महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसला. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. राज्यातीलच नाही तर देशभरातील रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तसेच, रोजचे नवे रुग्णही कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत | Corona Cases and Lockdown News LIVE
अकोला कोरोना अपडेट
अकोल्यात आज दिवसभरात 44 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दिवसभरात तिघांचा मृत्यू झाला आहे
आतापर्यंत 1111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 54413 जणांनी कोरोनावर मात केली आहे
तर सध्या 1577 रुग्ण उपचार घेत आहेत
तर दिवसभरात 228 जण कोरोनामुक्त झाले आहेत
सांगली कोरोना / म्युकरमायकोसिस अपडेट
जिल्ह्यात आज दिवसभरात 1010 कोरोना रुग्ण
म्युकरमायकोसिस – एकूण रुग्ण 239 , आज आढळलेले रुग्ण-1
जिल्ह्यात आज कोरोनामुळे 24 रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यातील मृतांचा आकडा 3718 वर
सक्रिय कोरोना रुग्णसंख्या 9036 वर
तर उपचार घेणारे 1004 जण आज कोरोनामुक्त
आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 116634वर
जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 129389 वर
सातारा कोरोना अपडेट :
आज 833 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 28 बाधितांचा मृत्यू
846 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
सातारा जिल्हा कोरोना आकडेवारी
एकूण बाधित – 179751
घरी सोडण्यात आलेले – 165207
मृत्यू -4032
उपचारार्थ रुग्ण-10590
सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुभाष चव्हाण यांनी दिली माहिती
नाशिक कोरोना अपडेट
आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 329
आज रोजी पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत झालेली वाढ – 395
नाशिक मनपा- 82 नवे रुग्ण
नाशिक ग्रामीण- 302 नवे रुग्ण
मालेगाव मनपा- 10 नवे रुग्ण
जिल्हा बाह्य रुग्ण- 01 नवे रुग्ण
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 5920
जालना : जालना जिल्ह्यात आज 26 रुग्णांचे निदान झाले. तर 84 रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. विशेष म्हणजे आज जालना जिल्ह्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. अशी माहिती जालना आरोग्य खात्याच्या वतीने देण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे एक हजार पाच जणांचा बळी गेला आहे.
रायगड : लॉकडाऊन पूर्ण रिलीज होण्याची वाट न पाहता पर्यटकांचे लोंढे बोरघाटात
मुबंई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अंशतः कोडी
बोरघाटातील रायगड व पुणे जिल्ह्याच्या वेशीवर अम्रुतांजन ब्रिजवर पर्यटकांची गर्दी
पुण्याकडे जाणाऱ्या सर्व लेन साधारणपणे 2 ते 3 किलोमीटरपर्यंत जॅम
पुणे कोरोना अपडेट
– दिवसभरात 331 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ
– दिवसभरात 459 रुग्णांना डिस्चार्ज
– पुण्यात करोनाबाधीत 20 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 10
– 517 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 473870
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 3182
– एकूण मृत्यू -8466
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 462222
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5829
नांदेड कोरोना अपडेट
पॉझिटिव्ह रुग्णसंख्या होतेय कमी
24 तासात 2777 टेस्ट 15 जण कोरोनाग्रस्त
आतापर्यंत एकूण कोरोनाग्रस्त- 90885
एकूण कोरोनामुक्त- 87918
24 तासात 2 जणांचा मृत्यू
आतापर्यंत एकूण 1897 जणांचा मृत्यू
सक्रिय रुग्ण-529
सिंधुदुर्ग कोरोना अपडेट
मागील पाच दिवसातील कोरना अपडेट
दि.7/6/21
नवीन रूग्ण-592
बरे झालेले-88
मृत्यू-03
दि. 8/6/21
नवीन रूग्ण -675
बरे झालेले 440
मृत्यू 09
दि. 9/6/21
नवीन रुग्ण – 548
बरे झालेले – 488
मृत्यू -12
दि. 10/6/21
एकूण नवीन रुग्ण -631
बरे झालेले – 823
मृत्यू – 12
दि. 11/6/21
नवीन रुग्ण – 416
बरे झालेले – 473
मृत्यू – 04
मागील पाच दिवसातील रुग्ण
एकूण नवीन रुग्ण – 2862
बरे झालेले – 2312
मृत्यू – 40
वाशिक कोरोना अपडेट
जिल्ह्यात आज आढळले 36 नवे रुग्ण
तर आज 76 जणांना देण्यात आला डिस्चार्ज
तसेच 01 रुग्णाचा झाला मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 40996
सध्या सक्रिय रुग्णांची संख्या – 694
आतापर्यंत डिस्चार्ज झालेले रुग्ण – 39703
आतापर्यंत एकूण मृत्यू – 598
आता घराघरात जाऊन लसीकरण करणार
त्याबाबत टास्क फोर्सला सांगण्यात आल्याची राजेश टोपे यांची माहिती
सात हजार कोटी ही तुटपुंजी रक्कम
