मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं असून आता मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत आहेत. अशात देशात अनेक राज्यांमध्ये आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून अनेक ठिकाणी कठोर नियम तयार करण्यात आले आहे. यासंबंधी सगळे महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमधून देण्यात आले आहेत.
सांगली : जिल्ह्यात आज दिवसभरात 20 नव्या कोरोना रुग्णांची नोंद,
जिल्ह्यात आज कोरोनामुळे 3 रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा 1769 वर
सांगलीमध्ये सध्या 321 सक्रिय कोरोना रुग्णांवर वर
सांगलीमध्ये कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 46830 वर
जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 48920 वर
– नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा वाढता आलेख कायम
– जिल्हा प्रशासनाची चिंता अधिक वाढली
– आज दिवसभरात जिल्ह्यात तब्बल 1356 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 2 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
– नाशिक शहर – 942, नाशिक ग्रामीण – 269, मालेगाव मनपा – 126, जिल्हा बाह्य – 19 कोरोना रुग्ण आढळले.
– जिल्ह्यातील मृत्यूचा एकूण आकडा गेला 2170 वर
पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट
आज आढळलेले कोरोना रुग्ण -845
दिवसभरात कोरोनामुक्त झालेल रुग्ण -403
दिवसभरात मृत्यू झालेले रुग्ण -05
पिंपरी चिंचवडमधील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा -114026
पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या -105256
पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत 1876 जणांचा मृत्यू
गोंदिया : जिल्हा कोरोना अपडेट
आज वाढलेले रुग्ण – 41
आज झालेले मृत्यू – 00
आज बरे झालेले – 20
गोंदिया————–31
आमगाव————-02
तिरोडा—————01
अर्जुनी मोरगाव——-01
देवरी—————–03
सडक अर्जुनी ———-01
गोरेगाव—————01
सालेकसा————-01
एकूण रुग्ण – 14703
एकूण मृत्यू – 187
एकूण बरे झालेले – 14310
एकूण उपचार घेत असलेले – 209
कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत आज कोरोनाचे 404 रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या तीन दिवसापासून सातत्याने दररोज 400 पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहे. गेल्या तीन दिवसात कोरोना रुग्णांचा आकडा 1600 च्या वर पोहचला आहे. आज कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तार्पयत 1 हजार 183 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3 हजार 40 आहे. उपचार घेऊन बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 62 हजार 703 आहे. गेल्या 24 तासात येथे249 रुग्ण बरे झाले आहेत.
जळगाव – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात 16 मार्चपासून रात्री 10 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी लागू.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी घेतला निर्णय.
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात आज 383 नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. ही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार येथे कोरोनाग्रस्तांचा आकडा42 हजार 497 वर पोहोचाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 599 जणांचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज 69 नवे रुग्ण आढळले. जिल्ह्यात सध्या 339 सक्रीय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे. येथे आतापर्यंत 16 हजार 864 रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण 94.79 टक्के आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत 587 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. येथे मृत्यूदर 3.30 टक्के आहे.
नागपूर : नागपूर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा कोरोनाचा ब्लास्ट झाला. येथे आज दिवसभरात 2252 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. तर येथे दिवसभरात 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आज दिवसभरात 1033 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. नाव्या कोरोनाग्रस्तानंतर नागपुरात बाधितांचा आकडा 170502 वर पोहोचला आहे. तर सध्या येथे एकूण बरे होणाऱ्यांची संख्या 149413 वर पोहोचली आहे. नागपुरात आतापर्यंत 4459 जणांचा मृत्यू झालाय.
नांदेड – आज जिल्ह्यात कोरोनाचे नव्याने 566 रुग्ण आढळले आहेत. याेपैकी 415 रुग्ण नांदेड शहरातील आहेत. नांदेडमध्ये सध्या सक्रिय कोरोनाग्रस्तांचा आकडा 2380 वर पोहोचला आहे. मागील 24 तासांमध्ये नांदेड जिल्ह्यात दोघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीये. नांदेडमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 616 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. सध्या सक्रिय रुग्णांपैकी 52 रुग्णांची परिस्थिती नाजूक आहे.
पुण्यात आज पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला. येथे दिवसभरात 1740 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली. तर दिवसभरात येथे 758 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. येथे दिवसभरात कोरोनामुळे 17 बाधितांचा मृत्यू झाला. यापैकी 2 जण पुण्याच्या बाहेरचे नागरिक आहेत. सध्या पुण्यात 355 कोरोनाबाधितांची प्रकृती नाजूक असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आज 1740 नवे कोरोनाग्रस्त आढळल्याुळे येथे रुग्णसंख्या 201661 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत येते 4952 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुणे जिल्ह्यात 11590 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.
यवतमाळ : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून येथे आज दिवसभरात तब्बल 470 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले असून दिवसभरात येथे पाच जणांचा मृत्यू झाला. तर दिवसभरात येथे 206 जण कोरोनामुक्त झाले. सध्या यवतमाळमध्ये 2736 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर यवतमाळमधील कोरोना रुग्णांची संख्या 21 हजार 735 वर पोहोचली आहे. सध्या यवतमाळमध्ये कोरोनामुळे एकूण 506 जणांचा मृत्यू झालाय.
अकोला : आज सकाळच्या अहवालात 340 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
ऐकून कोरोनाबाधितांचा आकडा 21468 वर पोहोचला आहे.
आज सकाळी उपचारादरम्यान एका कोरोनाबाधिताच मृत्यू झाला.
जिल्ह्यात आतापर्यंत 401 जणांचा मृत्यू झाला.
अकोल्यात सध्या 5439 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.
