महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार 14 एप्रिल 2021 रात्री 8 वाजल्यापासून 1 मे 2021 पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील आणि या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. | Corona Cases and Lockdown News LIVE
After an elaborate meeting with 12 states, Central govt did mapping along with state governments on various requirements. 6177 metric tonnes of oxygen has been finalized to be distributed to states: Union Minister Piyush Goyal (1/2) pic.twitter.com/7wWEpISl80
— ANI (@ANI) April 18, 2021
Maharashtra to get the biggest share of 1500 metric tonnes of oxygen, Delhi to get 350 metric tonnes and Uttar Pradesh to get 800 metric tonnes: Union Minister Piyush Goyal (2/2)
— ANI (@ANI) April 18, 2021
चंद्रपूर: गेल्या 24 तासांत 4901 नमुने तपासणीतून 1584 नव्या रुग्णांची नोंद
24 तासात 25 जणांचा मृत्यू
एकूण कोरोना रुग्ण : 42231
एकूण कोरोनामुक्त : 30650
सक्रिय रुग्ण : 10981
एकूण मृत्यू : 600
एकूण नमूने तपासणी : 329846
वसई-विरार कोरोना अपडेट
मागच्या 24 तासात 908 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह
आज दिवस भरात 9 जणांचा मृत्यू
352 जणांनी केली कोरोनावर मात
वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 44,126 वर
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 34,790 वर
आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेली रुग्णांची संख्या 969 वर
कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 8367 वर
पुणे कोरोना अपडेट
– दिवसभरात 6443 नवे कोरोनाग्रस्त आढळले
– दिवसभरात 4712 रुग्णांना डिस्चार्ज
– पुण्यात 73 कोरोनाबाधितांचा मृत्यू, 20 रूग्ण पुण्याबाहेरील
– सध्या 1250 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 36737 वर
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 56636 वर
– एकूण मृत्यू -6109
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 304492 वर
कोल्हापूर:
भाजी मंडईच्या ठिकाणी अचानक केलेल्या रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये तब्बल वीस भाजीविक्रेते आढळले कोरोना पॉझिटिव्ह
कपिलतीर्थ मार्केटमध्ये 14 तर लक्ष्मीपुरी मार्केटमध्ये सहा विक्रेते पॉझिटिव्ह
इतक्या मोठ्या संख्येन भाजी विक्रते पॉझिटिव्ह आढल्यानं खळबळ
जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडासुद्दा वाढला
गेल्या 24 तासात तब्बल 594 नवे रुग्ण तर पंधरा जणांचा मृत्यू
सांगली कोरोना अपडेट
जिल्ह्यात आज दिवसभरात 830 नवे कोरोना रुग्ण
जिल्ह्यात आज कोरोनामुळे 14 रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यातील मृतांचा आकडा 1932 वर
सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 7053 वर
उपचार घेणारे 373 जण आज कोरोनामुक्त
बरे झालेल्या रुग्णांची संख्या 52110 वर
सांगलीत कोरोनाबाधितांचा आकडा 61095 वर
नागपूर कोरोना अपडेट
नागपुरात कोरोनामुळे दिवसभरात 85 जणांचा मृत्यू
दिवसभरात 7107 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
दिवसभरात 3987 जणांनी केली कोरोनावर मात
एकूण रुग्णसंख्या – 323106
आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या- 257590
आतापर्यंत मृत्यू- 6273
येवला : दिवसभरात आणखी 56 जणांना कोरोनाची लागण
आतापर्यंत 121जणांचा कोरोनामुळे मृत्यू
येवल्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला 3062 वर
आतापर्यंत 2460 जणांची कोरोनावर मात
सध्या 475 जणांवर उपचार सुरु
पुणे – कोरोनाची परिस्थिती भीषण होत चाललीय
– सरकारला परिस्थिती हातळता येत नसल्याने केंद्राकडे ढकलायचं
– आम्ही पण राजकारणात माहीर आहोत
– दररोज खोटं बोलताय, महाराष्ट्रात लशी जास्त आल्या
– त्या वाया गेल्यात आणि काळाबाजार केला
– माझा जाहीर आरोप आहे, त्याची श्वेत पत्रिका काढा
– केंद्राने रेमडेसिव्हीर द्यायचं नाही असं पत्र जाहीर केलं
– ते पत्र गुजरात FDA ने दिलेलं आहे
– त्याबाबतही सरकार उघडं पडलं
– देवेंद्र फडणवीस आणि दरेकर यांनी याबाबत आढावा घेताय
– आडव्हान्स देत नाही यामुळे कंपन्या अडून बसल्या आहेत.
