Corona Cases and Lockdown News LIVE : उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसभरात 764 नवे कोरोना रुग्ण, 481 जणांना डिस्चार्ज

| Updated on: Jul 01, 2021 | 10:58 AM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Corona Cases and Lockdown News LIVE : उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसभरात 764 नवे कोरोना रुग्ण, 481 जणांना डिस्चार्ज
कोरोना
Follow us on

राज्यात सुरु असलेला लॉकडाऊन आणखी कडक होणार आहे. गर्दी कमी होत नसल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. किराणा तसेच भाजी खरेदीसाठी लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन आहे, असं वाटत नाही. त्यामुळे राज्य सरकार लॉकडाऊन आणखी कडक करण्याच्या तयारीत आहे. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. आता प्रशासनाला पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. काही निर्बंध कडक केले जाऊ शकतात. लोकल प्रवासावर निर्बंध घातले जातील. तसेच सर्वसामान्यांनाही पेट्रोल मिळणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच इंधन दिलं जाणार आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील आणि या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Apr 2021 10:57 PM (IST)

    उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसभरात 764 नवे कोरोना रुग्ण, 481 जणांना डिस्चार्ज

    उस्मानाबाद  कोरोना अपडेट

    उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज नवीन 764 रुग्ण व 10 मृत्यू तर 481 जणांना डिस्चार्ज

    उस्मानाबाद तालुक 451, तुळजापूर 72,उमरगा 57, लोहारा 17, कळंब 59, वाशी 36, भूम 40 व परंडा 32 रुग्ण

    उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 5430 सक्रिय रुग्ण

    उस्मानाबाद बाधितांचा आकडा 27 हजार 844 वर, रुग्ण आढळण्याचे प्रमाण 21.07 टक्क्यांवर

    रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.03 टक्क्यावर

    आतापर्यंत 667 रुग्णांचा मृत्यू तर मृत्यूदर 2.42 टक्क्यांवर

  • 15 Apr 2021 10:55 PM (IST)

    भिवंडीमध्ये दिवसभरात 166 नवे करोना रुग्ण

    भिवंडी करोना अपडेट

    आज रुग्ण- 166

    आज मृत्यू- 4

    सध्या सक्रिय रुग्ण- 1637

    एकूण रुग्ण- 17781

    एकूण मृत्यू- 00624

    एकूण बरे झाले रुग्ण- 15520

     


  • 15 Apr 2021 10:21 PM (IST)

    रायगड जिल्ह्यात दिवसभरात 1243 नवे कोरोना रुग्ण

    रायगड करोना अपडेट

    आज आढळलेलेल रुग्ण -1243

    पनवेल मनपा- 554

    उर्वरीत जिल्हा-689

    पनवेल ग्रामीण- 173

    अलिबाग- 147

    खालापूर- 60

    पेण- 56

    कर्जत- 45

    माणगाव- 42

    आज बरे झालेले रुग्ण- 881
    आज म्रुत्यू पावलेले रुग्ण- 14

    रुग्णांचा आकडा पोहोचला 86467 वर

    एकूण बरे झालेले रुग्ण- 75433
    एकूण म्रुत्यू-1873

  • 15 Apr 2021 10:10 PM (IST)

    सांगली जिल्ह्यात दिवसभरात 921 नवे कोरोना रुग्ण

    सांगली कोरोना अपडेट

    जिल्ह्यात आज दिवसभरात 921 कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आज कोरोनामुळे 17 रुग्णांचा मृत्यू

    जिल्ह्यात मृतांचा आकडा 1889 वर

    सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 5528 वर

    दिवसभरात 245 जण कोरोनामुक्त

    आतापर्यंत एकूण 51003  रुग्ण कोरोनामुक्त

    जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची संख्या 58420 वर

  • 15 Apr 2021 08:15 PM (IST)

    पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचे आरोग्यमंत्र्यांना पत्र, चाचण्या वाढवण्याची केली मागणी

    पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचे आरोग्य मंत्र्यांना पत्र

    पुण्यात चाचण्यांची संख्या वाढवण्याची केली मागणी

    खाजगी लॅबमध्ये रोज 20 हजार चाचण्या

    खाजगी लॅबचा रिपोर्ट येण्यास लागतोय चार दिवसांचा कालावधी

    त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग वाढतोय,

    शासकीय रुग्णालयांतील चाचण्या वाढवण्याची केली मागणी

    ससून रुग्णालयातील चाचण्यांची संख्या वाढवण्याची केली मागणी

    अमित देशमुखांना लिहीलं पत्र

  • 15 Apr 2021 08:13 PM (IST)

    नंदूरबार जिल्ह्यात 18 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद  

    नंदुरबार  कोरोना अपडेट

    – जिल्ह्यात 24 तासात एकूण 18 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद

    – जिल्ह्यात 456 नवे कोरोना रुग्ण आढळले

    – जिल्ह्यात बाधितांचा आकडा 9 हजार 102 वर

    – जिल्ह्यात मृतांचा आकडा 456 वर

  • 15 Apr 2021 08:12 PM (IST)

    बुलडाण्यात दिवसभरात 734 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत

    बुलडाणा कोरोना अपडेट

    आज पुन्हा जिल्ह्यात 734 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.

    आज दिवसभरात 3 जणांचा मृत्यू झाला आहे

    जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 318 रुग्णांचा मृत्यू झाला

    जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 48856 पोहोचला आहे

    सध्या जिल्ह्यात 5625 सक्रिय रुग्ण आहेत

  • 15 Apr 2021 08:09 PM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यात दिवसभरात 328 नवे कोरोनाबाधित, 145 जण कोरोनामुक्त

    गडचिरोली : आज जिल्हयात 328 नवे कोरोनाबाधित आढळून आले. तसेच आज 145 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधितांचा आकडा 13585 वर पोहोचला आहे. पैकी एकूण 11068 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 2343 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 174 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

  • 15 Apr 2021 08:08 PM (IST)

    नांदेडमध्ये दिवसभरात 1288 नवे रुग्ण, दिवसभरात 19 जणांचा मृत्यू

    नांदेड कोरोना अपडेट

    गेल्या 24 तासात 1288 नवे रुग्ण, दिवसभरात 19 जणांचा मृत्यू

    एकूण टेस्ट 4356 त्यापैकी 1288 जण पॉझिटिव्ह

    24 तासांत 1047 जणांना डिस्चार्ज

    आतापर्यंत एकूण 63799 जणांना कोरोना

    आतापर्यंत एकूण 48846 जण कोरोनामुक्त

    एकूण मृत्यू – 1177

    सध्या गंभीर – 226

    पाच दिवसात 8048 रुग्ण 127 जणांचा मृत्यू

  • 15 Apr 2021 08:05 PM (IST)

    चंद्रपुरात दिवसभरात एकूण 1171 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    चंद्रपूर: गेल्या 24 तासात 3679 जणांची तपासणी

