरे दोन दिवस काँग्रेसच्या सर्व नेत्यांना दिल्लीत जाऊन भेटून आले. परंतु त्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर झाला नाही.

काँग्रेस अन् शरद पवार उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ देणार नाही...आता ठाकरेंना...
uddhav thackeray
Follow us on

शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. मात्र काँग्रेस आणि शरद पवार त्यांना मुख्यमंत्री करायला तयार नाही. शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचे आहे. तर काँग्रेसमधून नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यांच्यातील लढाई मुख्यमंत्रीपदाचीच आहे. हेच त्यांच्यात आणि आमच्यात मूलभूत फरक आहे. काँग्रेस किती बेईमान आहे, काँग्रेस किती धोका देणारी पार्टी आहे, हे आता उद्धव ठाकरे यांना कळले असेल, असे वक्तव्य भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

काँग्रेसला उद्धव ठाकरे यांचा जेवढे वापर करायचा होता त्यांनी तो केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे म्हणणे आता खरे ठरत आहे. उद्धव ठाकरे दोन दिवस काँग्रेसच्या सर्व नेत्यांना दिल्लीत जाऊन भेटून आले. परंतु त्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर झाला नाही. उद्धव ठाकरे यांच्यावर अशी वेळ पहिल्यांदा आली आहे. महाविकास आघाडीचे एकत्रित मेळावे बंद झाले आहेत. ते आता होणार ही नाही. कारण त्यांच्यात मुख्यमंत्री पदाचा वाद आहे, असे मत बावनकुळे यांनी केले.

अजित पवार यांची तक्रार…

अजित पवार यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे राज्यातील नेत्यांची तक्रार केल्याबद्दल बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अजित पवार यांची तक्रार काय आहे हे मला माहीत नाही. माझे स्पष्ट मत आहे की, अनिल बोंडे यांनी राहुल गांधी संदर्भात केलेल्या वक्तव्याला आमची मान्यता नाही. मात्र राहुल गांधींनी ज्या पद्धतीने वक्तव्य केले आहे, ते आरक्षण थांबवू इच्छिता. त्यामुळे महाराष्ट्रात ओबीसी समाजामध्ये, एससी एसटी समाजामध्ये राग आहे. ती भावना अनिल बोंडे यांनी व्यक्त केली. परंतु त्यांचा मार्ग चुकाला. त्यांना ते चांगल्या मार्गाने बोलता आले असते. या प्रकरणी अजित पवार यांनी तक्रार करण्याचा काही कारण नाही.

हे सुद्धा वाचा

ग्रामपंचायतींना करता येणार पंधरा लाख रुपयेपर्यंतचे कामे

महाराष्ट्र सरकार आणि गिरीश महाजन यांना धन्यवाद दिले पाहिजे. त्यांनी ग्रामपंचायतीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. पंधरा लाख रुपयांपर्यंतचे कामे ग्रामपंचायतींना आता करता येणार आहे. अमित शहा यांच्या दौऱ्याबाबत ते म्हणाले, 24 तारखेला अमित शहा नागपुरात एक बैठक घेणार आहे. त्यानंतर 24 तारखेला दुपारी संभाजीनगर आणि 25 तारखेला नाशिकला अमित शहा कार्यकर्त्यांची बैठक घेतील. कोल्हापूरमध्ये एक बैठक होण्याची शक्यता आहे. मात्र ती अजून निश्चित झालेली नाही. कार्यकर्त्यांशी संवाद अशा प्रकारचा हा दौरा आहे.

नितेश राणेंनी भूमिका केली स्पष्ट

नितेश राणे यांनी स्पष्ट केले आहे की त्यांचे वक्तव्य देशाच्या मुस्लिम समाजाबद्दल नाही. महाराष्ट्र राहणाऱ्या मुस्लिम समाजाबद्दल नाही. त्यांचा वक्तव्य चिथावणी देणाऱ्या पाकिस्तान आणि बांगलादेशची भाषा बोलणाऱ्या लोकांबाबत आहे. काही लोक महाराष्ट्रात दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या रिल्स समाज माध्यमांवर फिरवल्या जात आहे. त्याची चौकशी केली पाहिजे, असे नितेश राणे यांचे म्हणणे आहे.