– आम्ही द्यायला निघालो तर त्यावर आरोप झाले
– जो तयार त्याला दमबाजी केली गेली
– अशा खूप केसेस दाखल करा आम्ही घाबरत नाही
– वळसे पाटील सौम्य वाटले होते
– त्यांनाही इंजेक्शन दिलं की ते पूढे जाताय
– कमिशनसाठी हे सरकार अडून बसलय
– मोदी फोनवर उद्धवजींना दोनदा उपलब्ध झाले आहेत
– मोदी उपलब्ध होत नाहीत हे उद्धव ठाकरे खोटं बोलतायत
– लस, इंजेक्शन याबाबत सरकार उघडं पडलंय
– कार्यालयात बसून रुग्णांचे कागदपत्रे घेतली
– टोकन घेतलं आणि त्यांना फार्मासिस्ट कडून इंजेक्शन घ्यायला लावलं
– आम्ही असे इंजेक्शन वाटले आहे
– जी इंजेक्शन घेतली ती टॉकिस्ट आम्ही देऊ आणि ते वाटणार
– सत्ता गेली चुलीत, सर्वसामान्य माणूस मंत्र्यांना घरात बसू देणार नाही
– लोक प्रक्षुब्ध झालेत, वणवण फिरतायत
– चार कलेक्टरचे फोन आले, तुम्हाला खुश करू
– उध्दव ठाकरेंना काम करू द्या असं मी त्यांना सांगितलं
– पुण्यात येत्या आठवड्यात दोन हजार ऑक्सिजन बेड उपलब्ध करणार आहे
– हरभजन सिंग मला टेस्टिंग मोबाईल व्हॅन द्यायला तयार झालाय
-लोक द्यायला तयार आहे पण सरकार पुढे यायला तयार नाही
– मंत्र्यांनी पुढे येऊन काम केलं नाही तर लोक घरात घुसतील
– नगरसेवकांच्या निधीतून दोन ऑक्सिजन प्लान्ट उभे करणार आहे
– अजित दादांनी आमदार निधीतून काम करून घ्यायला पाहिजे अशी विनंती मी त्यांना केलीय
– मी एक कोटी रुपये कोविडसाठी द्यायचे जाहीर करतोय
– उर्वरित दोन कोटीही द्यायला तयार आहे
– नवाब मलिक यांनी त्या 16 कंपन्यांचे पत्र दाखवावे
– माझं जाहीर आव्हान आहे, खोटं बोलण्याची हद्द असते
– वर्धा जिल्ह्यात संचारबंदीच्या वेळेत शनिवारपासून बदल
– बाजारात होत असलेली गर्दी पाहता प्रशशनाने घेतला होता निर्णय
– अत्यावश्यक सेवेच्या दुकानांना दोन वाजेपर्यंत उघडण्याची मुभा
– दुपारी दोननंतर सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश
वाशिम कोरोना अपडेट
जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक
जिल्ह्यात आज 6 रुग्णांचा झाला मृत्यू
एकाच दिवशी आढळले नवे 474 नवे रुग्ण
दिवसभरात 196 जणांना देण्यात आला डिस्चार्ज
जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 22268
सद्यस्थितीत सक्रिय रुग्ण – 4044
आतापर्यंत कोरोनामुक्त – 17988
आतापर्यंत एकूण मृत्यू – 235
अमरावती : रॅपिड अँन्टिजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात 596 नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.