    दिवसभरात एकूण 1171 नव्या रुग्णांची नोंद

    24 तासात 16 जणांचा मृत्यू

    एकूण कोरोना रुग्ण : 37919

    एकूण कोरोनामुक्त : 29162

    सक्रीय रुग्ण : 8212

    एकूण मृत्यू : 545

    एकूण नमूने तपासणी : 316119

  • 15 Apr 2021 07:59 PM (IST)

    मालेगावात खासगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा

    मालेगाव: शहरातील जवळपास सर्वच खासगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा निर्माण झाला भीषण तुटवडा, काही हॉस्पिटलमध्ये सुमारे एक तास पुरेल एवढेच ऑक्सिजन आहे शिल्लक. खाजगी डॉक्टरांनी मनपा अधिकाऱ्याकडे घेतली धाव. सहायक आयुक्त नितीन कापडणी सोबत सुरू आहे बैठक. सिलेंडर नाही मिळाले तर अनेक रुग्णांचा जीव येऊ शकतो धोक्यात

  • 15 Apr 2021 07:57 PM (IST)

    नितीन गडकरी आणि नितान राऊत यांची कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक

    नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी नागपूर जिल्ह्यातील कोविड स्थितीसंदर्भात प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. विदर्भात पुढील ४८ तासांत मोठ्या प्रमाणावर रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्मिती करणे आणि हिंगणा एमआयडीसीत ताबडतोब ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले. सरकारी परवाणग्या आणि रेडटेपीजममध्ये दवाखाने आणि वैद्यकीय यंत्रणेला फसू न देता ताबडतोप निर्णय घेऊन लोकांना मदत पोहचवण्याचे स्पष्ट निर्देश गडकरीजी यांनी अधिकाऱ्यांना दिले.

  • 15 Apr 2021 07:20 PM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यात दिवसभरात तब्बल 328 नवे कोरोनाबाधित रुग्ण

    गडचिरोली : आज जिल्हयात 328 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 145 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 13585 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 11068 वर पोहचली. तसेच सध्या 2343 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 174 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे, यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.47 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 17.25 टक्के तर मृत्यू दर 1.28 टक्के झाला.

  • 15 Apr 2021 07:16 PM (IST)

    नांदेडमध्ये दिवसभरात 1288 नवे रुग्ण, 19 जणांचा मृत्यू

    नांदेड कोरोना अपडेट:

    गेल्या 24 तासात 1288 रुग्ण, 19 जणांचा मृत्यू

    एकूण टेस्ट 4356 त्यापैकी 1288 पॉझिटीव्ह

    24 तासात 1047 जणांना डिस्चार्ज

    आता पर्यंत एकूण पॉझिटीव्ह – 63799

    बरे झाले – 48846

    एकूण मृत्यू – 1177

    सध्या गंभीर – 226

    गेल्या पाच दिवसात

    11 एप्रिल – 1859 – 27
    12 एप्रिल – 1798 – 26
    13 एप्रिल – 1666 – 27
    14 एप्रिल – 1439 – 28
    15 एप्रिल – 1288 – 19

    पाच दिवसात 8048 रुग्ण 127 जणांचा मृत्यू

  • 15 Apr 2021 07:13 PM (IST)

    चंद्रपुरात तब्बल 1171 नवे कोरोनाबाधित, 16 रुग्णांचा मृत्यू

    चंद्रपूर:

    गेल्या 24 तासात 3679 नमुने तपासणीतून 1171 नव्या रुग्णांची नोंद

    24 तासात 16 मृत्यू

    एकूण कोरोना रुग्ण : 37919

    एकूण कोरोनामुक्त : 29162

    ऍक्टिव्ह रुग्ण : 8212

    एकूण मृत्यू : 545

    एकूण नमूने तपासणी : 316119

  • 15 Apr 2021 07:12 PM (IST)

    नागपुरात दिवसभरात तब्बल 74 रुग्णांचा मृत्यू, तर 5813 नवे कोरोनाबाधित

    नागपूर :

    नागपुरात आज कोरोना मृत्यूने गाठला 74 रुग्णांचा आकडा

    तर आज 5813 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    दिवसभरात 4634 जणांनी केली कोरोनावर मात

    एकूण रुग्ण संख्या – 299849

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 232705

    एकूण मृत्यू संख्या – 6034

  • 15 Apr 2021 06:06 PM (IST)

    मोठी बातमी ! राज्यातील लॉकडाऊन अधिक कडक होणार, गर्दी कमी होत नसल्याने सरकारचा निर्णय

    राज्यात सुरु असलेला लॉकडाऊन आणखी कडक होणार आहे. गर्दी कमी होत नसल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. किराणा तसेच भाजी खरेदीसाठी लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन आहे, असं वाटत नाही. त्यामुळे राज्य सरकार लॉकडाऊन आणखी कडक करण्याच्या तयारीत आहे. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. आता प्रशासनाला पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. काही निर्बंध कडक केले जाऊ शकतात. लोकल प्रवासावर निर्बंध घातले जातील. तसेच सर्वसामान्यांनाही पेट्रोल मिळणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच इंधन दिलं जाणार आहे.

    विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?

    लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. दोन दिवसात कडक कारवाई केली जाणार

    सर्वसामान्यांना पेट्रोल डिझेल मिळणार नाही. तहसीलदारांच्या पत्रानुसार केवळ अत्यावश्यक सेवेसाठी इंधन दिले जाणार. याबाबत सरकार विचाराधीन

    लोकल सेवेचा अत्यावश्यक सेवा वगळून इतरांनी वापर केल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई केली जाणार

    लोकल सेवा वापरबाबत कडक निर्बंध करावे त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणी झाली आहेत

    परप्रांतीय कामगारांना घरी जाण्यासाठी सूट दिली आहे. त्याचा फायदा घेऊन खाजगी आणि सार्वजनिक वाहतूक केली जात आहे

    आणखी एक दिवस जनतेला पुन्हा आम्ही विनंती करतोय. अन्यथा कडक कारवाई

    अत्यावश्यक सेवेतील भाजीपाला आणि किराणा यांना दिलेली सूट रद्द करता येईल का? याबाबत सरकार विचाराधीन

  • 15 Apr 2021 05:54 PM (IST)

    सोलापुरात होम क्वारंटाईन असलेल्या कोरोनाबाधित पत्रकाराची आत्महत्या

    सोलापूर :

    होम क्वारंटाईन असलेल्या पत्रकाराची आत्महत्या

    हाताची नस कापून केली आत्महत्या

    प्रकाश जाधव असे आत्महत्या केलेल्या पत्रकाराचे नाव

    दोन दिवसांपूर्वीच वडिलांचा कोरोनाने झाला होता मृत्यू

    आई कोरोना पॉझिटिव्ह असल्याने आईवर सुरू आहेत हॉस्पिटलमध्ये उपचार

    आईला उपचारासाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळवण्यासाठी प्रकाशने मारल्या होत्या अनेक फेऱ्या

