Rahul Gandhi : ‘पुतळा तुटला कारण नियत चुकीची होती’, राहुल गांधी

| Updated on: Oct 05, 2024 | 11:58 AM

Rahul Gandhi : "शिवाजी महाराजांच्या विचाराचं संविधान कसं संपवलं जाईल याचा प्रयत्न सुरू आहे. हिंदुस्थानातील संस्थांवर आक्रमण केलं जात आहे, लोकांना घाबरवलं जात आहे. धमकावलं जात आहे" असं राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi : पुतळा तुटला कारण नियत चुकीची होती, राहुल गांधी
राहुल गांधी, काँग्रेस नेते
Image Credit source: Facebook
Follow us on

“आज आपण मूर्तीचं अनावरण करत आहोत. शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. हा केवळ एक पुतळा नाही. पुतळा जेव्हा बनवतो, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या विचारधारेला, त्यांच्या कर्माला मनापासून समर्थन करतो. आपण इथे आलो किंवा कुणी मूर्तीचं अनावरण केलं. शिवाजी महाराज ज्या गोष्टींसाठी आयुष्यभर लढले, त्या गोष्टीसाठी आपण लढलो नाही तर पुतळा अनावरणाला काही अर्थ नाही. जेव्हा पुतळ्याचं अनावरण करतो, तेव्हा शिवाजी महाराज जसं लढले, ज्या गोष्टींसाठी लढले तेवढं नाही, पण थोडं तरी काम आपण केलं नाही” असं राहुल गांधी म्हणाले.

“शिवाजी महाराजांनी देश आणि जगाला मोठा मेसेज दिला. देश सर्वांचा आहे. सर्वांना घेऊन चालायचं आहे. अन्याय करायचा नाही. असं शिवाजी महाराज म्हणायचे. त्यांच्या विचाराचं आज कोणतं चिन्ह असेल तर ते संविधान आहे. शिवाजी महाराज आणि संविधानाचं थेट कनेक्शन आहे. शिवाजी महाराजांनी जे सांगितलं ते 21 व्या शतकातील अनुवाद आहे. शिवाजी महाराज ज्या गोष्टींसाठी लढले ते सर्व या संविधानात आहे. त्यांचे विचारच या संविधानात आले आहेत. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज नसते तर संविधान नसतं” असं राहुल गांधी म्हणाले.

‘लोकांना घाबरवलं जात आहे’

“शिवाजी महाराजांच्या विचाराचं संविधान कसं संपवलं जाईल याचा प्रयत्न सुरू आहे. हिंदुस्थानातील संस्थांवर आक्रमण केलं जात आहे, लोकांना घाबरवलं जात आहे. धमकावलं जात आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर माथा टेकतात. त्याला काही अर्थ नाही. तुम्ही शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होता तर तुम्हाला संविधानाचं रक्षण केलं पाहिजे” असं राहुल गांधी म्हणाले.

‘पुतळा बसवणार असाल तर त्यांच्या विचारधारेचं रक्षण केलंच पाहिजे’

“शिवाजी महाराजांच्या काळातही हीच लढाई सुरू होती. शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सुरू होता. याच विचारधारेच्या लोकांनी राज्यभिषेक होऊ दिला नाही. ही आजची लढाई नाही. ही हजारो वर्षांपासूनची लढाई आहे. या विचारधारेच्या विरोधातच काँग्रेस लढत आहे. नियत बरोबर नसली तर उघड होते. त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला. मूर्ती तुटली. नियत चुकीची होती. मूर्तीने त्यांना मेसेज दिला. शिवाजी महाराजांची पुतळा बसवणार असाल तर त्यांच्या विचारधारेचं रक्षण केलंच पाहिजे” असं राहुल गांधी म्हणाले.