त्यानुसार रूग्णांची संख्या 56 हजार 572 वर पोहोचली आहे.
वर्धा जिल्हा प्रशासनाजवळील रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा साठा संपला
– आज जिल्ह्याच्या सावंगी, सेवाग्राम रुग्णालयात रुग्णांना देण्यात आली इंजेक्शन
– 4500 इंजेक्शनची केली आहे मागणी
– अद्याप साठा न आल्याने जिल्ह्यात इंजेक्शनचा तुटवडा
– जिल्ह्याच्या कोविड रुग्णलायांना जिल्हा प्रशासनामार्फत होतो इंजेक्शनचा पुरवठा
चंद्रपूर : उपचाराविना तडफडून कोरोना रुग्णाचा प्रवासी निवाऱ्यात मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरातील घटना
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघातील संतापजनक घटना,
गोविंदा निकेश्वर (50) असं मृतकाचे नाव
या रुग्णाला काल संध्याकाळी आंभोरा (ता. कुही, जि. नागपूर) येथून उपचारासाठी ब्रम्हपुरी येथे आणले होते
मात्र कुठेच बेड न मिळाल्याने त्या रुग्णाने ख्रिस्तानंद रुग्णालयासमोर असलेल्या प्रवासी निवाऱ्यात आसरा घेतला
तिथेच सकाळी त्याचा उपचाराविना मृत्यू झाला
सातारा: औषध मंत्र्याला खंडणी न मिळाल्यामुळे राज्यामध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवतोय- सदाभाऊ खोत
रेमडेसिव्हीर औषधांचा तुटवडा सुरळीत न झाल्यास येत्या दोन दिवसात रयत क्रांती संघटना मातोश्रीवर कोरोनाग्रस्त घेऊन आंदोलन करणार- माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा इशारा
यवतमाळ : जिल्ह्यात रेमडेसिव्हिरचा तुटवडा भासतोय. येथे खासगी रुग्णालयात 500 रेमडेसिव्हीर डोसची मागणी असताना फक्त 150 ते 200 व्हायल प्राप्त होत आहेत. तर शासकीय रुग्णालयात रेमडेसिव्हीरचा साठा मुबलक प्रमाणात आहे.
जिल्ह्यातील रुग्णालयात असलेल्या बेडची उपलब्धता
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 573 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 4 बेड शिल्लक आहेत. यात आयसीयी युनीटमधील 80 पैकी 80 रुग्णांसाठी उपयोगात, 410 ऑक्सिजन बेडपैकी 410 उपयोगात आणि 87 बेडपैकी 83 बेडवर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या चार बेड शिल्लक आहे.
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दिवसाला 8 मेट्रिक टन लक्विड ऑक्सिजनची गरज पडत आहे. पूर्ण जिल्ह्याचा विचार केल्यास 50 टन ऑक्सिजनची गरज असताना पुरवठा मात्र 30 टन होत आहे .
गेल्या महिनाभरापासून रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. रोजची मागणी 5 हजार इंजेक्शनची असून फक्त रोज 5000 इंजेक्शन प्राप्त होत आहेत.
जिल्ह्यात एकूण बेड हे 5299 आहेत. त्यापैकी 1255 बेड हे खाली आहेत.
शासकीय रुग्णालय जळगाव येथे 200 रुग्ण हे क्रिटिकल परिस्थितीत आहेत.
अमरावती
अमरावती जिल्हात संचारबंदीच्या वेळेत बदल
अमरावती शहरात दुपारी ३ नंतरच लॉकडाउन
आता दुपारी तीनपर्यंतच खुली राहणार जीवनावश्यक वस्तूंची दुकाने
हॉटेल, उपाहारगृहांना सायंकाळी ६ पर्यंतच घरपोच सेवा देता येईल.
जिल्हात कोरोनाचा पुन्हा स्फोट होत असल्याने प्रशासन अलर्ट..
अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचा आदेश…
मुंबई ट्रॅफिक पोलीस़ अॅक्शन मोडमध्ये…
– विनाकारण घराबाहेर गाड्या काढल्या तर कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल, मुंबई ट्रॅफिक पोलिसांकडून नागरीकांना सहकार्य करण्याचं आवाहन…
– मुंबईच्या इस्टर्न एक्सप्रेस फ्रि वे वर पोलिसांकडून अत्यावश्यक सेवेत असलेल्या गाड्यांवर स्टिकर लावण्याचं काम सुरु…
– ट्राॅम्बे पोलिसांकडून रस्त्यावर कारवाईला सुरवात…
– पोलिसांकडून कागदपत्राची पडताळणी सुरू…
– केवळ डाॅक्टर्स, आरोग्य कर्मचारी, भाजिपाला विक्रेते, टेली कम्युनिकेशनच्या कर्मचार्यांनाच परवानगी… त्याव्यतिरिक्त रस्त्यावर फिरल्यास थेट तुरूंगाची वाट…
सोलापूर — मॉर्निंग वॉकच्या नावे विनाकाम करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
शहरातील जेलरोड पोलिसांची कारवाई
30 हुन अधिक लोकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
ब्रेक –
– नेटचीही परीक्षा अनिश्चित काळासाठी केली स्थगित,
– 2 मे ते17 मे दरम्यान पार पडणार होती नेट ची परीक्षा,
– दरवर्षी नँशनल टेस्टिंग एजन्सी ( एन टी ए ) मार्फत सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेतली जाती परीक्षा,
– मात्र देशातला आणि राज्यातला वाढता कोरोनाचा संसर्ग पाहता परीक्षा स्थगित करण्याचा घेतला निर्णय
– केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल यांची परीक्षा स्थगित केल्याची ट्विट करून दिली माहिती ….
विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्रप्रमाणे गुजरातमध्ये सुद्धा भीषण परिस्थिती निर्माण झाली
रेमडेसिव्हर ची समस्या लवकरच सुटणार आहे
शिक्षण घेत असलेल्या मेडिकल विधर्थ्यां डॉक्टर , नर्स ची सेवा घेतली जाणार आहे
ऑक्सिजन आणि रेमडिसिव्हर ची समस्या दूर झाली तर बेड कितीही निर्माण करता येईल।
मुंबई संदर्भात कडक निर्बंधचा निर्णय घेतला आता उर्वरित महाराष्ट्र साठी घेतला जाणार आहे
उद्याला अधिकचे निर्बंध काय लावता येईल यावर विचार उद्याला होईल
रेमडेसिव्हर वरून राजकारण –
यात मी कोणाला दोष देणार नाही
मात्र एक्स्पोर्ट ची मान्यता रद्द करय्याला उशीर झाला
आम्ही मागणी केली त्या ठिकाणी नकार मिळाला
ज्या पद्धतीने स्फोटक परिस्थिती निर्माण झाली त्यावर आता पंतप्रधान यांनी निर्णय घ्यावा .. आधी लॉक डाऊन केला होता तसा आता ही करावं आम्ही सोबत असू
कडक लॉक डाऊन ची परिस्थिती निर्माण झाली , हे मी सुरवाती पासून म्हणत आहो पण आता ती वेळ आली
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉक डाऊन आवश्यक आहे
सातारा जिल्हयात आणखी 42 हजार लसीचे डोस उपलब्ध…
जिल्हयात आतापर्यन्त 4 लाख 12 हजार 958 लसीकरण झाले पुर्ण..
विरार:- विकेंड लॉकडाऊन च्या आजच्या रविवारी वसई विरार नालासोपारा परिसरात कडकडीत बंद
मेडिकल ही अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकान, रिक्षा, वाहतूक, बंद करण्यात आले आहेत..
शहरातील मुख्य रस्ता, नाका प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी करून, वाहनधारकांची चौकशी सुरू आहे, अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त इतरांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत
सातारा
सातारा : खा.उदयनराजे भोसले यांनी भीक मांगो आंदोलनातून जमा केलेली रक्कम जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केली मनिऑर्डरने परत…
भिक मांगो आंदोलनात 450 रुपयांची रक्कम झाली होती जमा….