    मात्र त्याला इंजेक्शन उपलब्ध न झाल्याची प्राथमिक माहिती

    डिप्रेशनमधूनच नस कापून घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती

    सुशील नगर येथील घरात नस कापून केली आत्महत्या

  • 15 Apr 2021 05:50 PM (IST)

    सातारा जिल्ह्यात दिवसभरात 22 रुग्णांचा मृृत्यू, तर 1184 नवे बाधित

    सातारा कोरोना अपडेट :

    सातारा जिल्हयात एका दिवसात कोरोनामुळे 22 जणांचा मृत्यू, तर 1184 जणांचा अहवाल आला कोरोना पाॅझिटीव्ह

    जिल्हयात 10 हजार 575 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत

    जिल्ह्यात आतापर्यंत 2028 कोरोना बाधितांचा मृत्यू

    जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.सुभाष चव्हाण यांची माहिती

  • 15 Apr 2021 05:47 PM (IST)

    अमरावतीत पुन्हा कोरोनाचा कहर सुरु, दिवसभरात तब्बल 534 नवे रुग्ण, 10 जणांचा मृत्यू

    अमरावती कोरोना अपडेट :

    -अमरावती जिल्हात पुन्हा कोरोनाचा कहर सुरू

    -अमरावतीत आज 534 नवीन कोरोना पॉझिटिव्ह

    -10रुग्णांचा आज कोरोनाने उपचारा दरम्यान मृत्यू

    -676 रुग्णांनी केली आज कोरोनावर मात

    -जिल्हात आतापर्यंत 54497 कोरोना पॉझिटिव्ह

    -आतापर्यंत 50160 रुग्णांनी केली कोरोनावर मा

    -749 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू

    -जिल्हात 3588 रुग्णांवर उपचार सुरू

  • 15 Apr 2021 05:43 PM (IST)

    13 एप्रिलच्या पहाटे ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे नालासोपाऱ्यात 65 रुग्णांचा मृत्यू, किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप

    नालासोपारा येथील विनायक हॉस्पिटल आणि रिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी रुगणाचा मृत्यू झाल्याच्या आरोपा नंतर भाजपा नेते किरीट सोमया यांनी आज दोन्ही रुग्णालयाला भेट दिली आहे.

    पालिका हद्दीतील मृत्यूची संख्या वाढत आहे..पण वसई विरार महापालिका आयुक्त मृत्यूचे आकडे लपवत असल्याचा दावा किरीट सोमया यांनी केला आहे. 12 एप्रिल च्या रात्री आणि 13 एप्रिलच्या पहाटे ऑक्सिजन तुटवड्यामुळे नालासोपाऱ्यात 65 कोव्हिड रुगणाचा मृत्यू झाला झाला पण वसई विरार महापालिकेने ते आकडे लपवले असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे.

    महापालिका हद्दीतील मृत्यू प्रमाणपत्र दाखवत एप्रिल महिन्यात आजपर्यंत 201 कोव्हिड रुगणांचे मृत्यू झाले. पण वसई विरार पालिकेने फक्त 23 मृत्यू दाखविले आहेत.

    ठाणे महापालिकेत 309 जणांचे मृत्यू झाले पण केवळ 57 दाखवले आहेत.

    या सर्व घटनेला संबधित आयुक्त आणि ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप ही सोमय्या यांनी केला आहे.

  • 15 Apr 2021 05:39 PM (IST)

    सोलापूर ग्रामीण भागात 16 रुग्णांचा मृत्यू

    सोलापुर : ग्रामीण भागातील 16 जणांचा मृत्यू, 717 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, पंढरपूर तालुक्यातील आज 171 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, ग्रामीण भागातील 6 हजार 252 सक्रिय रुग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

  • 15 Apr 2021 05:37 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात 24 तास पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा उपलब्ध

    वाशिम :

    वाशिम जिल्ह्यात 24 तास पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा उपलब्ध

    अकोला व जालना इथं रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे पुरवठा केला बंद

    खासदार भावना गवळी व जिल्हा प्रशासनाच्या अधिकारी यांच्या बैठकीत आलं समोर

    अमरावती इथून ऑक्सिजनची करणार मागणी

  • 15 Apr 2021 05:36 PM (IST)

    जालना शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांचे डॉक्टरांवर गंभीर आरोप

    जालना शासकीय रुग्णालयातील कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला असून, कोव्हिड रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.

  • 15 Apr 2021 05:34 PM (IST)

    पुणे जिल्ह्यासाठी प्रशासनाला 30 हजार अँटीजन टेस्ट किट प्राप्त

    पुणे –

    – पुणे जिल्ह्यासाठी प्रशासनाला 30 हजार अँटीजन टेस्ट किट प्राप्त,

    – पुढील तीन दिवसात चाचण्या करण्यासाठी ग्रामीण भागात उपलब्ध केल्या किट,

    – जिल्ह्यातील 234 हॉटस्पॉट भागात केल्या जाणार चाचण्या,

    – जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोनाची स्थिती गंभीर,

    – रुग्णसंख्या ट्रेसिंग करण्यासाठी प्रशासनानं उपलब्ध. केल्या किट,

    – जिल्हा परिषद सीओई आयुष प्रसाद यांची माहिती,

  • 15 Apr 2021 05:32 PM (IST)

    कोरोनाबाधित मृत रुग्णांच्या अंत्यविधीसाठी जागा अपुरी पडू लागली

    सोलापूर : कोरोनाबाधित मृत रुग्णांच्या अंत्यविधीसाठी रुपाभवानी स्मशानभूमीतील जागा अपुरी पडू लागली, मृत पावलेल्या रुग्णांच्या अंतिम संस्काराचा राख सावडण्या आधीच मृतदेहांची गर्दी, राख सावडण्यासाठी सुद्धा स्मशानभूमीत कुणी फिरकेना, सोलापुरात कोरोनाबाधित रुग्णांबरोबर कोरोनाने मृत पावणाऱ्याची संख्या वाढू लागली

  • 15 Apr 2021 05:30 PM (IST)

