Congress candidate list : विधानसभेसाठी काँग्रेसची चौथी यादी जाहीर, पाहा कोणाला कुठून संधी?

| Updated on: Oct 27, 2024 | 9:51 PM

मोठी बातमी समोर येत आहे, काँग्रेसनं आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. चौथ्या यादीमध्ये काँग्रेसनं एकूण 14 उमेदवारांची घोषणा केली आहे.

Congress candidate list : विधानसभेसाठी काँग्रेसची चौथी यादी जाहीर, पाहा कोणाला कुठून संधी?
नाना पटोले
Follow us on

मोठी बातमी समोर येत आहे, काँग्रेसनं आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. चौथ्या यादीमध्ये काँग्रेसनं एकूण 14 उमेदवारांची घोषणा केली आहे. यापूर्वी काँग्रेसनं उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर केल्या होत्या. तर आता काँग्रेसकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे, चौथ्या यादीमध्ये एकूण 14 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या चौथ्या यादीमध्ये एकूण 14 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये भगिरथ भालके यांना पंढरपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. अमळनेरमध्ये अनिल शिंदे, उमरेडमध्ये संजय मेश्राम, आरमोरीमधून रामदास मसराम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेस उमेदवारांची चौथी यादी

अमळनेर -अनिल शिंदे
उमरेड – संजय मेश्राम
अरमोरी- रामदास मसराम
चंद्रपूर- प्रवीण पडवेकर
बल्लारपूर – संतोषसिंग रावत
वरोरा -प्रवीण सुरेश काकडे
नांदेड उत्तर – अब्दुल सत्तार
औरंगाबाद पूर्व – लहू शेवाळे
नालासोपारा – संदीप पांडे
अंधेरी पश्चिम – अशोक जाधव
पंढरपूर – भगिरथ भालके
सोलापूर दक्षिण- दिलीप माने
शिवाजीनगर – दत्तात्रय बहिरट
पुणे कॅटोन्मेट – रमेश बागवे

दरम्यान आतापर्यंत काँग्रेसकडून एकूण चार उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. काँग्रेसनं आपल्या पहिल्या यादीमध्ये  एकूण 48 उमेदवारांची घोषणा केली होती. दुसऱ्या यादीमध्ये  23 तर तीसऱ्या यादीमध्ये 16 उमेदवारांची घोषणा केली. आता चौथ्या यादीमध्ये काँग्रेसकडून एकूण 14 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीध्ये सध्या काँग्रेसनं आघाडी घेतली असून, आतापर्यंत काँग्रेसकडून सर्वाधिक विधानसभेच्या जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून आतापर्यंत तीन उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये पहिल्या यादीमध्ये 65 दुसऱ्या यादीमध्ये 15 तर तिसऱ्या यादीमध्ये चार उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून देखील विधानसभेसाठी उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत, पहिल्या यादीमध्ये 45, दुसऱ्या यादीमध्ये 22 आणि तिसऱ्या यादीमध्ये 9 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.