महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता, आता राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्यात आलाय. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले असून, राज्यात 15 मेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE
उस्मानाबाद कोरोना अपडेट
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 783 रुग्ण आढळले
दिवसभरात 7 जणांचा मृत्यू झाला. तर दिवसभरात 487 जणांना डिस्चार्ज देण्यात आला
उस्मानाबाद तालुका 310, तुळजापूर 46,उमरगा 62, लोहारा 84, कळंब 103, वाशी 88, भूम 48 व परंडा 42 रुग्ण
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 7183 सक्रिय रुग्ण
जिल्ह्यात एकूण 33 हजार 720 रुग्ण बरे 81.45 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर
आतापर्यंत एकूण 981 जणांचा मृत्यू
जिल्ह्यात 2.32 टक्के मृत्यू दर
उस्मानाबाद कोरोना अपडेट :
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज नवीन 783 रुग्ण व 7 मृत्यू, तर 487 जणांना डिस्चार्ज
उस्मानाबाद तालुक 310, तुळजापूर 46,उमरगा 62, लोहारा 84, कळंब 103, वाशी 88, भूम 48 व परंडा 42 रुग्ण
25 एप्रिल – 569 रुग्ण – 16 मृत्यू
26 एप्रिल – 720 रुग्ण – 17 मृत्यू
27 एप्रिल – 728 रुग्ण – 05 मृत्यू
28 एप्रिल – 872 रुग्ण – 11 मृत्यू
29 एप्रिल – 783 रुग्ण – 18 मृत्यू
30 एप्रिल – 900 रुग्ण – 19 मृत्यू
1 मे – 667 रुग्ण – 19 मृत्यू
2 मे – 486 रुग्ण – 09 मृत्यू
3 मे – 814 रुग्ण – 13 मृत्यू
4 मे – 786 रुग्ण – 11 मृत्यू
5 मे – 783 रुग्ण – 07 मृत्यू
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 7183 सक्रिय रुग्ण
उस्मानाबाद – 2 लाख 33 हजार 237 नमुने तपासले त्यापैकी 41 हजार 884 रुग्ण सापडले, रुग्ण सापडण्याच दर 32.10 टक्के
33 हजार 720 रुग्ण बरे 81.45 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर
रुग्णांचा मृत्यू 981 तर 2.32 टक्के मृत्यू दर
ठोणे कोरोना अपडेट
# आज दिवसभरात 1,093 रुग्ण कोरोनातून बरे
# आज 552 जणांना कोरोनाची बाधा
# आजपर्यंत कोरोना संसर्ग झालेले एकूण रुग्ण- 1,21,477
# कोरोना संसर्गावर मात करून पूर्णपणे बरे झालेले रुग्ण- 1,12,147
# रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.3 टक्क्यांवर
# 7,605 रुग्णांवर सध्या उपचार सुरु
# आज 9 जणांचा मुत्यू झाला, आतापर्यंत कोरोनामुळे 1,725 जणांचा मृत्यू
वसई-विरार कोरोना अपडेट
24 तासात 897 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह
तर आज दिवसभरात 14 जणांचा मृत्यू
दिवसभरात 682 जणांनी केली कोरोनावर मात
वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 57,134 वर
कोरोना मुक्त झालेली रुग्णसंख्या 44,849 वर
आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 1155 वर
कोरोनावर उपचार घेत असलेली रुग्णसंख्या- 11130
राज्यात दिवसभरात 57006 जण कोरोनामुक्त
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.32 टक्क्यांवर
राज्यात 57640 नव्या रुग्णांचे निदान
दिवसभरात 920 कोरोनाबाधितांचा मृत्यू
राज्यात मृत्यूदर 1.49 टक्क्यांवर
पुणे कोरोना अपडेट
– दिवसभरात 3260 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ
– दिवसभरात 3303 रुग्णांना डिस्चार्ज
– पुण्यात करोनाबाधित 83 रुग्णांचा मृत्यू. 19रूग्ण पुण्याबाहेरील
– 1415 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 436349 वर
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या- 39632 वर
– एकूण मृत्यू -7118 वर
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज झालेले रुग्ण- 389499
सोलापूर : सोलापुरात कोरोनामुळे दिवसभरात 52 जणांचा मृत्यू