    राज्य सरकारच्या आर्थिक पॅकेजवर सुधीर मुनगंटीवार नाराज

    चंद्रपूर : महाराष्ट्रातील संचारबंदी आणि छोट्या घटकांना पॅकेजबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी, हातावर पोट असणाऱ्या सर्वांना मदतीचा हात देण्याची गरज असल्याचे मत, आमदार निधीसह अन्य निधीतील वाढ थांबवून छोट्या घटकांना पॅकेज द्यावे, अशी मागणी. खाजगी नोकरीत असलेल्या मात्र केशरी कार्डधारकांना पॅकेजचा लाभ होईल का? असा विचारला सवाल, शिवभोजन मागेल त्याला मिळेल का? की निकषात बसेल त्याला?  असा विचारला प्रश्न,  सर्व लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेत यावर तोडगा काढण्याची मागणी, फेरीवाल्यांना मदत देण्याबाबत नोंदणीच नसल्याचे आणून दिले लक्षात, औषधाच्या कोट्यवधींच्या तरतुदीचा पॅकेजमध्ये समावेश केल्याबद्दल व्यक्त केले आश्चर्य, छोट्या घटकांना मदत करा ही भाजप नव्हे तर काँग्रेसचीही मागणी आहे हे आणून दिले लक्षात, आर्थिक अडचणी सांगताना 1 लाख कोटींहून अधिकचा निधी अन्य गोष्टींवर खर्च केल्याचे आणून दिले लक्षात

  • 15 Apr 2021 04:54 PM (IST)

    …तर आम्ही सविनय कायदेभंग करुन लोकांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन देऊ : प्रविण दरेकर

    विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्यात 50 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करुन देण्याबाबतचं आश्वासन दिलं आहे. याच पार्श्वभूमीवर गुजरातच्या फार्मा कंपनीच्या मालकासोबत राज्याच्या आरोग्य आणि औषध प्रशासन मंत्री यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिलीय. सरकारने जर रेमडेसिव्हीरसाठी परवानगी दिली नाही तर आम्ही सविनय कायदेभंग करुन लोकांना इंजेक्शन वाटू, असा इशारा दरेकर यांनी दिला.

    प्रविण दरेकर नेमकं काय म्हणाले?

    गुजरातची ब्रोफ फार्मा कंपनीच्या मालकांशी आज मी चर्चा केली. एक्सपोर्टचे डिस्ट्रिब्यूटरही आहेत. निर्यात करणारा जो माल थांबवला आहे तो माल आपल्या राज्यात विकायला परवानगी द्या. मी 50 हजार रेमडेसिव्हीर देतो असं सांगितलं आहे. या इंजेक्शनचं रोज 20 हजार उत्पादन होतं, असं फार्मा कंपनीच्या मालकाने सांगितलं आहे. याबाबत राज्य सरकारने परवानगी दिली तर रेमडेसिव्हीरच्या तुटवड्याचा प्रश्न तातडीने मार्गी लागेल.

    आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री राजेंद्र शिंगणे आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली. तेही या दृष्टीने सकारात्म पाठिंबा देत आहेत. आज संध्याकाळी त्यांची बैठक आहे. मी परवानगीबाबत राजेंद्र शिंगणे यांना पत्र पाठवले आहे. गुजरात सरकारने कशा पद्धतीने परवानगी दिलीय त्याचाही दाखला मी पत्रात दिला आहे. मी मुद्दामून कंपनी मालक आणि डिस्ट्रिब्यूटरला बोलावलं आहे.

    शिंगणे साहेब या खात्याचे मंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस यांचंही केंद्राशी बोलणं सुरु आहे. पण राज्य सरकारने पररवानगी दिली. शिंगणे यांनी यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. कोणत्याही अडचणी येणार नाही, अशी परवानगी द्यावी. तुम्ही परवानगी दिली नाही. तर सविनय कायदेभंग करुन आम्ही लोकांना हे इंजेक्शन देऊ. याबाबत आम्ही मंत्र्यांना कल्पाना दिली आहे.

    आज औषधं न मिळाल्यामुळे लोकं मरत आहेत. त्यामुळे आम्ही या विषयावर राजकारण करत नाही आहोत. याशिवाय राजेंद्र शिंगणे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ऑक्सिजन साठ्यासाठी आम्ही सरकारला पूर्ण मदत करु.

  • 15 Apr 2021 04:39 PM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेणार

    पुणे :

    – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या पुण्यात कोरोना स्थितीचा घेणार आढावा,

    – जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येचा आढावा घेत अजित पवार पुण्यासाठी नेमकं काय करणार ?

    – जिल्ह्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर ,रेमडेसीवीरची मोठी कमतरता,

    – पुण्याला राज्य सरकार मदत करत नसल्याचा मनपा सत्ताधारी भाजपचा आरोप,

    – पुण्यात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली पुणेकरांनी केलं उल्लंघन अजित पवार प्रशासनाला काय सांगणार ?

    – उद्या दूपारी 4 वाजता प्रशासनासोबत घेणार बैठक ,

  • 15 Apr 2021 04:36 PM (IST)

    पुण्यातील कोरोना रूग्णांसाठी दिलासादायक बातमी, ससूनमध्ये आणखी 300 बेड्स कोविड रूग्णांसाठी वाढणार

    ब्रेक –

    – पुण्यातील कोरोना रूग्णांसाठी दिलासादायक बातमी

    – ससूनमध्ये आणखी 300 बेड्स कोविड रूग्णांसाठी वाढणार,

    – ससूनमधील कोविड बेड्सची संख्या 500 वरून 800 वर

    – ससून डीन डॉ. मुरलीधर तांबे आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या बैठकीत निर्णय

    – जिल्हाधिकारी देशमुख यांनी घेतला ससूनच्या आरोग्यसेवेचा आढावा

    – ससूनमध्ये सध्या कोविडसाठी फक्त 526 बेड्स होते

    – ससूनमधीन नवे 300 बेड्स ऑक्सीजन युक्त असणार

    – ससून डीन डॉ मुरलीधर तांबे यांची माहिती

  • 15 Apr 2021 04:15 PM (IST)

    नागपूर शहराच्या वेगवेगळ्या भागात पोलिसांचा रूट मार्च

    नागपूर :

    नागपूर शहराच्या वेगवेगळ्या भागात पोलीस करत आहे रूट मार्च

    तर काही सोसायट्या मध्ये जाऊन केली जात आहे अनाऊन्समेंट

    गल्लीबोळात नागरिकांनी बाहेर फिरू नये यासाठी पोलीस करत आहे रूट मार्च

    नागरिकांना घरातच राहण्याच केलं जातं आहे आवाहन

    वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीत टीम बनवून पोलीस करत आहे पेट्रोलिंग

  • 15 Apr 2021 04:09 PM (IST)

    पुणे जिल्ह्यातील 215 ग्रामपंचायती कोरोनामुक्त

    पुणे : पुणे जिल्ह्यातील 215 ग्रामपंचायती कोरोनामुक्त

    शिवाय अन्य 229 ग्रामपंचायतींनी गेल्यावर्षभरापासून कोरोनाला वेशीवरच रोखून धरलं

    या ग्रामपंचायतींनी मागील १३ महिन्यांपासून कोरोनाला आपापल्या गावात एंट्रीच करू दिलेली नाही

    यामुळे कोरोनामुक्त झालेल्या आणि अद्याप गावात एंट्री न मिळू दिलेल्या ग्रामपंचायतींची संख्या 444 इतकी आहे

    कोरोनामुक्त ग्रामपंचायतींची तालुका निहाय संख्या-

    आंबेगाव तालुका- १९,
    बारामती तालुका -१६,
    भोर तालुका -१०१,
    दौंड तालुका -१२,
    हवेली तालुका -२२,
    इंदापूर तालुका -२७,
    जुन्नर तालुका -११,
    खेड व मावळ तालुका प्रत्येकी – ६२,
    मुळशी तालुका -२४,
    पुरंदर तालुका -२२,
    शिरूर तालुका -१०
    वेल्हे तालुका – ५६.