आम्ही शेतकऱ्यांची आम्ही नेहमी काळजी घेत आलो आहोत
लसीकरणाचे सात हजार कोटी शेतकऱ्यांसाठी खर्च करा या रावसाहेब दानवे यांच्या मागणीला राजेश टोपे यांचा टोला
राज्य शासन जनतेच्या सेवेसाठी सदैव सज्ज : राजेश टोपे
पंढरपूर : नाशिकनंतर आता पंढरपुरात कोरोनाच्या दुसऱ्या डोसनंतर अंगावर स्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा ज्येष्ठ नागरिकाचा दावा
ज्येष्ठ नागरिक नरहरी कुलकर्णी यानी केला दावा
आज सकाळी कोरोनाचा दुसरा डोस घेतल्यानंतर त्यानी सहजच घरी आल्यावर नाणे आणि स्टीलचे चमचे शरीराला चिकटतात का हे पाहिले
यावेळी त्यांच्या अंगावर स्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचे त्यांच्या निदर्शनात आले
कोरोना लस घेतल्यानंतर पहिल्या दोन तासात अधिक तीव्रतेने स्टीलच्या वस्तू अंगाला चिटकत असल्याचा दावा त्यानी केलाय
खारघर : पांडवकडा परिसरात सकाळपासून पर्यटकांची गर्दी
गर्दीमुळे पोलिसांनी केली कारवाई
पांडवकडा धबधबा बंद असल्याने गोल्फ कोर्समागील परिसरात झाली होती गर्दी
पर्यटकांसह गाडीवरसुद्धा करण्यात आली कारवाई
विंकेडची मज्जा घेण्यासाठी पर्यटक पडले होते घराबाहेर
मात्र खारघर पोलिसांकडून खारघर हिल, पांडवकडा परिसरात जाण्यास मज्जाव
आदेश झुगारून पर्यटक भर पावसात घराबाहेर
मुलांच्या हट्टामुळे घराबाहेर पडावे लागते
आणखीन किती दिवस घरामध्ये कोंडून राहायचं
नागरिकांचा प्रशासनाला सवाल
“जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे बळ आहे. त्यामुळे आगामी महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणूक आम्ही आमच्या बळावर जिंकू आणि यशस्वी होऊ. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचा आमदार झाला, महापौर झाला आता खासदार शिवसेनेचा व्हावा, अशी अपेक्षा शिवसैनिकांची आहे. ती आम्ही निश्चित पूर्ण करू”, असं संजय राऊत म्हणाले.
देशात गेल्या 24 तासांत 84,332 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालीये
तर 1,21,311 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे
गेल्या 24 तासांत 4,002 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे
आरोग्य मंत्रालयाची माहिती
रत्नागिरीकरांसाठी चिंता वाढवणारी बातमी,
गेल्या 24 तासात जिल्ह्यात तब्बल 24 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यात आल्यात
काल तब्बल 4 हजाराहून अधिक चाचण्या केल्या गेल्या
यात 659 एवढे कोरोनाचे रुग्ण सापडलेत. रत्नागिरी जिल्ह्या या आठवड्यात सुद्धा झोन चार मध्येच असणार आहे
सोलापूर – शहरातील दुकाने आज आणि उद्या चालू राहणार
निर्बंध हटवण्याबाबत शासनाने घालून दिलेली नियमावली या पार्श्वभूमीवर आज शनिवारी आणि रविवारी शहरातील सर्व दुकाने नेहमी प्रमाणे सुरू राहणार
पूर्वीच्या आदेशात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या अस्थापना शनिवारी रविवारीवारी बंद ठेवण्याचे सुरू होते आदेश
सोलापूर – सोलापुरातील व्यक्तीच्या अंगाला स्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा दावा
नाशिकचा अरविंद सोनार नंतर सोलापूरच्या कपिल कोळी यांचा दावा
नाशिकच्या अरविंद सोनार यांना स्टील च्या वस्तू चिटकत असल्याच्या नुकत्याच आल्या होत्या टीव्हीवर बातम्या
टीव्हीवरील बातमी पाहून कुतुहलाने केला प्रयोग
स्टीलच्या वस्तू आणि नाणे चिटकत असल्याचे आले निदर्शनास
नाशिक – अनलॉक होताच शहरात गुन्हेगारीने काढलं डोकं वर
दुचाकी चोरी, घरफोडी,चेन स्नॅचिंग च्या घटना वाढल्या
दुचाकी चोरीच्या 7 घटना, तर घरफोडीच्या 5 घटनांची नोंद
मोबाईल लूट आणि महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीची घटना देखील नोंद
पोलीस प्रशासनाच्या ढिलाईमुळे गुन्हेगारी वाढल्याचं आलं समोर
पुणे
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा बांधकाम क्षेत्राला फटका, पुण्यातील बांधकाम प्रकल्पांना उशीर होण्याची शक्यता
बांधकाम साहित्याच्या किंमती वाढल्याने घरांच्या किंमतीही वाढणार
राष्ट्रीय क्रेडाईच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर
24 मे ते 3 जून 21 दरम्यान देशातील टीअर I, II, III अशा एकूण 217 शहरांमधील बांधकाम व्यवसायाचा आढावा घेण्यासाठी करण्यात आले सर्वेक्षण
पुणे शहराचा विचार केल्यास प्रामुख्याने 94 टक्के व्यावसायिकांना बांधकाम मजुरांची कमतरता, आवश्यक साहित्याच्या वाढत्या किंमती व बांधकाम परवानग्या मिळण्यास होणारा विलंब आदी बाबींचा शहरातील बांधकाम क्षेत्रावर परिणाम
कर्जाची परतफेड करण्यासाठी तब्बल 52 टक्के बांधकाम व्यावसायिकांना अडचण
तब्बल 91 टक्के व्यावसायिकांना ग्राहकांकडून नियोजित खरेदी रक्कम मिळण्यात अडथळा
ग्राहकांनी घर घेण्याचा निर्णय काही काळासाठी पुढे ढकलला असल्याचा अनुभव