लाॅकडाऊन विरोधात खा. उदयनराजे यांनी सातारयातील पोवई नाक्यावर केले होते आंदोलन
वाशिम :
वाशिम जिल्ह्यात आज 17 हजार लस होणार दाखल… यात कोविशिल्ड चे 2200 आणि कोवॅक्सिन चे 14800 डोस मिळणार आहेत…जिल्ह्यात मागील दहा दिवसांत दोन वेळा लसीकरण बंद पडली होती …उद्यापासून पुन्हा होणार लसीकरण ला सुरुवात…
देशात 24 तासात नवे रूग्ण – 2,61,500
देशात 24 तासात मृत्यू – 1,501
देशात 24 तासात डीस्चार्ज -1,38,423
एकूण रूग्ण -1,47,88,109
एकूण मृत्यू – 1,77,150
एकूण डीस्चार्ज – 1,28,09,643
एकूण एक्टीव्ह रूग्ण – 18,01,316
आत्तापर्यंत लसीकरण झालेली संख्या -12,26,22,590
केंद्रीय आरोग्यमंत्री यांची माहिती
नागपूर – पालकमंत्र्यांनी घेतला कोव्हिड वैद्यकीय परिस्थितीचा आढावा
मेयो , मेडिकल हॉस्पिटलमध्ये ४२० खाटा वाढविल्या
नागपुरातील वाढत्या कोव्हिड रुग्णामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे एकूण ४२० खाटा वाढविल्या आहेत.
यापैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ३०० खाटा , आणि मेयो हॉस्पिटल येथे १२० खाटांचा समावेश आहे.
यामुळे मेडिकलमध्ये ९०० खाटा क्षमता झाली आहे. यामध्ये ३०० खाटा या आय. सी. यु. करिता आहेत.
इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय येथे एकूण खाटा ५८० झालेल्या आहेत. यात १३६ खाटा या आयसीयू करीता आणि १२२ खाटा या व्हेंटिलेटरसह आहेत.
सांगली जिल्ह्यातील कोरोनाची लस संपली
आजपासून लसीकरण थांबणार
आरोग्य विभागाने लस साठा मागविला आहे
आज सायंकाळी लस येणेची शक्यता
सोमवार पासून लसीकरण सुरू होणार
कोरोनाच्या रुग्ण संख्येत सतत वाढ होत आहे
त्यामुळे लसीकरण करून घेन्येस नागरिकांची गर्दी वाढत आहे
रेमदसिव्हर इंजेक्शन साठा 300 शिलक आहे
गरजेनुसार कोविड रुग्णालया ला रेमदसिव्हर चे वाटप सद्या सुरू
नवीन ऑर्डर दिली 21 किंवा 22 एप्रिल ला नवीन साठा येणार
नागपूर –
नागपूर पोलीस आता चांगलेच अॅक्शन मोड मध्ये
बिनाकामाने लॉकडाऊनमध्ये बाहेर पडणाऱ्याची करत आहे ऑन द स्पॉट अँटीजन टेस्ट
काल 5 नाकेबंदी पॉईंटवर चेकिंग दरम्यान २५५ वाहन चालकांची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली
यापैकी १८ वाहन चालक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे
सर्व पॉझिटिव्ह रुग्णांची संस्थात्मक विलगीकरण केंद्रात रवानगी करण्यात आली आहे
18 जणांना सरळ विलगिकरन कक्षात पाठविल्याने बिना कामाने बाहेर पडताना आता नागपूर कर विचार करावा लागणार
आज नागपुरात बिना कामाने बाहेर फिरणाऱ्यांवर याचा परिणाम होणार का याकडे लागलं आहे लक्ष
नाशिक – लॉकडाऊनबाबत महापौरांचे काही दिवसातच घुमजाव
आधी लॉकडाऊन नको, कठोर निर्बंध करा अशी मागणी