  • 15 Apr 2021 04:03 PM (IST)

    वाशिममधील रुग्णांना बेड मिळेना, परिस्थिती भयानक

    वाशिम : वाशिम जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. वाशिम शहरातील प्रशासनाने नेमून दिलेल्या कोविड खाजगी रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे कोविड रुग्णांचे हाल होत आहे. जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या बघता गंभीर परिस्थिती जिल्हा प्रशासनासमोर निर्माण होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार भावना गवळी आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्याची बैठक सुरू आहे. या बैठकीत बेडसह अक्सिजन प्लँटसह इतर उपयोजनांबाबत चर्चा सुरु आहे.

  • 15 Apr 2021 03:23 PM (IST)

    पुण्याला साडेतीन हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळाले, जिल्हाधिकाऱ्यांनी थेट दिल्लीहून मागवले

    पुणे –

    – पुण्याला 3.5 हजार रेमडिसीवर इंजेक्शन मिळाले,

    – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी थेट दिल्लीतून मागवले 3500 इंजेक्शन,

    – एक्सपोर्ट स्टॉकमधील रेमडीसीवर मिळवण्यात जिल्हाधिकारी यशस्वी,

    – आज सकाळीच रूग्णांच्या नातेवाईकांनी कलेक्टर ऑफिससमोर केलं होतं आंदोलन,

    – गेल्या आठवडाभरापासून पुण्यात रेमडिसीवीरचा तुटवडा

  • 15 Apr 2021 03:16 PM (IST)

    तुळजापुरात संचारबंदी लागू झाल्यामुळे शहरातील रस्त्यावर शुकशुकाट

    महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या नगरीत संचारबंदी सुरु होताच रस्त्यावर शुक शुकाट आहे. श्री तुळजाभवानी मातेचा परिसर एरवी भक्तांच्या गर्दीने मोठा गजबजलेला असायचा. मात्र संचारबंदी सुरु होताच मोठा सन्नाटा पसरलेला आहे. अत्यावश्यक सेवा सोडून इतर दुकाने बंद आहेत. विनाकारण घराबाहेर पडल्यास कारवाईचा इशारा पोलीसांमार्फत देण्यात आला आहे.

  • 15 Apr 2021 02:18 PM (IST)

    कोरोनाच्या महामारीला राष्ट्रीय आपत्ती घोषीत करा मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

    कोरोनाच्या महामारीला राष्ट्रीय आपत्ती घोषीत करा मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

    कोरोनाच्या मुकाबल्यासाठी राज्य सरकारने ५ हजार ४०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले

    केंद्रानेही या महामारीला राष्ट्रीय आपत्ती घोषीत करावी, राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) अंतर्गत गरजू लोकांना आर्थिक मदत द्यावी

    अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे

  • 15 Apr 2021 02:05 PM (IST)

    नागपूरसह इतर जिल्ह्यातील 150 रुग्णांवरती सध्या अमरावतीमध्ये उपचार सुरु 

    अमरावती –

    नागपूरसह इतर जिल्ह्यातील 150 रुग्णांवरती सध्या अमरावतीमध्ये उपचार सुरु

    बाह्य रुग्णांमुळे मात्र जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडताना दिसतोय

    अमरावती जिल्ह्यात बेडचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येते आहे

     

  • 15 Apr 2021 12:42 PM (IST)

    पुण्यात ग्राहकांकडून पैसे आकारुन शिवभोजन थाळी, सर्क्युलर न मिळाल्याचं कारण

    पुणे

    सर्क्युलर न आल्यामुळे शिवभोजन थाळी मोफत नाही,

    पुण्यात ग्राहकांकडून पैसे आकारूनच थाळी दिली जात आहे

  • 15 Apr 2021 12:40 PM (IST)

    कोरोनाची साखळी तोडण्यासाठी रात्रीपासून सुरु केलेल्या आचारसंहितेचा नालासोपाऱ्यात फज्जा

    नालासोपारा –

    – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी रात्रीपासून सुरु केलेल्या आचारसंहितेचा नालासोपाऱ्यात फज्जा

    – नालासोपारा पूर्व-पश्चिम भागात नेहमीचीच वर्दळ सुरू

    – बाजारपेठेतील दुकान बंद मात्र शेकडो वाहन, नागरिक मोठ्याप्रमानात विनाकारण रस्त्यावर दिसत आहेत फिरताना

    – पोलिसांकडून ठीक ठिकाणी नाकाबंदी करून वाहन आणि पायी चालणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी सुरू

    – तरीही विना कारण नागरिक, वाहनधारक रस्त्यावर फिरत असल्याने अनेक ठिकाणी होतेय वाहतूक कोंडी, गर्दी

    – नागरिकांना नाकाबंदीत चौकशी करताना होतेय दमछाक

    – अशीच परिस्थिती पुढचे 15 दिवस राहिली तर कोरोनाची साखळी तुटणार कशी असा गंभीर आहे प्रश्न

  • 15 Apr 2021 12:26 PM (IST)

    रेमडेसीव्हीर इन्जेक्शनसाठी अमरावतीत रांगा

    रेमडेसीव्हीर इन्जेक्शनसाठी अमरावतीत रांगा

    इन्जेक्शनसाठी सकाळपासूनच कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील मेडीकलसमोर मोठी रांग लागल्याचे दृश्य

    जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे अमरावतीच्या पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयामध्ये  रेमडेसीव्हीर इन्जेक्शनसाठी नियंत्रण कक्ष निर्माण केला

    या ठिकाणी शासनाने आखून दिलेल्या किमतीत इन्जेक्शन नातेवाईकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.

