महायुतीत ठिणगी? अजित पवार यांच्यासोबत युती आमचे दुर्देव, भाजप प्रवक्ताच्या वक्तव्याने महायुतीत महाभारत

| Updated on: Aug 31, 2024 | 5:27 PM

ajit pawar on mahayuti: आम्ही अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करुन युती केली आहे. तुम्ही जर असे बोलत बसला तर माझेही खालचे कार्यकर्ते वेगवेगळे बोलू शकतात. मी त्याकडे लक्ष देत नाही. माझे काम प्रामाणिकपणे चालले आहे.

महायुतीत ठिणगी? अजित पवार यांच्यासोबत युती आमचे दुर्देव, भाजप प्रवक्ताच्या वक्तव्याने महायुतीत महाभारत
अजित पवार
Follow us on

महायुतीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष आहेत. परंतु अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत झालेली युती शिवसेना अन् भाजपच्या कार्यकर्त्यांना पटलेली नाही. दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांनी अजित पवार संदर्भात वक्तव्य केले होते. मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत मांडीला मांडी लावून बसल्यानंतर बाहेर येताच आपल्याला उलटी होते, असे विधान त्यांनी केले होते. त्या प्रकरणावरुन वादळ निर्माण झाल्यानंतर आता भाजप प्रवक्ते गणेश हाके यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. अजित पवार यांच्यासोबत युती आमचे दुर्देव आहे, असे हाके म्हणाले. त्यावरुन महायुतीत सर्वकाही सुरळीत नाही, असे समोर आले आहे.

काय म्हणाले गणेश हाके

लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरमध्ये भाजपाचे पदाधिकारी मेळाव्यात अजित पवार यांच्या विरोधात सूर उमटले. या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीला मदत करणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. भाजपा प्रवक्ते गणेश हाके यांनी म्हटले की, अजित पवार यांच्या सोबत झालेली युती हे त्यांचे आणि आमचे दुर्दैव आहे. त्यांच्यासोबत झालेली युती त्यांना पटली नाही आणि आम्हाला पटली नाही. असंगशी संग म्हणतात, तसे आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. राष्ट्रवादीने लोकसभेत युतीचा धर्म पाळला का? आमचा खासदाराचे काम त्यांनी केले नाही. आमच्या खासदारास त्यांनी पाडले. आता ते आम्हाला महायुतीचा धर्म विचारत, आहेत, असे हाके म्हणाले.

अजित पवार म्हणतात, माझेही कार्यकर्ते बोलू शकतात

दरम्यान, गणेश हाके यांच्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, आम्ही अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करुन युती केली आहे. तुम्ही जर असे बोलत बसला तर माझेही खालचे कार्यकर्ते वेगवेगळे बोलू शकतात. मी त्याकडे लक्ष देत नाही. माझे काम प्रामाणिकपणे चालले आहे. मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या लोकांना रोखायला पाहिजे.

हे सुद्धा वाचा

धारशिवमध्ये तानाजी सावंत म्हणाले होते…

धाराशिव येथील एका कार्यक्रमात बोलताना तानाजी सावंत म्हणाले होते की, मी हाडामासांचा शिवसैनिक आहे. आयुष्यात कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत माझे जमले नाही. शिक्षण घेत असल्यापासून आझे अन् त्यांचे पटलेले नाही. आता राष्ट्रवादी सोबत आहे. मंत्रिमंडळात आम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहोत. परंतु बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. हे सहन होत नाही, असे वक्तव्य सावंत यांनी केले होते.