मृतामध्ये ग्रामीण भागातील 34 तर शहरातील 18 जणांचा समावेश
शहर आणि जिल्ह्यात मिळून कोरोनाचे एकूण 1993 रुग्ण
शहरात 163 तर ग्रामीण भागातील 1830 जणां कोरोना पॉझिटिव्ह
पंढरपूर मंगळवेढा माळशिरस तालुक्यात मोठा उद्रेक
सोलापूर:
सोलापुरात कोरोनामुळे दिवसभरात 52 रुग्णांचा मृत्यू
मृतात ग्रामीण भागातील 34 तर शहरातील 18 जणांचा समावेश
तर शहर जिल्ह्यात मिळून कोरोनाचे 1993 रुग्ण
शहरात 163 तर ग्रामीण भागातील 1830 जणांचा कोरोना पॉझिटिव्ह
पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस तालुक्यात मोठा उद्रेक
येवला :- कोरोनाबाधित 81 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह
आतापर्यंत 174 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
येवल्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या पोहचली 4298 वर
कोरोनावर 3808 जणांनी मात करत केली घरवापसी
उर्वरित 316जण कोरोणा उपचार घेत आहे
आजचे डिस्चार्ज 58 आहे
निफाड तालुका कोरोना अपडेट :
दिवसभरातील नवे कोरोनाबाधित रुग्ण – 189
निफाड तालुक्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्ण – 15864
आजपर्यंत एकूण बरे झालेले – 13630
(बरे होण्याचा दर Recovery Rate – 85.17 %)
आता पर्यंत कोरोनामुळे एकूण मृत्यू – 497
(मृत्यू दर- 3.10 %)
सद्यस्थितीत उपचाराखालील रुग्ण – 1737
एकूण झालेल्या टेस्ट – 912
पुणे-बंगळुरु महामार्गावर ऑक्सिजन टँकर लिक झाला आहे. हा टँकर कोल्हापुरच्या दिशेला जात होता. उष्णतेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात झाल्याने ऑक्सिजन लिक झाल्याचं सांगितलं जात आहे. जवळपास अर्ध्या ते पाऊण तासापासून लिक सुरु आहे. प्रशासन घटनास्थळी दाखल झालं आहे. सातारा पोलीसही तिथेल दाखल झाले आहेत. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असताना अशाप्रकारे ऑक्सिजन लिक होणं ही दुर्देवाची बाब असल्याचं मत सर्वसामान्यांकडून व्यक्त केलं जात आहे
वाशिम कोरोना अपडेट :
जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक
जिल्ह्यात आज पाच रुग्णांचा मृत्यू
दिवसभरात 447 नवे रुग्ण, तर 352 जणांना डिस्चार्ज
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 35 दिवसात 131 रुग्णांचा मृत्यू झाला तर नवे 13946 कोरोना रुग्ण आढळले आहेत
जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 30021
सद्यस्थितीत ऍक्टिव्ह रुग्ण – 4259
आतापर्यन्त डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 25443
आतापर्यंत एकूण मृत्यू – 318
नागपूर :
नागपूरला आज काहीसा दिलासा, बाधित कोरोना रुग्णांच्या तुलनेत बरं होणाऱ्यांची संख्या वाढली
आज नागपुरात 7400 जणांनी केली कोरोनावर मात
4399 नवीन कोरोना रुग्णांनाची नोंद
तर 82 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याने वाढली चिंता
एकूण रुग्ण संख्या – 432938
एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 358994
एकूण मृत्यू संख्या – 7828
पिंपरी-चिंचवड कोरोना अपडेट :
दिवसभरात कोरोना रुग्ण -2148
कोरोनामुक्त -2183
मृत्यू -65
आत्तापर्यंत
कोरोना रुग्ण -211448
कोरोनामुक्त -197372
मृत्यू -3173
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने ‘कोविड-19’ मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी रुपयांच्या मदतीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मंत्रालयात सुपुर्द करण्यात आला. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री विश्वजीत कदम, बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, चंद्रशेखर घुले, राहूल जगताप, प्रशांत गायकवाड, बँकेच मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे आदी मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी वेळीच उपायोजना करा