आमदार मंगेश चव्हाण यांची चाळीसगाव कोव्हिड सेंटरला रात्री साडेबारा वाजता भेट. रुग्णांच्या जीवाशी खेळणारा जीवघेणा प्रकार उघड झाला. रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल 15 मात्र तातडीने हलविण्यासाठी असणारी रुग्णवाहिका ५ दिवसांपासून पंक्चर झालेली दिसुन आली. ४० रुग्णांसाठी केवळ २ कर्मचारी, अस्वच्छता व देखभाल बाबत यापूर्वीच तक्रार आमदार मंगेश चव्हाण यांनी केली आहे
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची वाढती संख्या पाहता आज रविवारी जनता कर्फ्यु पाळण्यात आला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पोलीस महसूल व आरोग्य विभागाचे अधिकारी यांनी स्वतः या कारवाईत भाग घेतला. यापुढे दर रविवारी जनता कर्फ्यु असणार आहे तर सर्व मंदिरे प्रार्थना स्थळंदेखील बंद असणार आहेत.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे परभणीत तात्पुरत्या स्वरूपात शाळा बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
बुलडाणा – आज पुन्हा 661 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण तर एकट्या बुलडाणामध्ये आढळले 160 रुग्ण, आजरोजी जिल्ह्यात 25130 कोरोना रुग्ण असून 3508 रुग्णावर उपचार सुरु आहेत. तर आजपर्यंय 219 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
– औरंगाबादच्या औद्योगिक वसाहतीत कामगारांच्या कोरोना चाचण्या सुरू
– कोरोना रोखण्यासाठी उद्योगांवर कोरोना चाचण्या बंधनकारक
– काल एका दिवसांत बाराशे कामगारांच्या केल्या चाचण्या
– बाराशे पैकी 30 कामगार आढळले पॉझिटिव्ह
– दर पंधरा दिवसांनी कोरोना चाचण्या करण्याचे बंधन
– औरंगाबादच्या युनिव्हर्सल कंपनीतही 130 कामगारांच्या तपासण्या
– सर्वच कामगार निघाले निघेटीव्ह
– अनेक कंपनीत कंत्राट देऊन केल्या जात आहेत कोरोना चाचण्या
कोरोना प्रतिबंधक लशीचे हिशोब द्या, आरोग्य खात्याची पुणे महापालिकेला विचारणा,
– कोणाला किती डोस दिले, त्याचा हिशेब सार्वजनिक आरोग्य खात्याने महापालिकेला मागितला.
– तसेच प्रत्येक केंद्रावर किमान पाच दिवसांच्या डोसचा साठा शिल्लक राहील, या प्रमाणात लशीचे वितरण करा, आरोग्य खात्याचा सल्ला,
– कोरोना प्रतिबंधक लस शिल्लक नाही. राज्याकडून लशीचा पुरवठा झालेला नाही. आता डोस द्यायचे कसे,’ असा गंभीर प्रश्न पुण्यात निर्माण झाला होता,
– पुण्यात लशीची मागणी वाढत आहे, पण मागणीप्रमाणे पुरवठा होत नाही असे आरोप होत आहेत,
– पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उधार-उसनवारी करून पुण्यातील लसीकरण सुरू असल्याचं चित्र,
– या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेला सार्वाजनिक आरोग्य खात्याने लशीचा हिशेब विचारलाय.
श्रीरामपुर आणि राहाता तालुक्यात कोरोनाचा कोरोनाचा पुन्हा उद्रेक, राहाता तालुक्यात एका दिवसात 70 कोरोनाबाधित तर श्रीरामपुर तालुक्यात एका दिवसात 46 रुग्ण, बेलापुरातील विद्यालयातील 6 शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग, काही दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय
जिल्ह्यात नवीन कोरोना रुग्णाची संख्या मोठ्या प्रमनात वाढत आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात २१४ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.त्यापैकी १३२ रुग्ण नंदुरबार तालुका आणि शहर परिसरातील आसल्याने प्रशासन आणि नागरिकांची चिंता वाढली आहे.नंदुरबार तालुक्यातील बह्याने गावात एकाच वेळी २३ रुग्ण आहेत तर नवापूर तालुक्यातील वडफळी आश्रम शाळेत अकरा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याच समोर आले आहे. नंदुरबार आणि शहादा शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात स्वॅप कलेक्शन करण्यात येत आहे. नागरिकांनी करून नियमांचे पालन करावे गर्दी करू नये तसेच मार्क्सचा नेहमी वापर करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असून कडक उपाययोजना करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
बीड शहरातील व्यापाऱ्यांसाठी सुरू असलेल्या रॅपिड अँटीजन चाचणी मोहिमेच्या चौथ्या दिवशीही व्यापाऱ्यांनी अत्यल्प प्रतिसाद दाखविला आहे. एकूण 898 व्यापाऱ्यांनी आज चाचणी केली त्यापैकी 37 व्यापारी हे कोरोना बाधीत आढळले आहेत. बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असला तरी दुसरीकडे मात्र अँटीजन चाचणी करून घेण्यास व्यापारी पुढे येत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
नागपूर जिल्ह्यात लसीकरणाला वेग, काल दिवसभरात 16 हजार नागरीकांनी घेतला लाभ, शहरात आतापर्यंत 1 लाख 10 हजार नागरिकांना देण्यात आली लस, यात 50 हजार जेष्ठ नागरिकांचा समावेश, 27 हजार आरोग्य कर्मचारी , 14 हजार फ्रंट लाईन वर्कर, नागरिकांनी लसीकरण करण्यासाठी पुढे येण्याचं प्रशासन च आवाहन