विधानसभेत काँग्रेसच्या जागा वाढतील, पण…शिंदे सेनेच्या बड्या नेत्याचे वक्तव्य

| Updated on: Jul 18, 2024 | 2:35 PM

मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. त्याचा अर्थ विस्तार होईल, पण तो कधी होईल ही वेळ कुणी सांगू शकत नाही. जरांगे पाटील यांनी कुणाला चर्चेला बोलावले हे माहीत नाही. पण चर्चेतून प्रश्न सुटतात यावर आमचा विश्वास आहे. या राज्यात शांतता राहावी, अशी आमची अपेक्षा आहे.

विधानसभेत काँग्रेसच्या जागा वाढतील, पण...शिंदे सेनेच्या बड्या नेत्याचे वक्तव्य
Follow us on

संजय राऊत हा वेडा माणूस आहे. ते कधी लोकांना भेटत नाही. कधी ग्राउंडवर जात नाही. यामुळे 288 पैकी 290 जागा ते जिंकू शकतात. त्यांचा काही भरोसा नाही. विधानसभा निवडणुकीत एक वेळा काँग्रेसच्या जागा वाढतील. पण शिवसेना उबाटाच्या जागा वाढणार नाही. विधानसभेमध्ये काँग्रेस आणि उबाटाची युती होणार नाही. काँग्रेसवाले त्यांना वाटाघाटीसाठी सुद्धा बोलत नाही. शरद पवार जेव्हा खांदा झटकतील तेव्हा या सगळ्यांचे पाय खाली दिसतील, असा हल्ला शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर केला.

१५०० रुपयांमध्ये घर चालत नाही, हे आम्हालाही मान्य आहे. मात्र आमची ते तरी देण्याची दानत आहे. तुम्ही काय दिले ते आधी सांगा. नाचता येईना आंगन वाकडे हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही बहिणीला दिले भावाला देतोय तुम्ही काय दिले? असा प्रश्न संजय शिरसाट यांनी विचारला.

शिवसेनाचा स्वाभिमान सिल्वर ओकवर

लोकसभेत काय निकाल लागले सगळ्यांना माहीत आहे. स्वत: शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री होते. त्यांनी महिलांसाठी काय केले हा प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारावा. शिवसेनेचा स्वाभिमान सिल्वर ओकच्या दाराशी उभा आहे. ही आघाडी होणार नाही, यांनी जाती-जातीत विष पेरले आहे. सरकारच्या योजनेचा आम्हाला फायदा होतो ही सामान्यांची भूमिका आहे.

हे सुद्धा वाचा

वाघ नखांचे कौतूक सोडून टीका

वाघ नखे आले हे किती मोठे कर्तुत्व आहे. शिवाजी महाराजांनी ज्या वाघ नखांनी अफजलखानाचा कोथळा काढलाय ती वाघ आज महाराष्ट्रात येत आहे. त्याचा कौतुक करायचे सोडून हे टीका करत बसले आहे. शिवप्रेमींचे अन् हिंदुत्ववाद्यांचा हा अपमान आहे.

 

मंत्रिमंडळाचा विस्तार होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. त्याचा अर्थ विस्तार होईल, पण तो कधी होईल ही वेळ कुणी सांगू शकत नाही. जरांगे पाटील यांनी कुणाला चर्चेला बोलावले हे माहीत नाही. पण चर्चेतून प्रश्न सुटतात यावर आमचा विश्वास आहे. या राज्यात शांतता राहावी, अशी आमची अपेक्षा आहे. अजित पवार हे महायुतीतच राहतील अशी आमची अपेक्षा आहे. पण राजकारणात कधीही काही घडू शकतात त्यामुळे नेमके काय घडेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.