आता मात्र महापौरांचे लॉक डाऊन करण्यासाठी भुजबळांना पत्र
सत्ताधारी भाजपाच्या घुमजाव मुळे शहरात भाजप बद्दल नाराजी
सोशल मीडियावर महापौर ट्रोल
नाशिक – उद्घाटना आधीच कोव्हीड सेंटर साठी वेटिंग
शहरातील सर्वात मोठ्या ऑक्सिजन बेड असलेल्या कोव्हिडं सेंटरचे आज उद्घाटन
व्हीसी द्वारे शरद पवार सकाळी 11.30 वाजता करणार उद्घाटन
पालकमंत्री छगन भुजबळ राहणार उपस्थित
180 ऑक्सिजन बेड आणि 115 सीसीसी बेड ची व्यवस्था
छगन भुजबळांच्या पुढाकाराने शहरातील मीनाताई ठाकरे स्टेडियम वर उभारलं जम्बो कोव्हिडं सेंटर
नागपूर ब्रेकिंग –
नागपुरात कोरोना मृत्यूचा तांडव सुरू
गेल्या 24 तासात 79 मृत्यूने नागपूर हादरले
मागील 13 महिन्यात आता पर्यंत चा मृत्यूचा सर्वाधिक आकडा
शहरातील 40 , ग्रामीण मधील 33 तर जिल्ह्याबाहेरील 6 जणांचा यात समावेश
पहिल्या लाटेत सप्टेंबर महिन्यात 1406 जणांचा मृत्यू झाला होता
तर एप्रिल महिन्याच्या फक्त 17 दिवसात 1087 मृत्यू झाले
त्यामुळे प्रशासनाची मोठी चिंता वाढली आहे
नाशिक – जिल्ह्यातील लॉकडाऊनवर नजर ठेवण्यासाठी ग्रामीण पोलीस करणार ड्रोन चा वापर
जिल्ह्यातील महत्वाच्या गावांमध्ये ड्रोन कॅमेरा द्वारे ठेवणार गर्दीवर लक्ष
नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचा महत्वपूर्ण निर्णय
गर्दी आढळल्यास होणार थेट कारवाई
पुणे –
– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे स्टेशनवर आता सामान्य नागरिकांना प्लॅटफॉर्म तिकिट बंद,
– 30 एप्रिलपर्यंत प्लॅटफॉर्म तिकिट बंद करण्याचा निर्णय,
– गेल्या काही दिवासांपासून रेल्वे स्टेशनवर परप्रांतीय मजुरांची गर्दी वाढलीय,
– कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने घेतला निर्णय,
पिंपरी चिंचवड
-2 लाख 63 हजार जणांनी पहिला तर 24 हजार 284 जणांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस
-शासकीय 71 आणि खासगी 29 अशा 100 केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. पहिल्या आणि दुस-या टप्प्यात वैद्यकिय क्षेत्रातील लोकांना, फ्रंटर वर्कर यांना लस देण्यात आली
पुणे –
– शहरातील करोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेऊन रमजान साधेपणाने आणि कोरोना नियंत्रण नियमावलीची अंमलबजावणी करून साजरे करावा,
– महापालिका प्रशासनाकडून मुस्लिम बांधवाना आवाहन,
– महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी रमजानसाठी नियमावली केली जाहीर,
– रमजान महिना संपेपर्यंत ही नियमावली लागू असणार असून तसेच तिचे पालनही बंधनकारक करण्यात आले आहे,
– रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तार साठी मस्जिद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरातच साजरे करावे.
