परशुराम ग्रामस्थांशी चर्चा करून घाटातील काम सुरूच ठेवा, दुर्घटनेनंतर आ. भास्कर जाधव यांच्या सूचना

| Updated on: Feb 09, 2022 | 6:02 PM

मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) परशुराम घाटामध्ये (Parashuram Ghat) रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू असताना दरड कोसळून दोन पोकलेन मातीखाली गेले आणि या दुर्घटनेत एका पोकलेन चालकाचा मृत्यू झाला. यानंतर गुहागर-चिपळूण-खेड मतदारसंघाचे आमदार भास्करराव जाधव (Bhaskarrao Jadhav) यांनी घाटामध्ये जावून प्रत्यक्ष पाहणी केली

परशुराम ग्रामस्थांशी चर्चा करून घाटातील काम सुरूच ठेवा, दुर्घटनेनंतर आ. भास्कर जाधव यांच्या सूचना
आ. भास्करराव जाधव
Follow us on

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) परशुराम घाटामध्ये (Parashuram Ghat) रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू असताना दरड कोसळून दोन पोकलेन मातीखाली गेले आणि या दुर्घटनेत एका पोकलेन चालकाचा मृत्यू झाला. यानंतर गुहागर-चिपळूण-खेड मतदारसंघाचे आमदार भास्करराव जाधव (Bhaskarrao Jadhav) यांनी घाटामध्ये जावून प्रत्यक्ष पाहणी केली आणि दुर्घटनेमुळे काम थांबवून ठेवल्यास धोका अधिक वाढू शकतो. शिवाय वरच्या भागात परशुराम गाव वसलेले आहे. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांशी  चर्चा करून, काही संभाव्य धोका असल्यास त्याची त्यांना कल्पना देवून हे काम तात्काळ सुरू करा, अशी सूचना त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली आहे.  या घाटामध्ये रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असताना मंगळवारी ही घटना घडली आहे. या घटनेनंतर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

ग्रामस्थांना विश्वासात घेऊन काम सुरू करण्याच्या सूचना

ज्या ठिकाणी दरड खाली आली आहे तिथे वरच्या बाजूला परशुराम गावात जाणारा रस्ता आणि वस्ती आहे. दरड कोसळल्यामुळे या वस्तीला धोका निर्माण झाला आहे का, याची पाहणी प्रत्यक्ष जावून करावी, अशी सूचना आमदार जाधव यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. दुर्घटनेनंतर हे काम थांबविण्यात आले आहे. परंतु, कोणत्याही परिस्थितीत काम थांबवू नका. ते आहे तसे राहिले तर पावसाळयात खूप मोठा धोका निर्माण होवून गंभीर परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे परशुरामच्या ग्रामस्थांना विश्वासात घ्या त्यांच्याशी चर्चा करा आणि काम तात्काळ सुरू करा, अशीही सूचना यावेळी जाधव यांनी केली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ते मान्य करून अपघात टाळण्यासाठी रस्त्याच्या बाजूला रेलिंग उभारण्याचेही मान्य केले.

कोणत्याही परिस्थितीत काम थांबवू नका

या अपघातानंतर दरडीखाडी पोकलेनमध्ये अडकलेला चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून , अन्य कोणालाही इजा झाली नसल्याची माहिती  सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली पाटील यांनी दिली आहे. दरम्यान पुढे बोलताना भास्कर राव जाधव यांनी म्हटले आहे की, कोणत्याही परिस्थित काम थांबवू नका, काही अडचन आल्यास मला सांगा आपण त्यातून मार्ग काढू.

संबंधित बातम्या

Fact Check : लतादीदींनी आंबेडकरी गाणी गायली नाहीत की त्यांच्याकडे कुणी गाणं घेऊन गेलं नाही? काय वास्तव?

Sanjay Raut | ‘माझ्या मुलीच्या लग्नात ईडीने फूलवाल्याला उचललं, धमकावत म्हणाले ‘अंदर डाल देंगे!

महाराष्ट्राचं सरकार पाडण्यासाठी मदत करा म्हणून काही जण भेटले, राऊतांचं उपराष्ट्रपतींना लिहिलेलं संपूर्ण पत्र