    असे वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. अनिल देशमुख यांनी सांगितले

  • 15 Apr 2021 12:08 PM (IST)

    राज्यात रेमडेसीव्हीरचा तुटवडा, मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत, आरोग्य राज्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

    कोल्हापूर :

    कोल्हापूर – राज्यात रेमडेसीव्हीरचा तुटवडा आहे

    मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत आहे

    आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे स्पष्टीकरण

    येणाऱ्या काळामध्ये ही तफावत कमी करण्यात येईल

    यामध्ये नक्की सुधारणा दिसेल

    कोल्हापूर जिल्ह्यातही रेमडी सिवर उपलब्ध केल्या जाणार

    रेमडी सिवरच्या वापराचे प्रमाण खाजगी रुग्णालयात जास्त

    रेमडी सिवर किती प्रमाणात वापरावे याबाबत खाजगी रुग्णालयांना सूचना दिल्या आहेत

  • 15 Apr 2021 11:55 AM (IST)

    मुक्ताईनगरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई

    मुक्ताईनगर –

    – जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात संचार बंदीला ग्रामीण भागातही पोलिसांच्यावतीने कडेकोट बंदोबस्त विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई तर कसून चौकशी

    – मुक्ताई मंदिर परिसरात सर्वत्र शुकशुकाट

    – अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यात काही दुकाने सुरु तर काही दुकाने बंद

    – विनाकारण मास्क न लावणाऱ्याचां काही ठिकाणी वावर

    – पेट्रोल पंपावर ही गर्दी नाही

  • 15 Apr 2021 11:48 AM (IST)

    पुण्यात रेमडेसीव्हीरसाठी सुरु असलेलं रुग्णांच्या नातेवाईकांचे आंदोलन मागे

    पुणे

    रेमडेसीव्हीरसाठी सुरु असलेलं रुग्णांच्या नातेवाईकांचे आंदोलन मागे

    अतिरिक्त जिल्ह्यधिकारी विजयसिंग गायकवाड यांनी समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी घेतलं आंदोलन मागे

    रेम्डीसिव्हरची मागणी आणि पुरवठा यात मोठी तफावत असल्यानं जिल्हात तुटवडा

    प्रशासनाचे रेम्डीसिव्हर उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न सुरु

    लवकरात लवकर रेम्डीसिव्हर उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन

  • 15 Apr 2021 11:19 AM (IST)

    सांगली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडे केवळ 9 हजारच्या आसपास लसीचा साठा शिल्लक

    सांगली-

    सांगली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडे केवळ 9 हजारच्या आसपास लसीचा साठा शिल्लक

    आज पुढील काही तासात हा लसीचा साठा संपणार.

    नवीन लसीचा साठा मिळेपर्यंत जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेला आज पुन्हा ब्रेक लागणार

    दररोज साधारण 18 ते 20 हजार होतेय लसीकरण, आतापर्यंत 3 लाखाहून अधिक नागरिकांना लसीकरण

  • 15 Apr 2021 11:00 AM (IST)

    पुण्यात सरकारी रेमडेसीव्हीर इन्जेक्शनचा काळाबाजार करणारे पाच आरोपी अटकेत

    पुणे

    पुण्यात सरकारी रेमडेसीव्हीर इन्जेक्शनचा काळाबाजार करणारे पाच आरोपी अटकेत

    पाचही आरोपी दौंड येथील, चंदननगर पोलिसांनी केली कारवाई

    पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून इंजेक्शनचा काळाबाजार करताना चौघांना केली अटक

    त्यांच्या ताब्यातून दोन इंजेक्शन हस्तगत करण्यात आलीत..

    या प्रकरणी अन्न आणि औषधे विभागाने यांच्या वतीने चंदननगर पोलिसात केली तक्रार दाखल

  • 15 Apr 2021 10:59 AM (IST)

    सांगली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडे केवळ 9 हजारच्या आसपास लसीचा साठा शिल्लक

    सांगली-

    सांगली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडे केवळ 9 हजारच्या आसपास लसीचा साठा शिल्लक

    आज पुढील काही तासात हा लसीचा साठा संपणार.

    नवीन लसीचा साठा मिळेपर्यंत जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेला आज पुन्हा ब्रेक लागणार

    दररोज साधारण 18 ते 20 हजार होतेय लसीकरण, आतापर्यंत 3 लाखाहून अधिक नागरिकांना लसीकरण

  • 15 Apr 2021 10:58 AM (IST)

    नाशिक बाजार समितीत भाजीपाला विक्री-खरेदी करण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी

    नाशिक –

    – नाशिक बाजार समितीत भाजीपाला विक्री-खरेदी करण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी

    – संचारबंदीत असतांना ही नागरिकांनी गर्दी करत उडवला बाजार समिती आवारात फज्जा

    – भाजीपाला खरेदी व विक्रीसाठी अनेकांनी केली विना मास्क गर्दी

    बाजार समिती प्रशासनाची बघाची भूमिका

  • 15 Apr 2021 10:58 AM (IST)

    लाॅकडाऊनच्या पाश्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरची वर्दळ थांबली

    रत्नागिरी-

    मुंबई-गोवा महामार्गावर शुकशुकाट

    लाॅकडाऊनच्या पाश्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरची वर्दळ थांबली

    वळणावळाच्या निवळी घाटातील शुकशुकाची दृष्ये ड्रोनच्या माध्यमातून

    अत्यावश्यक सेवेची वाहने रस्त्यांवर, मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी चेकिंग

    लाॅकडाऊनमुळे चाकरमान्यांची वाहने महामार्गावर नाहीत

    कोकणाची लाईफलाईन लाॅकडाऊनमुळे थांबली

  • 15 Apr 2021 10:51 AM (IST)

    मुंबईची लाईफलाईन, लोकलमध्ये पिकअवर्समध्ये गर्दी, केवळ 50 टक्के गर्दी ओसरली

    मुंबई –

    – मुंबईची लाईफलाईन रेल्वेत पिक अवरमध्ये गर्दी, केवळ 50 टक्के गर्दी ओसरली

    – रेल्वे स्टेशन फलटावर, रेल्वेच्या आत सोशल डिस्टेन्सिंगचं पालन करण्याचं सगळ्यात मोठ्ठं आव्हान

    – लाॅकडाऊनला सर्वसामान्यांचा तीव्र विरोध, खाणार काय हा सगळ्यांचा एकच प्रश्न

    – अत्यावश्यक सेवेतील कर्माचार्यांसोबच इतरांचाही प्रवास सुरु

    – रेल्वे प्रवास नेमका कसा सुरू आहे

  • 15 Apr 2021 10:40 AM (IST)

    संचारबंदीनंतर पूजाविधीसाठी नाशिकच्या रामकुंडावर तोबा गर्दी

    नाशिक –

    – संचारबंदीनंतर नाशिकच्या रामकुंडावर तोबा गर्दी

    – पूजाविधी करण्यासाठी होत गर्दी

    – पोलीस किंवा महानगरपालिका प्रशासनाकडून कुठलीही समज किंवा कारवाई नाही

    – नाशिक हॉटस्पॉट मग कसा होणार कोरोनाचा प्रादुर्भाव कमी

  • 15 Apr 2021 10:31 AM (IST)

