महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसला. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. राज्यातीलच नाही तर देशभरातील रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तसेच, रोजचे नवे रुग्णही कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत | Corona Cases and Lockdown News LIVE
मुंबई : सकल मराठा समाजाच्या प्रमुख सहा मागण्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या, असे संभाजी छत्रपती यांनी सांगितले. ते माध्यमांशी बोलत आहेत. “पहिला विषय आरक्षणाच होता. सर्वोच्च नायालयाने आरक्षण रद्द केले. आरक्षणासाठी रिव्ह्यू पिटीशनच्या माध्यमातून लढता येऊ शकते,” असे संभाजी छत्रपती म्हणाले.
सरकारने आमच्या मागण्यांची दखल झाली. 36 जिल्ह्यात मोर्चा काढण्याचा विचार होता. मराठा आरक्षणासंदर्भात रिव्ह्यू पिटिशन दाखल करणार आहोत.
सरकारने आमच्या मागण्यांची दखल झाली. 36 जिल्ह्यात मोर्चा काढण्याचा विचार होता. मराठा आरक्षणासंदर्भात रिव्ह्यू पिटिशन दाखल करणार आहोत. येत्या शनिवारी सारथीबाबत पुण्यात बैठक घेण्यात येणार आहे. दुसरा मुद्दा हा वसतीगृहाचा आहे. दर जिल्ह्यात वसतीगृह होणे गरजेचे आहे. त्या 36 पैकी 23 जिल्हे सरकारने निवडले आहेत. या वसतीगृहांना जो काही खर्च लागणार आहे. तोसुद्धा पुरवण्याचे सरकारने सांगितले आहे.
पंढरपूर : शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल
शहराची रुग्णसंख्या झपाट्याने झाली कमी
पंढरपूर शहरात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या फक्त 37
आज केवळ शहरात पाच बाधितांची झाली नोंद
निर्बंधाचे पालन तसेच प्रशासनाने घेतलेल्या कष्टाला फळ
अकोल्यात कोरोना अपडेट
अकोल्यात आज दिवसभरात 39 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दिवसभरात एकाचा मृत्यू झाला आहे
आतापर्यंत 1117 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 55148 जणांनी कोरोनावर मात केली आहे
तर सध्या 1056 रुग्ण उपचार घेत आहेत
तर दिवसभरात 102 जण कोरोनामुक्त झाले आहेत
चंद्रपूर: गेल्या 24 तासात, 44 नव्या रुग्णांची नोंद
जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांच्या वर
24 तासात एकाचाही मृत्यू नाही
एकूण कोरोना रुग्ण : 84408
एकूण कोरोनामुक्त : 82112
सक्रिय रुग्ण : 785
एकूण मृत्यू : 1511
एकूण नमूने तपासणी : 528064
नागपूर कोरोना अपडेट
नागपुरात आज 74 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
232 जणांनी केली कोरोनावर मात
तर 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
एकूण रुग्णसंख्या – 476651
एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 466460
एकूण मृत्यूसंख्या – 9015
पुणे कोरोना अपडेट
– दिवसभरात 257 नव्या कोरोना रुग्णांची वाढ
– दिवसभरात 284 रुग्णांना डिस्चार्ज
– पुण्यात करोनाबाधित 19 रुग्णांचा मृत्यू, तर पुण्याबाहेरील 11
– 437 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 475097
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2703
– एकूण मृत्यू -8509
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 463885
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5817
उस्मानाबाद – लोहारा तालुक्यातील धानुरी आणि तुळजापूर तालुक्यातील हंगरगा येथे कोरोनाचा स्फोट
धानुरी येथे एकाच दिवशी 37 तर हंगरगा येथे 11 रुग्ण सापडल्याने खळबळ
धानुरी सापडलेल्या 37 पैकी 13 रुग्ण हे 18 वर्ष पेक्षा खालील वयोगटातील
उस्मानाबाद जिल्ह्यात लहान मुले कोरोना बाधीत होण्याचे प्रमाण चिंताजनक
काल 115 कोरोना रुग्ण सापडले असून त्यात 20 रुग्ण हे 18 पेक्षा कमी वयोगटातील
जिल्ह्यात सध्या 624 ऍक्टिव्ह रुग्ण असून रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झालेले असताना 2 गावात कोरोना स्फोट
प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास केली सुरुवात
गेल्या 24 तासात भारतात 67 हजार 208 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे
तर 2 हजार 330 रुग्णांना प्राण गमवावे लागले
कालच्या दिवसात देशात 1 लाख 3 हजार 570 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले
सांगली –
जुलै पासून एक्सप्रेस गाड्या धावणार
कोरोनाच्या पशवभूमी वर रेल्वे दुसऱ्या लाटे नंतर टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्येत येत आहे
जनरल तिकीट रद्द होणे च्या मार्गावर
कोयना एक्सप्रेस वगळता सर्व एक्सप्रेस सुरू करण्येच्या हालचाली सुरू
जुलै पासून रेल्वे पूर्वपदावर करण्येच्या हालचाली सुरू
रेल्वे विभागा कडून सर्व विभागांना सज्ज राहन्येच्या सूचना
सोलापूर – डॉक्टरांवरील हल्ल्याविरुद्ध आयएमए तर्फे उद्या निदर्शने
कोरोना काळात देशभरात डॉक्टरांनी रुग्णांना सेवा देण्याचे काम केले
पण सेवा देणारे डॉक्टरांवर अनेक ठिकाणी झाले आहेत हल्ले
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरात सातशेहून अधिक डॉक्टरांना गमवावा लागला आहे आपला जीव
विविध मागण्यांसाठी व डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी सर्व डॉक्टर काळ्या फिती लावून काम करणार
वर्धा –
– जिल्ह्यात म्युकरमायकोसीसचे ११३ रुग्ण
– ३९ रुग्णांनी केली मात तर ७१ रुग्णांवर उपचार सुरू
– जिल्ह्यात तिघांचा मृत्यू
– सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयात सुरू आहे उपचार
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला
मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
पंचगंगा नदीचे पाणी पातळी ते वीस फुटांवर
पाणीपातळीत रात्रीत सात फुटांची वाढ
कसबा बावड्यातील राजाराम बंधारा पाण्याखाली
जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाची संततधार कायम
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढला पर्यटन स्थळे खुली करण्याचा आदेश
बीबी का मकबरा, अजिंठा-वेरूळ लेण्या, दौलताबादचा किल्ला, औरंगाबाद लेण्या आजपासून खुल्या
पर्यटन स्थळे सुरू झाल्यामुळे पर्यटन व्यवसायाला मिळणार चालना
देशभरात ऑक्सिजन एक्स्प्रेसने उत्कृष्ट काम करता रेकॉर्डतोड 31,000 मेट्रिक टन ऑक्सिजन पोहोचवलं