आमदार गणेश नाईक यांची पालिकेला सूचना
मृत्यूदर कमी करून जीव वाचविण्यासाठी सतर्क रहा
एप्रिल महिन्यात नवी मुंबईत 200 कोरोनाचे बळी गेले
रूग्णांना आयसीयू आणि व्हेंटीलेटरचे बेड मिळत नसल्याबददल तीव्र नाराजी
ऑक्सिजन, आयसीसूचे व्हेंटीलेटरचे जादा बेड तयार ठेवा
गणेश नाईक यांनी केल्या आयुक्तांना सूचना
सात हजार चाचण्या प्रतिदिन केल्या जातात त्या वाढविण्यात येतील, अशी आयुक्तांची ग्वाही
शहापूर आरोग्य विभाग अंतर्गत येणाऱ्या शेंदृन प्रथमिक आरोग्य केंद्रात लस घेणासाठी नागरिकांची गर्दी, सोशल डिस्टणशिंगचा फज्जा, लस घेण्यासाठी आलेले नागरिक कसलाही भान न ठेवता करत आहेत गर्दी
पंढरपूर : रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या 3 जणांना अकलूज पोलिसांकडून अटक, बेकायदेशीर रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा करून तीन इंजेक्शन छापील किंमती पेक्षा चढ्या दराने म्हणजेच 35 हजार रुपयांना विकण्याचा होता कट, अकलूज पोलीस व अन्न औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाची मोठी कारवाई, याप्रकरणी अकलूज पोलिसांनी आण्णासाहेब किर्दकर, अजय जाधव, कुमार जाधव अशा तिघांविरुद्ध भादवि कलम 420, 34 सह परिच्छेद 26 औषध किमत नियंत्रण आदेश 2013 सह वाचन कलम 3 (2)(c) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने उच्च न्यायालयाकडे डोंबिवलीतील विभा कंपनीच्या प्रशस्त जागेत कोविड रुग्णालय सुरु करण्याची परवानगी मागवितली होती. न्यायालयाने कंपनीच्या जागेत कोविड रुग्णालय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे रुग्णालय सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्या जागेत 580 बेडचे रुग्णालय सुरु करण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने सुरु केली आहे. यात 50 बेड लहान मुलांसाठी आरक्षित ठेवले जातील. महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हा कॉल सेंटर तयार केला जात आहे.
नवी मुंबई –
इंजेक्शनसाठी रुग्णाच्या नातेवाईकांची पळापळ
आयुक्त अभिजित बांगर यांची कार्यतत्परता
वेळेवर इंजेक्शन उपलब्ध केल्याने रूग्ण स्थिर
कोपरखैरणे सिध्दीका रूग्णालयात ऍडमिट होता पेंशट
रुग्णाच्या मुलांने मानले आयुक्तांचे आभार
आयुक्त म्हणतात, हे माझं आद्य कर्तव्य
आयुक्तांमुळे कोरोनावरील औषधे विनाअडथळा सर्व रूग्णालयांना उपलब्ध
बीड शासकीय रुग्णालयात गोंधळ
लसीकरण केंद्रावर गोंधळ
डीवायएसपी संतोष वाळके यांना नागरिकांची धक्काबुक्की
धक्काबुक्कीनंतर पोलीस दल आक्रमक
पोलिसांनी नागरिकांवर केला बेछूट लाठीमार
बीडच्या शासकीय रुग्णालयात घुसून पोलिसांचा लाठीचार्ज
लाठीचार्ज करतानाची दृश्ये सीसीटीव्हीत कैद
अकोला : समाज क्रांती आघाडीचे प्रमुख प्रा. मुकुंद खैरे यांचे कोरोनामुळे दुःखद निधन….
अकोला येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे….
यापूर्वी त्यांची पत्नी व मुलगी ॲड. शताब्दी खैरे यांचेही कोरोनामुळे झाले निधन आहे…..
पुणे –
– राज्य सरकारने लसींच्या पुरवठ्याबाबत अधिक सक्षम नियोजन करायला हवं महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सरकारला सल्ला,
– त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय असायला हवा असंही महापौर मोहोळ यांनी सुचवलं आहे,
– लसींच्या अनियमित पुरवठ्यामुळे संपूर्ण यंत्रणा विस्कळीत झाल्याची महापौरांनी व्यक्त केली खंत,
– पुण्यात लसींच्या कमतरतेमुळे शहरात मागील चार दिवसांपासून लसीकरण बंद होतं.
– मात्र काल पुण्याला लसींचे ३०,००० डोस मिळाल्यानंतर आज पुन्हा लसीकरण सुरू.
