महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचाराची रणधुमाळी बघायला मिळत आहे. प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी हे सुद्धा महाराष्ट्रात प्रचारसभा घेत आहेत. सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात सर्वाधिक यश मिळाल्याने राज्यातील काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 13 जागांवर यश मिळालं होतं. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीतही आपल्याला तसंच यश मिळेल, अशी काँग्रेस नेत्यांना आशा आहे. विशेष म्हणजे याचसाठी काँग्रेसने जागावाटपावेळी अनेक जागांवरचा दावा सोडला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला होता. अखेर महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वाधिक 102, शिवसेना ठाकरे गट 89, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 87 आणि मित्र पक्ष 6 असा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांची नावे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.