    कराडमध्ये बाजारपेठा पूर्णपणे बंद

    काल रात्री पासून जाहीर केलेल्या पंधरा दिवसाच्या लॉकडाऊनला कराडमध्ये प्रतिसाद

    कराडमध्ये बाजारपेठा पूर्णपणे बंदआहे

    जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानांना मुभा असली तरी संचारबंदीमुळे ठिक ठिकाणी  पोलिसांनी नाकाबंदी केली आहे

    यामुळे बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूच्या दुकानात तुरळक गर्दी दिसून येते

  • 15 Apr 2021 10:00 AM (IST)

    दहिसरमध्ये चौकाचौकांमध्ये बंदोबस्त, वाहनाच्या लांबच लांब रांगा

    मुंबई –

    कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारच्या वतीने संचारबंदी लागू करण्यात आली आहे

    यानंतर पोलिसांनी देखील चौकाचौकांमध्ये बंदोबस्त लावण्यात आलेला आहे

    दहिसर चेकनाका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या दिसून येत आहेत

    येणाऱ्या नागरिकांचे चौकशी केली जाते

  • 15 Apr 2021 09:42 AM (IST)

    मुंबई महापालिका आयुक्तांनी मुंबईसाठी तब्बल दोन लाख रेमडेसीव्हीर इन्जेक्शन उपलब्ध करवून दिले

    महाराष्ट्रासह देशभरात रुग्णांचा रेमडेसिवीर मिळण्यासाठी आक्रोश सुरु असताना मुंबई महापालिका आयुक्तांनी मुंबईसाठी तब्बल दोन लाख रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध केली आहे

    पालिकेने 2 लाख रेमडीसीविर औषधच टेंडर काढल होत , टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार आहेत

    आता पर्यंत 60 हजार रेमडीसीविर आलेले होते यातील 35 हजार वापरले गेले

    पुढील काही आठवडे 50 हजाराच्या स्लॉटने रेमडीसीविर औषध उपलब्ध होणार आहेत

  • 15 Apr 2021 09:18 AM (IST)

    ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी वायू सेनेची मदत द्या, खासदार भावना गवळी यांचे पंतप्रधानांना पत्र

    यवतमाळ –

    खासदार भावना गवळी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंग यांना पत्र

    ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी वायू सेनेची मदत द्या,

    वायुसेनेच्या हेलिकॉप्टर, विमान द्वारे ऑक्सिजन लवकर पोहचविणे शक्य होईल

    वाहनाने ऑक्सिजन साठा पोहचविण्यास वेळ जातो त्याकरिता  वायुसेनेच्या हवाई यंत्रणेची मदत दयावी अशी मागणी केली आहे

  • 15 Apr 2021 09:02 AM (IST)

    संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी नालासोपारा रेल्वेस्थानाकात हरताळ फासल्याचे चित्र

    नालासोपारा –

    कोरोनाचा साखळी तोडण्यासाठी 15 दिवसाची संचारबंदी लागू केली आहे

    पण या संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी नालासोपारा रेल्वेस्थानाकात हरताळ फासल्याचे चित्र आहे

    सकाळ च्या वेळेत तुडुंब गर्दीने भरून लोकल मुंबईच्या दिशेने जात आहेत

    नालासोपारा रेल्वेस्थानाकातून दिवसाला लाखो प्रवासी मुंबईच्या दिशेने प्रवास करतात तीच परिस्थिती आजही नालासोपारा रेल्वेस्थानाकात आहे

    जर संचारबंदी मध्ये अशीच परिस्थिती राहिली तर कोरोनाची साखळी तोडणे प्रशासनासमोर एक मोठे अहवान असणार आहे

     

  • 15 Apr 2021 08:52 AM (IST)

    आता नवी मुंबई करांसाठी 80% बेड आरक्षित

    नवी मुंबई

    आता नवी मुंबई करांसाठी 80% बेड आरक्षित

    कोव्हीड रूग्णांसाठी बेड राखीव ठेवण्याचे खाजगी रूग्णालयांना बंधनकारक

    मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आदेश

    नियंत्रित 80 टक्के बेड्स व रूग्णालय व्यवस्थापनामार्फत नियंत्रित 20 टक्के बेड्सची फलक लावावे

    आयसीयू बेड्सच्या संख्या वाढीप्रमाणेच खाजगी कोव्हीड रूग्णालयांतही आयसीयू बेड्स व व्हेटिलेटर्स मध्ये वाढ करण्याचे आदेश

    बेड्स उपलब्धेकरीता नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये यादृष्टीने 022-27567460 ही हेल्पलाईन

    या मदत कक्षाव्दारे कोव्हीड बाधितांना त्यांच्या लक्षणांच्या तीव्रतेनुसार बेड्स उपलब्ध करून देनात

  • 15 Apr 2021 08:29 AM (IST)

    कोल्हापूरच्या मार्केट यार्ड मध्ये कोरोना नियमांचा फज्जा

    कोल्हापूर –

    कोल्हापूरच्या मार्केट यार्ड मध्ये कोरोना नियमांचा फज्जा

    फळ आणि भाजी मार्केट मध्ये तोबा गर्दी

    अनेकजण फिरताहेत विना मास्क

    विक्रेते आणि ग्राहकांना कोरोना नियमांचं विसर

    वाहनांच्या ही लांबच लांब रांगा

  • 15 Apr 2021 08:28 AM (IST)

    पुण्यात रेमडेसीव्हीर मिळत नसल्याने नातेवाईक हवालदिल

    पुणे –

    रेमडेसीव्हीर मिळत नसल्याने नातेवाईक हवालदिल

    सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रस्त्यावरच मांडला ठिय्या

    रेम्डीसिव्हर मिळणार कधी, नातेवाईकांचा संतप्त सवाल

  • 15 Apr 2021 07:49 AM (IST)

    नागपुरात घरी, ॲम्ब्यूलंसमध्येच कोरोना बाधितांचा मृत्यू

    – घरी, ॲम्ब्यूलंसमध्येच कोरोना बाधितांचा मृत्यू

    – नागपूर महानगरपालिका उरली फक्त शव उचलण्यापूरतीच

    – नागपूरात ४२ हजार पेक्षा जास्त कोरोना रुग्ण घरीच घेतायत उपचार

    – वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक कोरोना रुग्णांचा मृत्यू

    – नागपूरातील कोरोनाची स्थिती भयावह

    – महानगरपालिका प्रशासनाचं नियोजन फोल

  • 15 Apr 2021 07:43 AM (IST)

    सकाळपासून वसई-विरार नालासोपारा रेल्वे स्थानकात तुरळक गर्दी

    विरार –

    काल रात्री पासून संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

    आज सकाळपासून वसई-विरार नालासोपारा रेल्वे स्थानकात तुरळक गर्दी पाहायाला मिळत आहे.