अमरावती –
अमरावती जिल्ह्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे
गेल्या 24 तासात अमरावती जिल्ह्यात 1124 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
25 रुग्णांचा मृत्यू
गेल्या वर्षभरातील 1124 रुग्णांची नोंद ही सर्वाधिक आहे
रत्नागिरी –
संचारबंदी झाल्यापासून रुग्ण संख्या आटोक्यात नाही
रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसमोर मोठं आवाहन
एप्रिल महिन्याच्या पहिल्यापंधरवड्याच्या तीन पट चाचण्या पुढच्या पंधरड्यात
रुग्णसंख्या सुमारे चौपटीने वाढ, रुग्ण बरे होण्याचे वेग मात्र दुप्पटच राहिला
जिल्ह्याचा पाॅझिटिव्ह रुग्णांचा रेट ३१.४८ तर कोरोना मुक्तीचा दर १२.९५
अहमदनगर
पारनेरचे आमदार निलेश लंके यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र
राज्यातील पत्रकार बांधवांचा कोरोना योद्धा श्रेणीत समावेश करावा
विमा कवच मिळावे तसेच कोव्हॅक्सीन लसीकरणात प्राधान्य द्यावे
पत्राद्वारे लंके यांनी केली मुख्यमंत्र्यांनकडे मागणे
इतर राज्यांप्रमाणे आपल्या राज्यातील पत्रकारांना कोरोना योद्धा श्रेणीत समावेश करावा
पुणे –
पुण्यात आज 18 ते 44 वर्षांवरील लसीकरण केंद्राची संख्या वाढवली,
5 लसीकरण केंद्रावर होणार लसीकरण,
लसीचा तुटवडा असल्यानं 2 चं केंद्रावर होतं होत लसीकरण,
आज लसीकरण केंद्राची संख्या 3 ने वाढवली
नोंदणी केलेल्यांनीच लस घेण्यासाठी येण्याचं केलं आवाहन
नाशिक – कोरोना मुक्त झाल्यानंतर अनेकांना गंभीर आजार
नाक, दात आणि डोळ्यांना होत आहे गंभीर इजा
म्युकरमाक्रोसिस या आजराने अनेकांचे डोळे देखील काढावे लागले आहेत
गेल्या एक महिन्यात एकाच रुग्णालयात म्युकरमाक्रोसिस चे तब्बल 30 हुन अधिक रुग्ण
कोरोना मुक्त झाल्यानंतर मधुमेह असलेल्या नागरिकांना होत आहे हा आजार
वेळेत उपचार घेतल्यास हा आजार लवकर बरा होऊ शकतो त्यामुळे लवकर उपचार घेण्याचं डॉक्टरांच
आवाहन
पिंपरी चिंचवड
– पिंपरी-चिंचवडकरांसाठी दिलासादायक बातमी
– कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे
– शहराच्या विविध भागातील 1 हजार 805 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 2 हजार 408 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 63 जणांचा मृत्यू
भिवंडी –
लसीकरण ऑनलाईन नाव नोंदणीमुळे भिवंडीत लसीकरणासाठी मुंबई, ठाणे, बदलापूर येथून येत आहेत नागरीक
दहा पैकी फक्त दोन लसीकरण केंद्र सुरु लस उपलब्ध न झाल्यास ते ही होणार बंद
पालिका क्षेत्रापेक्षा ग्रामीण भागात कोरोना संकट भयावह
पुणे –
– कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने पुणे शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांना वेठीस धरले आहे.
– एकट्या एप्रिल महिन्यात जिल्ह्यात ३०३८ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू,
– त्यांपैकी १९०० रुग्ण पुणे शहरातील आहेत,
– फेब्रुवारी आणि मार्च महिन्यापासून शहरात करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचे परिणाम दिसण्यास सुरुवात झाली,
– सध्या पुणे शहरात दररोज ४० ते ५० तर संपूर्ण जिल्ह्यात सुमारे १५० रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे.
– त्यामुळे एप्रिल महिन्यात शहरातील १९०० तर संपूर्ण जिल्ह्यात ३०३८ रुग्ण दगावले आहेत.
– त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १३,०७७ वर जाऊन पोहोचली आहे.
– त्यांपैकी ६९६६ मृत्यू पुणे शहरातील आहेत. एकूण मृतांपैकी ४५८ रुग्ण हे परजिल्ह्यातील आहेत.
