नांदेड | दि. 28 फेब्रुवारी 2024 : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकतेच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांनी काँग्रेस पक्ष सोडताच दुसऱ्या दिवशीच भाजपने त्यांना राज्यसभेत पाठवले. त्यांचा प्रवेश सोहळा होऊन पंधरा दिवस उलटून गेले. परंतु अद्यापही भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना अशोक चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशाचे गणित सुटेना झाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या बुथ कार्यकर्ता बैठकीत भाजपच्या नवनिर्वाचित खासदारांनी चक्क चव्हाण यांच्या उपस्थित धक्कादायक विधान केले. खासदार अजित गोपछडे यांनी त्यांना अजगराची उपमा दिली.
खासदार अजित गोपछडे म्हणले की, चव्हाण साहेब आता तुम्ही आमच्या पक्षात आला आहात. तुम्हाला हळूहळू सर्व सिस्टीम समजायला उशीर लागणार आहे. मात्र मला वाटते तुम्ही आतमध्ये जावून अजगरा एवढे मोठे होता की काय? भारतीय जनता पार्टी ही भल्या भल्यांना समजत नाही. मलाही माहिती नव्हती. खासदारकीसाठी माझं नाव येईल, पण अचानक माझे नाव आले. त्यामुळे भारतीय जनता पार्टी समजून घेण्यासाठी तिचे चिंतन आणि विचार करणे गरजेचे आहे.
नांदेड येथे मध्यप्रदेश उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपा लोकसभा बूथ कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजपाचे खासदार अशोक चव्हाण मिळाले की, ” देशातील प्रत्येक व्यक्तीची भावना आहे की “अब की बार चारसो पार, देशात स्थिर सरकार, मोदी यांच्या नेतृत्वाखाली मजबूत सरकार आहे. आता येणाऱ्या काळात चांगलं काम होईल. मोदी यांच्या नेतृत्वाखाली मजबूत सरकार, ही सर्वसामान्यांची भावना आहे. देवेंद्र फडणीस यांनी माझ्यावर विश्वास टाकला. 24 तासांच्या आता मला खासदार केले. आता नांदेड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक एकतर्फी झाली पाहिजे.”
देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर विश्वास टाकला. 24 तासांच्या आता मला खासदार केलं. मी एकेकाळी राज्याचा प्रमुख होतो. त्याची जाणीव ठेवून मला काम करण्याची संधी दिली. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त जागा भाजपच्या आल्या पाहिजे. नांदेड, परभणी, हिंगोली या जागाही महायुतीचा निर्णय मान्य करून निवडून आणायचे आहे.