    अत्याआवश्यक सेवेतील कर्मचारी कामावर जात आहेत

    मात्र विरार रेल्वे स्थानकात कुठेही पोलीस अथवा RPF चे जवान दिसत नाहीत

    कोणत्याही नागरिकांची चौकशी केलीय जात नाही

    लोकल मधून सर्वच नागरिक प्रवास करताना दिसत आहेत

    आता या रेल्वे प्रवासात कोण प्रवास करत आहेत, हे मात्र गुलदस्त्यात आहे

    तर सकाळी विरार रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूस वर्दळीच चित्र दिसत आज मात्र तसं चित्र दिसत नाही

  • 15 Apr 2021 07:33 AM (IST)

    औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णांच्या आकड्यात पुन्हा मोठी वाढ

    औरंगाबाद –

    औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णांच्या आकड्यात पुन्हा मोठी वाढ

    काल एका दिवसात 1718 रुग्णांची झाली वाढ

    कोरोना बधितांचा आकडा पोचला 103254 वर पोचला आहे

    सध्या रुग्णालयात 15802 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

    तर काल एका दिवसात 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

    मृतांचा आकडा 2052 वर पोचला आहे.

  • 15 Apr 2021 07:31 AM (IST)

    पुण्यातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सोसायटी व्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना प्रवेश करण्यास प्रतिबंध

    पुणे :

    कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सोसायटी व्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना प्रवेश करण्यास प्रतिबंध

    तसेच, सोसायटीमध्ये नियमित येणाऱ्या कामगारांची कोरोना (आरटीपीसीआर) चाचणी आवश्यक असल्याचे प्रशासनाने केलं स्पष्ट

    गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश बंदी

    याबाबत सोसायटीच्या प्रवेशद्वारावर फलक लावण्याच्या सूचना

    सोसायटीमध्ये नियमित येणाऱ्या कामगारांची कोरोना चाचणी करण्यात यावी.

    केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण करून घेण्यात यावे.

    गृहनिर्माण सोसायटीमधील जिम, स्वीमिंग पूल आणि क्लब हाउस वापरण्यास यापूर्वीपासूनच प्रतिबंध

    आजपासून एक मेच्या सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार

    या कालावधीत सोसायटीतील नागरिकांना उद्यान आणि आवारातही फिरण्यावर प्रतिबंध राहणार

    नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने केलं स्पष्ट

  • 15 Apr 2021 07:23 AM (IST)

    नाशिक शहरातील मोकळी मैदाने आणि जॉगिंग ट्रॅक आजपासून बंद

    नाशिक –

    शहरातील मोकळी मैदाने आणि जॉगिंग ट्रॅक आजपासून बंद

    विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱयांवर थेट कारवाईचे आदेश

    ब्रेक द चेन ची कठोर अमंलबजावणी करणार

    महापालिका आयुक्त कैलास जाधव यांचा इशारा

  • 15 Apr 2021 07:23 AM (IST)

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची नवीन नियमावली प्रसिद्ध

    पुणे

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची नवीन नियमावली प्रसिद्ध

    १५ ते ३० एप्रिल या कालावधीत विद्यापीठातील सर्व विभाग बंद राहणार

    सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घरी राहून विद्यापीठ व संबंधित कार्यालयाच्या वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी पार पाडण्याच्या सूचना

    मात्र,अत्यावश्यक सेवेत येत असल्याने सुरक्षा विभाग, आरोग्य केंद्र, स्थावर व गृहव्यवस्थापन विभाग आवश्यकतेनुसार पूर्ण क्षमतेने सुरू राहणार

  • 15 Apr 2021 07:23 AM (IST)

    संचारबंदीला नाशिकमध्ये सकारात्मक प्रतिसाद

    नाशिक –

    संचारबंदीला नाशिकमध्ये सकारात्मक प्रतिसाद

    शहरात रात्री 8 नंतर शुकशुकाट आणि नाकाबंदी

    पोलिसांकडून शहरात कडक तपासणी

    प्रमुख रस्त्यांवर बॅरॅकेटिंग आणि तपासणी

    आजपासून आणखी कठोर तपासणी आणि कारवाई होण्याची शक्यता

  • 15 Apr 2021 07:13 AM (IST)

    निफाड तालुक्यात कोरोनाचा थैमान, 357 नवे रुग्ण

    – निफाड तालुक्यात कोरोनाचा थैमान

    – नविन कोरोना बाधित अहवाल पॉझिटिव्ह आलेले रुग्ण 357

    – आता पर्यंत कोरोनामुळे एकूण मृत्यू 280

    निफाड तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्ण 10058

    आजपर्यंत एकूण डिस्चार्ज – 7317

    सद्यस्थितीत उपचाराखालील रुग्ण – 2461

  • 15 Apr 2021 07:12 AM (IST)

    वसई-विरारमध्ये गेल्या 24 तासांत 641 रुगणाचे कोरोना पॉझिटिव्ह

    वसई-विरार

    गेल्या 24 तासांत 641 रुगणाचे कोरोना पॉझिटिव्ह

    दिवसभरात 8 जणांचा मृत्यू तर 288 जणांनी केली कोरोनावर मात

    वसई विरार महापालिकेत आजपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 41 हजार 022

    आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्ण संख्या 945

    कोरोनावर मात केलेल्या रुगणाची संख्या 33 हजार 327

    कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुगणाची संख्या
    6 हजार 750

  • 15 Apr 2021 07:10 AM (IST)

    प्रशासनाच्या नियोजनाला मोठं यश, नाशिकला मिळाले 7000 रेमडिसिव्हर

    नाशिक –

    प्रशासनाच्या नियोजनाला मोठं यश

    जिल्ह्याला मिळाले 7000 रेमडिसिव्हर

    प्रशासनाच्या प्रणालीनुसार मागणी केलेल्या 101 रुग्णालयांना मिळाले 4153 इंजेक्शन

    मागणी नुसार सर्वच रुग्णालयांना होणार रेमडिसिव्हर उपलब्ध

    जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्या नियोजनाला मोठं यश

  • 15 Apr 2021 07:10 AM (IST)

    मुंबईत गेल्या 24 तासांत 9 हजार 925 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

    मुंबईत गेल्या 24 तासांत 9 हजार 925 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

    गेल्या 24 तासांत 9 हजार 276 रुग्ण पूर्णपणे बरे झाले

    मुंबईतील मृतांची संख्या दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे

    आज दिवसभरात मुंबईत 54 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    मुंबईत सध्या 87 हजार 443 सक्रीय रुग्ण

  • 15 Apr 2021 07:04 AM (IST)

    राज्यात दिवसभरात 58 हजार 952 नवे कोरोना रुग्ण

    राज्यात दिवसभरात 58 हजार 952 नवे कोरोना रुग्ण

    दिवसभरात 278 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    गेल्या 24 तासांत 39 हजार 624 जण कोरोनामुक्त झाले

    राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 35 लाख 78 हजार 160 वर

    29 लाख 5 हजार 721 जण पूर्णपणे बरे