नाशिक –
शहरातील झाकीर हुसेन आणि बिटको रुग्णालयात लवकरच बसणार ऑक्सिजन टाक्या
पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर आयुक्तांनी युद्धपातळीवर सुरू केले काम
टाक्यांच्या फौंडेशनच्या कामाला देखील झाली सुरुवात
दोन्ही रुग्णालयात 3 किलो च्या 2 टाक्या बसवण्याचा झाला आहे निर्णय
नाशिक – झाकीर हुसेन रुग्णालयातील मृतांच्या वारसांना मनपाची मदत
कोणताही गाजावाजा न करता घरपोच दिला धनादेश
घरपोच धनादेश देऊन घेतली पोहोच पावती
मनपा आयुक्तांच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक
मनपाकडून 5 लाखांची मृताच्या घरच्यांना मदत
नाशिक – मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयातच लसीकरण सुरू
शहरातील इतर केंद्रांवर लसीकरण बंद चे लागले फलक
18 ते 45 गटातील नागरिकांना उपलब्ध साठ्यानुसार लस
इतरांना मात्र अद्याप लसीचा प्रतीक्षा
लस उपलब्धतेची माहिती मिळत नसल्याने नागरिकांचा गोंधळ
लस उपलब्ध झाल्यास लसीकरण सुरळीत होईल असा मनपाचा दावा
औरंगाबाद –
औरंगाबादेत कोरोना लसीचा मिळणार फक्त दुसरा डोस
औरंगाबाद महापालिकेने घेतला निर्णय
लस टंचाईमुळे नागरिकांना दिल जाणार फक्त दुसरा डोस
औरंगाबाद जिल्ह्याला उपलब्ध झाले फक्त 12 हजार डोस
त्यामुळे आगामी काही दिवस मिळणार फक्त दुसरा डोस
कोल्हापूर –
जिल्ह्यात आजपासून लागू केल्या कडक लॉकडाऊनचा निर्णय अवघ्या काही तासात मागे
लॉकडाऊन नाही मात्र जनता कर्फ्यु पाळण्याच प्रशासनाच आवाहन
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर काल दुपारी जाहीर केला होता कडक लॉकडाऊन चा निर्णय
आज सकाळी 11 वाजल्या पासून लागू होणार होते नवे निर्बंध
मात्र सायंकाळी पुन्हा लॉकडाऊन चा निर्णय मागे घेत केलं जनता कर्फ्यु च आवाहन
नाशिक – नाशिकसाठी दिलासादायक बातमी
शहरातील पॉझिटिव्हीटी रेट 40 टक्के वरून 17 टक्क्यांवर
नव्या रुग्णाणपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक
दिवसभरात 6000 हुन अधिक रुग्ण कोरोना मुक्त
तर 4222 नवीन बाधित रुग्ण
गेल्या 6 दिवसात नव्याने आढळणाऱ्या रुगणांची संख्या कमी
मुंबई महापालिकेला 1 लाख कोरोना लसीचे डोज मिळाले
काल रात्रीच्या सुमारास हे लसीचे डोज मुंबईत पोहोचले
त्यामुळे आता पुन्हा 45 वर्षांवरील लोकांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे
ही लस फक्त सरकारी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध राहील
Brihanmumbai Municipal Corporation received a fresh stock of 1 lakh vaccine doses last night and it will resume vaccination of people above 45 years at its and govt’s vaccination centres: BMC pic.twitter.com/nQlpHhdGhx
— ANI (@ANI) May 5, 2021
रायगड : जिल्ह्यात लसीकरण केद्रांच्या 200 मीटर परिसरात जमावबंदीचे (144 (2) कलम) आदेश लागू
जिल्हाधिकारी निधी चोधरी यांनी आज प्रशासनाला दिले आदेश
कायदा व सुव्यवस्था तसेच आदेशाचे उल्लघंन करण्याऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश
केवळ 18-44 वयोगटातील पूर्व नोदंणीनुसार लसीकरणासाठी येण्याची परवानगी
लसीकरण केद्रांशी निगडीत वैद्यकिय सेवा पुरवणारी व्यक्ती किवां पोलीस अधिकारी यानांच लसीकरण केद्रांच्या 200 मीटर परिसरात प्रवेश
राज्यात आज 51 हजार 880 नवे रुग्ण
राज्यात आज 891 रुग्णांचा मृत्यू
राज्यात आज 65 हजार 934 रुग्णांनी केली कोरोनावर मात
पुणे शहराला 30 हजार लसी मिळाल्या
उद्यापासून 45 वर्षांवरील नागरिकांच लसीकरण ठराविक केंद्रावर होणार सुरु
आज दिवसभरात 484 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत…
2279 अहवाला पैकी 1795 जणांचे अहवालात निगेटिव्ह आले आहेत…
ऐकून कोरोना बाधितांचा आकडा 42427 झाला आहे….
आज दिवसभरात 6 जणांचा मृत्यू झाला आहे….
कोरोनामुळे आतापर्यंत 737 जणांचा मृत्यू …
आज दिवसभरात 475 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे…
तर 35998 जणांनी कोरोनावर मात केली आहे….
उपचार घेत असलेले रुग्ण 5692 आहेत……
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची माहिती…..