मावळ,पुणे
-माजी राज्यमंत्री बाळा भेगडे कोरोना पॉझिटिव्ह, फेसबुकवर पोस्ट करत दिली माहिती
-माजी राज्यमंत्री भेगडे हे पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी गेले होते
-बाळा भेगडे यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत,सध्या त्यांची प्रकृती स्थिर
-संपर्कात आलेल्या नागरिकांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन
पिंपरी चिंचवड
-कोरोना चाचणीसाठी तासन तास वेटिंग वर
-चाचण्यांचे प्रमाण वाढले; दिवसाला 11 हजाराहून अधिक होताहेत चाचण्या
-शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून बाधित रुग्णाच्या संपर्कातील नागरिकालाही चाचणी करावी लागते. तसेच खाजगी कंपनीतील कामगारही मोठ्या प्रमाणात चाचणी करत आहेत.चाचणी करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढले आहे
-चाचणी केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. गर्दीमुळे अनेक नागरिकांना टोकन घेण्यासाठी तासन तास थांबावे लागते. चाचणीचा नंबर येण्यासाठीही वेटिंगवर थांबावे लागत आहे. त्यामुळे चाचणी केंद्रामध्ये वाढ करण्याची मागणी केली जात आहे
वाशिम: पोहरादेवी यात्रा रद्द, मात्र बंदोबस्तासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कडून कोरोना नियमाचे उल्लंघन…
बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे दरवर्षी रामनवमीला निमित्त यात्रा भरते. याठिकाणी देशातील लाखो भाविक हजेरी लावतात.. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच धार्मिक कार्यक्रम बंद असल्याने जिल्हा प्रशासनाकडून हा यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दि. 18 ते 22 एप्रिल दरम्यान या परिसराच्या 5 किमी क्षेत्रात मानवी हालचालींना पूर्णतः प्रतिबंध करण्यात आला आहे. यासर्व नियोजनात गर्क असलेल्या खुद्द पोलीस प्रशासनाकडून मात्र सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडविल्याचे चित्र दिसून आले.
पोहरादेवी येथे रामनवमी निमित्त साजरा होणाऱ्या यात्रा महोत्सवात आंध्र,कर्नाटक,तामिळनाडू सह देशभरातील लाखो बंजारा बांधव हजेरी लावतात.वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला आहे.याकरीता आतापासूनच तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या सर्व नियोजनात इतरांवर सक्ती करणाऱ्या पोलीस प्रशासनाला सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडल्याचे चित्र पहावयास मिळाले.
पनवेल
नशीबवान खानावळे ग्रामस्थ; ग्रामपंचायतीने घालून दिला महाराष्ट्रासाठी नवा आदर्श
ग्रामस्थांच्या कोरोना चाचणीसह रुग्णवाहिका आणि रेमडीसीवर इंजेक्शनचा उचलला खर्च
अवघ्या दोन महिन्यापूर्वी सत्तेत आलेल्या ग्रामपंचायत कमिटीने महाराष्ट्रासाठी दिला नवा मंत्र
ग्रामस्थांसाठी कोरोनाचा खर्च उचलण्याबाबतचा प्रस्ताव समोर ठेवून ग्रामपंचायत सभेमध्ये मारली बाजी
आपल्या गावातील नागरिकांची काळजी घेण्याबरोबरच कोरोनासारख्या आजाराला दूर ठेवणे हेच आहे उद्धिष्ट
एम.जी.एम.कामोठे येथे नवी मुंबई महानगरपालिकेची 20 आयसीयू बेड्सची आरोग्य सुविधा सुरू
पहिल्या टप्प्यात आजपासून 20 आयसीयू बेड्स आणि 10 व्हेटिलेटर्सची सुविधा कार्यान्वित
वेबसंवादाव्दारे आढावा घेत दररोजच्या कोव्हीड स्थितीवर आयुक्तांचे बारकाईने लक्ष
मुंबईत मागील 24 तासांमध्ये एकूण 8834 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एका दिवसात एकूण 6117 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 4 लाख 69 हजार 961 वर पोहोतला आहे. मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचा दर 82 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या मुंबईत एकूण 87 हजार 369 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण वाढीचा दर मुंबईत 44 दिवसांवर येऊन पोहोचला आहे.
महाराष्ट्रात काल तब्बल 67,123 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. हा आकडा गुरुवारच्या (15 एप्रिल) तुलनेत 5 हजार 428 रुग्णांनी जास्त आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना आलेख वर जात असून रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. राज्यात मृतांची संख्यासुद्धा रोज वाढत आहे. काल दिवसभरात राज्यात 419 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर काल दिवसभरात एकूण 56 हजार 783 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.